घरातील महिलांनी वेळीच बदला या चार सवयी;‍ अन्यथा देवी महालक्ष्मीची होईल आपल्यावर नाराज.!

अध्यात्म

भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना देवीचे रुप मानले जाते. घरामध्ये मुलीचा जन्म होणे म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचे घरामध्ये आगमन होणे असे आपल्याकडे मानले जाते. विवाहानंतर मुली आपल्या घराच्या सुना होऊन आपल्या गृहलक्ष्मी रुपाने घरामध्ये प्रवेश करतात

महिलांना आपल्या संस्कृतीमध्ये देवीचे रूप मानले जाते घरामधील महिला घराच्या व्यक्तींची व घराची काळजी घेतात त्यामुळे महिलांना घराची गृहलक्ष्मी देखील म्हटले जाते. घरातील लहान मुलांचे लाड करणे, मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेणे व मानसन्मान ठेवणे तसेच घरात आलेल्या अतिथींचे सहर्ष स्वागत करणे यामुळे घरातील महिला आपल्या घरामध्ये सौख्य घेऊन येत असतात.

मात्र महिलांच्या काही वाईट सवयींमुळे देवी महालक्ष्मी घरावर नाराज होते व त्या घरातून निघून जाते ज्यामुळे त्या घराला गरिबी प्राप्त होते. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे त्या चार सवयींबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्या सवयी महिलांनी वेळीच सोडल्या पाहिजेत. त्यामुळे महालक्ष्मीची कृपा सदैव त्यांच्या कुटुंबावर व त्या महिलांवर राहील.

घराची स्वच्छता – महालक्ष्मी मातेला स्वच्छता कधीही प्रिय असते. त्यामुळे महालक्ष्मी माता ज्या घरामध्ये स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही, त्या घरामध्ये कधीही राहत नाही. याकरता ज्या महिलांना अस्वच्छतेची सवय आहे त्यांनी आपल्या सवयी बदलून घरांमध्ये स्वच्छता व टापटीपपणा ठेवला पाहिजे.

हे वाचा:   म्हणून गणपती बाप्पा समोर एकही तुळशीचे पान ठेवले जात नाही, यामागे आहे ही कथा.!

देवपूजा करणे – घरातील महिलेने रोज सकाळी देवपूजा केली पाहिजे. ज्या महिला सकाळी देवपूजा करत नाहीत किंवा ज्यांना देवपूजा करण्याचा कंटाळा आहे अशा ठिकाणी महालक्ष्मी थांबत नाही व त्या घरावर दरिद्रता येऊ लागते. घरातील महिलांनी सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा अवश्य करावी व देवासमोर हात जोडून आपले व आपल्या कुटुंबाचे भले होण्याकरता रोज प्रार्थना करावी.

भांडण करणाऱ्या महिला –  ज्या महिला घरातील सदस्यांसोबत कायम भांडण करतात व प्रत्येक गोष्टीला पकडून वाद-विवाद व चिडचिड करतात, अशा अशांततेच्या वातावरणामध्ये महालक्ष्मी देवी कधीही थांबत नाही व त्या घरातून कायमची निघून जाते. जा घरामध्ये शांतता व सौख्य नांदते, त्या घरामध्येच महालक्ष्मीचा वास असतो.

दान पुण्य न करणाऱ्या महिला – काही महिला अतिशय कंजूष  प्रवृत्तीच्या असतात. या महिला कधीही दानधर्म करत नाहीत,  मंदिरांमध्ये गेल्या तरी या महिलांना दान करण्याची इच्छा होत नाही. तसेच दारासमोर आलेले भिकारी, कुत्रे व गाय यांना या महिला हाकलवुन देतात. अशा कंजूष व दान न करणाऱ्या महिलांमुळे देवी महालक्ष्मी नाराज होते व घरातून निघून जाते.

हे वाचा:   गुरूवारच्या दिवशी या चुका अजिबात करू नका; अन्यथा तुमच्यावर येऊ शकते खूप वाईट वेळ.!

तर या होत्या त्या चार वाईट सवयी ज्या घरातील महिलांनी वेळीच सोडून द्याव्यात, नाहीतर घरांमधुन देवी महालक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन निघून जाईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *