हिंदू धर्मात तुळस अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी तुळशीच रोप असतेच. काय तुम्हाला माहित आहे का तुळशीचे मुख्यतः किती प्रकार आहेत? त्याचा फायदा काय होतो? याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. कृष्ण तुळस, राम तुळस, कापूर तुळस, सब्जा तुळस, वन तुळस असे तुळशी चे पाच प्रकार आहेत. त्यापैकी आज आपण कृष्ण तुळस याबद्दल माहिती बघणार आहोत.
तुळशीला आयुर्वेदातील महत्त्वानुसार ‘औषधाची राणी’ म्हणावे लागेल. तुळशीच्या सेवनामुळे अगदी कर्करोगासारखे दुर्धर रोग ते सर्दी-खोकल्यासारखे सर्वसाधारण आजार बरे होतात. त्यामुळे अनेक शतकापासून तुळशीचा वापर केला जातो. भारतीय संस्कृतीत वृक्ष, झाडे, वनस्पती यांना आरोग्यात असलेले मोठे स्थान ऋषीमुनींपासून अधोरेखित केले गेले आहे.
निसर्गात वाढणाऱ्या विविध वनस्पती आरोग्य राखण्यात उपयोगाच्या ठरतात हे आयुर्वेद तसेच शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे. अंगणी तुळस असेल तर आजूबाजुचे वातावरण प्रसन्न राहतेच परंतु हवा देखील शुद्ध राहते. प्रामुख्याने कृष्ण तुळस ही आयुर्वेदिक औषधांमध्ये जास्त प्रमाणात असते. या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात.
उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो. मुरूम किंवा पुरळांपासून मुक्तता हवी असल्यास तुळशीपासून बनवलेल्या लेपाइतकं श्रेष्ठ गुणकारी असं काहीच नाही.
हा लेप तयार करण्यासाठी तुळशीची काही पाने, संत्र्याची साल घेऊन त्यात गुलाबजल मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट १५ मिनिटे चेह-यावर लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेह-यावरील मुरूम जाऊन चेहरा उजळण्यास सुरूवात होईल. याव्यतीरिक्त तुम्ही तुळशीच्या पानांच्या रसात चंदन पावडर टाकून त्याचाही रस बनवू शकता.
रोजच्या तुळशीच्या सेवनाने शरीरातील रक्त शुद्ध होते. रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तणावातून येणा-या नकारात्मक विचांरावर मात करणे देखील सोपे होते. तुळशीची पाने डोकेदुखीवरील रामबाण उपाय म्हणून ओळखली जातात. तुळशीच्या वाळलेल्या पानांची गरम पाण्यात वाफ घेणे हा सर्वात चांगला उपाय आहे.
त्यासाठी एक चमचा वाळलेली तुळशीची पाने दोन कप पाण्यात टाकून एका मोठ्या भांड्यात गरम करावे. एका मोठ्या कपड्याने चेहरा झाकून त्याची 5 ते 10 मिनिटे वाफ घ्यावी. दहा ग्रॅम तुळशीच्या पानांचा रस 20 ते 30 ग्रॅम ताजे दही किंवा 2 ते 3 चमचे मधाबरोबर नियमित घेतल्यास हे कॅन्सरवर गुणकारी औषध ठरते. दोन चमचे तुळशीच्या मंजिऱ्या रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते एक ग्लास पाणी प्यावे.
याचे असंख्य फायदे आहेत. ते तुम्हाला सर्दी खोकला पडसे लठ्ठपणा कॅन्सर मुरम यांसारख्या अनेक रोगांपासून दूर ठेवते. तुम्हाला ताजेतवाने वाटते. आळस थकवा सहसा येत नाही. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या प्रिय व्यक्तीला सोबत शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.