हे 7 झाड घरामध्ये अवश्य असलेच पाहिजे. वास्तुनुसार घरात कोणते झाड लावावे? गुडलक वाढवणारे 7 झाडं.!

अध्यात्म

नमस्कार मंडळी तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. तर मंडळी आपण आजच्या लेखात घराच्या आवारात कोणती झाडे असावीत याची माहिती घेणार आहोत. या सात चमत्कारी फुलांची झाडे लावा, यामुळे गुडलक वाढण्यासाठी मदत होते व गुडलक वाढण्यासाठी घरामध्ये कोण कोणती झाडे लावली पाहिजे हे आपण आता पाहणार आहोत. आपण आपलं घर छान दिसावं म्हणून खूप प्रयत्न करतो, त्यासाठी आपल्या अंगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावतो. पण तुम्हाला माहित आहे का की शास्त्रानुसार असे काही झाडे असतात, त्या झाडा मुळे घरात सकारात्मक ऊर्जा तर वाढतेच पण त्या झाडाच्या सान्निध्यात आल्यामुळे आपल्या घरातील वातावरण खूप प्रसन्न व पवित्र होतं. घरामध्ये शुभ झाडे लावल्यामुळे मानसिक शांती सुद्धा मिळते व आसपासचं वातावरण सुद्धा खूप प्रसन्न असतं.

आपलं घर सकारात्मक शक्तीने परिपूर्ण असावे म्हणून ही सात प्रकारची झाडं आपल्या घरामध्ये आपणास लावायची आहेत. ती सात प्रकारची झाडं कोणकोणती आहेत हेच आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. तर पहिले झाड आहे जास्वंद. तर अंगणामध्ये जास्वंदाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते. जास्वंदाचे फुल अनेक रंगाचे असते, आपण ते घराच्या गॅलरीत सुद्धा लावू शकतो पण लाल रंगाचे फुल अति शुभ मानले जाते.

जास्वंदाचे फूल गणपतीला अत्यंत प्रिय आहे. फक्त दुर्वा आणि एक जास्वंदाचे फुल वाहिले तर यामुळे गणपती प्रसन्न होतात. जास्वंदाचे फुल शुक्रवारी देवीला व्हायल्या मुळे सौभाग्यात वाढ होते व संततीला आशीर्वाद मिळतो. सूर्यदेवाला एका तांब्याच्या तांब्यात जास्वंदचे फुल टाकून जल अर्पण केल्यामुळे सूर्य देवाचा आशीर्वाद मिळतो. कुंडलीत मंगळ कमजोर आहे त्यांनी जास्वंदाचे झाड घराच्या अंगणात जरूर लावावे. मंगळदोष आहे त्यांनी सुद्धा घराच्या अंगणात जास्वंदाचे झाड लावल्यामुळे मंगळ दोष कमी होतो.

दुसर आहे अपराजिता. याचे दोन ते तीन प्रकार असतात, पांढरा, दुसरा निळा व जांभळा सुद्धा असतो. याचे सर्व प्रकार शुभ मानले जातात. अपराजिता हे स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगले असते. हे स्वास्थ्याच्या दृष्टीने तर चांगलेच असते तर वास्तूच्या दृष्टीने सुद्धा खूप शुभ मानले जाते. अपराजिता चे फुल घरातील अनेक दोष दूर करतात. हे फुल महादेवाला अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर माता दुर्गा ला सुद्धा हे फूल खूप प्रिय आहे. अपराजिता चे फुल शनिदेवाला व्हायल्या मुळे शनिच्या साडेसाती पासून मुक्तता होते. निळ्या रंगाचा संबंध शनिशी आहे. निळ्या रंगावर शनीचा प्रभाव असतो, म्हणून ज्यांच्यावर साडेसातीचा प्रभाव आहे त्यांनी निळ्या रंगाचे अपराजिता चे फुल शनिदेवाला जरूर अर्पण करावे, यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.

हे वाचा:   या चार राशीच्या जीवनामध्ये होणार आहे खूप बदल, जाणून घ्या तुमची तर रास नाही ना.!

तिसरे आहे पारिजातकाचे झाड. पारिजातकाचे झाड घराच्या अंगणात लावणे खूप शुभ मानले जाते. तुम्हाला माहित आहे का की समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्नाची प्राप्ती झाली होती त्यातील एक म्हणजे पारिजातक होय. पारिजातक भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. मनामध्ये इच्छा धरून 108 फुल महादेवाला वाहिल्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. पारिजातकाचे फूल सायंकाळी उगवतात व सकाळ होईपर्यंत जमिनीवर पडतात. पारिजातकाचे झाड घराची शोभा वाढवण्यास, सोबतच त्याची फुलं पानं मूळ गुणांनी भरलेलो आहेत. पारिजातकाचे झाड घरात लावल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते. पारिजातकाचे फूल हे खूप पवित्र आहे. पारिजातकाचे झाड देव वृक्ष म्हणून ओळखले जाते. ज्या घरात पारिजातकाचे झाड आहे तिथे देवांचा वास असतो.

पुढील आहे तुळशी. घरामध्ये तुळशी लावणे हे अनिवार्य आहे, कारण हे लक्ष्मीचे स्वरूप आहे. असा कोण आहे ज्याला लक्ष्मी चा आशीर्वाद नको आहे? सर्वजण लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय करतात त्यातील एक म्हणजे घरामध्ये तुळशी लावणे. ज्या घरांमध्ये तुळशी असते त्या घरात सुख शांती व समृद्धी कायम टिकून राहते. घरात तुळशी लावणे म्हणजे नकारात्मक शक्तिचा नाश होतो. तुळशी ईशान्य दिशेला लावणे शुभ मानले जाते. सौभाग्य वाढवणारी तुळशी घरामध्ये अवश्य लावा.

पुढचे झाड आहे शमी. तुळशीच्या नंतर ज्या झाडाची पूजा केली जाते ते झाड म्हणजे शमीचे झाडं. ज्या घरामध्ये अनेक प्रकारचे वाद आहेत, वास्तुदोष आहे, अश्या घरामध्ये शमीचे झाड अवश्य लावले पाहिजे. तर मंडळी शमीच्या झाडाखाली शनिवारी एक दिवा लावल्यामुळे अनेक कष्टाचे निवारण होते. शमीचे पान सोमवारी महादेवाला वाहील्यामुळे कसलीही इच्छा पूर्ण होते. जीवनात कसल्याही प्रकारची अडचण असू दे, दुःख असू दे, कष्ट असू दे तर यासाठी पाणी घेऊन यामध्ये थोडीशी खडीसाखर मिक्स करून ते पाणी शमिला अर्पण करा व चमत्कार बघा, तुमच्या कसल्याही अडचणी क्षणात दूर होतील. विजयादशमीच्या दिवशी शमीची पूजा केल्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ति होते. घरात कधीही धनाची कमतरता भासणार नाही, कारण या झाडाला सोनं म्हटलं जातं.

हे वाचा:   टाळा – चावीचा उपाय तुम्हाला करोडपती बनवेल, जर विश्वास बसत नसेल तर स्वतःच करून पहा.!

पुढचे आहे मनी प्लांट. हे घरामध्ये किंवा अंगणात तुम्ही कोठेही लावू शकता. मनी प्लांट वर शुक्र देव यांचा प्रभाव असतो. शुक्रदेव धनसंपत्ती वैभवाचे कारक आहेत. नावाप्रमाणेच हे झाड घरात धनधान्य सुख-समृद्धी देणारे असते. हे मनी प्लांट घरामध्ये अवश्य लावले पाहिजे. मनी प्लांट बाटलीत कुंडीत सुद्धा तुम्ही लावू शकता. पण काळजी एवढी घेतली पाहिजे की मनी प्लांट चा वेल वरच्या दिशेने गेला पाहिजे, खालच्या दिशेने असेल तर ते अशुभ मानले जाते. मनी प्लांट लावण्यासाठी आग्नेय दिशा शुभ मानली जाते.

पुढचे झाडं आहे नारळाचे झाड. नारळाच्या झाडा मध्ये लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मी स्वरूप श्रीफळ घराच्या अंगणात अवश्य लावावे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजा बिना नारळाची होत नाही. तर मंडळी बुद्धीचे देवता गणपती यांना प्रसन्न करण्यासाठी हिरव्या नारळाला अवश्य दान करावे.

पुढचे आहे दूर्वा. घराच्या अंगणात दूर्वा अवश्य लावली पाहिजे. दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय आहे. कसलेही कष्ट, अडचण असू दे गणपतीला दुर्वा मनोभावे अर्पण केल्यामुळे कसल्याही प्रकारचे विघ्न दूर होते, म्हणून घराच्या अंगणात दूर्वा अवश्य लावावी. दूर्वा कधीही नष्ट होत नाही.

पुढचे आहे अशोकाचे झाड. अशोकाचे झाड घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते. अशोकाचे झाड जिथे आहे तिथे कसल्याच प्रकारचा त्रास नसतो. तर मंडळी आपण या लेखामध्ये सात प्रकारचे चमत्कारी झाडं पहिली आहेत. ही झाडे घरात लावल्यामुळे घरात भरपूर प्रमाणात ऊर्जा देतात व देवांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. अशा प्रकारचे झाडं घरामध्ये अवश्य लावली पाहिजे. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा.