या दिशेला कधीच चुकूनही घड्याळ आणि कॅलेंडर लावू नये, होऊ शकते असे काही.!

अध्यात्म

आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला कितीतरी वस्तूंची आवश्यकता असते. या वस्तूंचा वापर करताना कळत नकळत पणे आपल्या हातून काही चुका होतात. वास्तुशास्त्रानुसार आपल्या आसपासच्या प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो, प्रत्येक वस्तूंचा आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांशी संबंध असतो. तसेच प्रत्येक वस्तूचा चांगला व वाईट प्रभाव पडत असतो. प्रत्येक वस्तूतून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रसार होत असतो.

आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत घड्याळाचा आपल्या जीवनावर कसा काय प्रभाव पडतो ते? तसेच कॅलेंडर घरात कोणत्या दिशेला लावावे ते? घड्याळ लावताना आपल्याला वास्तुशास्त्राची माहिती असणे आवश्यक आहे. जर घड्याळ योग्य दिशेला लागले असेल, तर त्याचे शुभ आणि सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात तर घड्याळ जर चुकीच्या दिशेला लावलेले असेल तर त्याचे आपल्याला अशुभ आणि नकारात्मक परिणाम मिळतात. चला तर जाणून घेऊयात घड्याळाविषयी.

घड्याळ कधीही भेट म्हणून अशा व्यक्तीला द्यावे, ज्यांचा काळ चांगला चालला आहे. कारण आपण ज्यावेळी कोणाला घडाळ देतो त्यावेळी त्याबरोबर आपले भाग्यही देत असतो आणि अशा वेळी जर त्या व्यक्तीची वेळ वाईट असेल तर ती वेळ आपल्यावर येते व आपले चांगले भाग्य त्याला मिळते. म्हणून घड्याळ भेट म्हणून देताना किंवा घेताना ज्या व्यक्तीची वेळ चांगली असेल त्याच व्यक्तीकडून घ्यावे.

शक्यतो भेट म्हणून घड्याळ देणें आणि घेणे दोन्हीही टाळावे. कारण आपण कितीही श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तीला घड्याळ भेट म्हणून दिले किंवा घेतले तरीही जर ती व्यक्ती कर्जबाजारी असेल, आजारी असेल, तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो.

घरात नेहमी सुख संपत्ती, धन समृद्धी आणि आनंद राहावा यासाठी घड्याळ हे योग्य दिशेला असणे खूप आवश्यक आहे. दक्षिण भिंतीवर घड्याळ कधीही लावू नये किंवा दक्षिणेकड़े टेबल असेल तर त्यावरही घड्याळ ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. भांडण तंटे, वादविवाद, मानसिक् टेन्शन, नुकसान हे सर्व घड्याळ दक्षिण दिशेच्या भिंतीवर असल्याने आपल्या जीवनात घडत असते.

हे वाचा:   पैसे दिल्याशिवाय या वस्तू कोणाकडूनही घेऊ नका, पैसे आणि धन संबंधित गोष्टींसाठी याला मानले जाते अपशकुन.!

दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. त्याबरोबरच पित्रांची दिशा आहे, म्हणून जर या दिशेला घडाळ लावले तर आपल्याला सतत त्या दिशेकडे बघावे लागते. म्हणजे आपण साक्षात मृत्यू आणि अधोगतीकडे सारखे पाहत असतो. म्हणून जर आपल्याही घरात दक्षिण दिशेला घड्याळ असेल तर तिची दिशा त्वरित बदला.

मग घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा खूप शुभ आहे. पूर्व दिशेला घड्याळ लावल्याने आपल्या कुंडलीत शनी आणि मंगळ दोन्हीही मजबूत होतात आणि जर मंगळ मजबूत झाला तर आपली प्रगती होते. घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. परंतु घड्याळावर धूळ कधीही जमा होऊ देऊ नये. घड्याळ वरचे वर नेहमी स्वच्छ करीत राहावे.

उत्तर दिशा ही घड्याळ लावण्यासाठी शुभ मानली जाते. उत्तर दिशेला घड्याळ लावल्यास आपल्याला यश व प्रसिद्ध मिळते. उत्तर दिशेला घड्याळ लावल्यास आपल्या कुंडलीतील शनि, सूर्य आणि राहू मजबूत होतात. आपल्या घरात जितके सदस्य असतील, प्रत्येकाच्या कुंडलीत ग्रह मजबूत होतात. पश्चिम दिशेला घड्याळ लावल्यानेही आपली प्रगती होते. आपल्याला प्रगतीच्या वेगवेगळ्या संधी मिळतात कमी कष्टात जास्त फळे मिळतात.

परंतु घड्याळ ठेवताना कधीही कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूवर ते ठेवू नये. कारण हा खूप मोठा वास्तुदोष समजला जातो. तसेच दरवाजाच्या अगदी वरही घड्याळ कधीही लावू नये. असे म्हणतात की घरातून आत बाहेर करताना घड्याळावरील नकारात्मक ऊर्जा आपल्यावर पडते आणि आपले संपूर्ण जीवन नकारात्मकतेने भरून जाते. म्हणून कधीही चुकूनही घड्याळ दरवाजाच्या अगदी वर लावू नये. हे तर झाले घड्याळ कोठे लावावे आणि कोठे लावू नये याविषयी.

आता आपण जाणून घड्याळा संबंधी काही विशेष बाबी, घड्याळ नेहमी वेळेवर असावे, घड्याळ कधीही मागे असू नये, दोन पाच मिनिटे घड्याळे पुढे असेल तर काहीही हरकत नाही, परंतु जर घड्याळ मागे असेल तर आपणही प्रत्येक गोष्टीत मागे पडतो. बंद पडलेले घड्याळही घरात कधीच ठेवू नये कारण जर घड्याळ बंद पडले असेल तर आपली प्रगतीही बंद पडते व आपले नुकसान होण्यास सुरुवात होते.

हे वाचा:   का काही लोक गरीब राहतात व काही लोक खूप श्रीमंत होतात.? महालक्ष्मीने इंद्राला दिलेले उत्तर.!

म्हणून एकतर ते घड्याळ दुरुस्त करावे किवा टाकून द्यावे. परंतु बंद पड्लेले घड्याळ घरात कधीही ठेवू नये. घड्याळ घेताना शक्यतो गोल आकाराचे घड्याळ घ्यावे. कशातरी वाकड्या तिकड्या आकाराचे घड्याळ घेऊ नये.

आता जाणून घेऊयात कॅलेंडर विषयी. सर्वात आधी घरातील जुने कॅलेंडर काढून टाकावे हे खूप आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे हे खूप अशुभ मानले जाते. यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते. तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जाही मिळत नाही. यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नये.

त्यामुळे वर्ष बदलले तसे कॅलेंडरही बदलायला हवे असे वास्तुशास्त्र सांगते. अनेकदा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर ज्या ठिकाणी जागा रिकामी दिसली त्या ठिकाणी पटकन लावून मोकळे होतो पण आपण कधी असा विचार केला आहे का? की आपण घरी लावलेले कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे? ते योग्य दिशेला लावले आहे का? वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर कुठे लावावे याचेही काही नियम दिलेले आहेत.

त्यानुसार आपण कॅलेंडर घरातील योग्य भिंतीला लावू शकतो. वास्तुशास्त्रानु‌सार घराच्या उत्तर पश्चिम किंवा पूर्व दिशेला भिंतीवर कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते. वास्तूनुसार पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्याने आपली प्रगती होत जाते. पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्यदेवांची दिशा देखील पूर्व आहे. यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते.

यामुळे आपली घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते असे वास्तुशास्त्र मानते. मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की घरातील घड्याळ आणि कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे आणि कशा प्रकारे लावावे ते. हा लेख तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल, लेख आवडला असेल तर लाईक व शेअर करा.