नमस्कार, तुम्हीही रात्री तुमचे वाळत घातलेले कपडे बाहेरच राहू देत असाल तर सावध व्हा. कारण याचे खूप मोठे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. जर आपले कपडे बाहेर असतील तर त्याचा काय परिणाम होतो? जर कपडे गोळा झाले तर त्याचे काय परिणाम होतात ते आता आपण पाहणार आहोत. जर रात्री कपडे बाहेर राहिले तर त्याचा लहान मुलांवर आणि विवाहित स्त्रियांवर जास्त दुष्परिणाम होतो.
ज्या काही नकारात्मक किंवा वाईट शक्ती असतात त्या रात्रीच्या वेळेस जास्त शक्तिशाली आणि सक्रिय होतात. लहान बालकांचे जे कपडे आपण रात्री बाहेर वाळत घालतो त्यामध्ये एक प्रकारचा सुगंध येत असतो. आणि या सुगंधाच्या शोधात नकारात्मक शक्ती तेथे आकर्षित होतात. कारण त्यांना अशा लहान बालकांचे भक्षण करायचे असते आणि या सुगंधामुळे नकारात्मक शक्ती त्या कपड्यांमध्ये प्रवेश करतात व आपण आपल्या बालकांना हे कपडे घातले की त्यांची प्रकृती बिघडते. त्यांच्या स्वास्थ्यावर् याचा विपरीत परिणाम होतो आणि कधी कधी तर त्यांचे खूप वाईट परिणाम त्यांना भोगावे लागू शकतात.
म्हणून लहान बालकांचे कपडे कधीही रात्रीच्या वेळी बाहेर ठेवू नयेत. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात त्याचा एक वेगळा सुगंध असतो म्हणूनच तांत्रिक व्यक्ती कपड्यांवर प्रयोग करूनही काही तंत्रमंत्र करतात व आपल्याला इजा पोहोचवू शकतात.
आता पाहूयात नवविवाहित स्त्रिया किंवा गर्भवती स्त्रियांबद्दल. जर नवविवाहित स्त्रियांचे कपडे धुऊन रात्रीच्या वेळी बाहेर वाळत घातले तर त्या कपड्यांमध्येही नकारात्मक शक्ती आपला प्रभाव सोडतात किंवा त्यामध्ये प्रवेश करतात व त्या कपड्यांच्या माध्यमाने त्या स्त्रियांपर्यंत पोहोचतात आणि त्यांचे वैवाहिक जीवन नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. त्या स्त्रियांचे आरोग्य बिघडते, मानसिक संतुलन ढासळते. नेहमी वरचेवर त्या स्त्रिया आजारी पडतात व त्यांना संतान प्राप्तीत अडथळे निर्माण होतात.
हेच गर्भवती स्त्रियांबद्दलही आहे. त्यांच्याही कपड्यांमध्ये जर नकारात्मक शक्तीनी प्रवेश केला तर त्या स्त्रीचा गर्भपात होतो किंवा त्या गर्भावर परिणाम होतो, मग त्याचा त्रास होऊन गर्भ काढून टाकावा लागतो, नंतर त्या स्त्रीला लवकर गर्भधारणा होत नाही. कधी कधी तर अशी स्त्री कधीच गर्भधारण करू शकत नाही, असे तिचे शरीर बनते. म्हणून रात्रीच्या वेळी कधीही कपडे बाहेर ठेवू नये.
असेच नाही की लहान बालके व स्त्रियांवरच यांचा परिणाम होतो, तर घरातील कोणत्याही सदस्यावर याचा प्रभाव पडू शकतो. मग घरात सततचे आजारपण, वादविवाद, क्लेश, मानसिक संतुलन बिघडणे असे काही ना काही नकारात्मक परिणाम जाणवायला लागतात, म्हणून रात्रीच्या वेळी कोणाचेही कपडे बाहेर अंगणात, गॅलरीत किंवा टेरेसवर कधीही ठेवू नयेत. दिवसा कपडे धुवावेत व सूर्यप्रकाशामध्ये वाळवून घरात ठेवावेत.
कारण या कपड्यांच्या माध्यमातून आपले शत्रू आपल्यावर तांत्रिक प्रयोग करू शकतात आणि आपल्याला त्रास देऊ शकतात, अडचणीत टाकू शकतात. तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल, रात्रीच्या वेळी कपडे बाहेर का टाकू नयेत. आम्हाला आशा आहे की हा लेख तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लेख आवडला असेल तर लाईक व शेअर करा.