वास्तुशास्त्रानुसार खाण्याच्या मीठाचे हे आहेत अनोखे उपाय; एक चिमूटभर मीठ करेल तुम्हाला धनवान.!

अध्यात्म

मीठ एक नैसर्गिक साधन संपत्ती असून रोजच्या जेवनामध्ये मीठ असल्याशिवाय स्वयंपाकाला चव येत नाही. मीठ नैसर्गिकरित्या आपल्याला मिळत असते. मीठाचे अनेक आरोग्यदायी उपाय देखील केले जातात. मात्र वास्तूशास्त्रानुसार मीठाचे काही टोटके आपल्याला यश, धनसंपत्ती, कीर्ती मिळवून देतात तसेच वाईट नजरदोषांपासुन देखील वाचवतात.

आज आम्ही आपल्या या लेखाद्वारे वास्तुशास्त्रानुसार मीठाचे काही फायदे सांगणार आहोत. ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती देखील वाढू शकते.

चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय? आपण बरेचदा बघितले असेल की लहान मुलाला नजर लागली असेल किंवा दृष्ट लागली असेल तर त्यांच्या अंगावरून तीन वेळा मीठ ओवाळून टाकले जाते व त्यामुळे दृष्ट निघून जाते. मीठामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होत असतात व सकारात्मक शक्तींची वाढ होत असते, त्यामुळे मीठाचा वास्तुशास्त्रामध्ये अनेक वेळा उपयोग केला जातो.

जर एखाद्या व्यक्तीला अनाठायी भीती वाटत असेल, तसेच काहीतरी भयगंड मागे लागला असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू केतू दोष निर्माण झाला असेल त्यामुळे त्याच्या सर्व कामांमध्ये अडथळे निर्माण होत असतील, तर अशा व्यक्तीने काचेच्या बरणीमध्ये मीठ ठेवून घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यावे. त्यामुळे अचानक वाटणारी भीती पूर्णपणे नष्ट होईल.

हे वाचा:   रात्रीचे कपडे वाळत घालत असाल तर सावधान; घडू शकतात हे गंभीर परिणाम.!

मीठामुळे सकारात्मक विचार निर्माण होतात, आपल्याला आपल्या व्यवसाय व व्यापारामध्ये प्रगती करायची असेल, तसे चांगले आर्थिक लाभ मिळवायचे असतील मात्र आपला धंदा मंदीत चालला असेल, तर अशावेळी आपल्याला वास्तुशास्त्रानुसार एक टोटका करण्यास काही हरकत नाही.

आपल्याला एका लाल कपड्यांमध्ये खडेमीठ घेऊन त्याची पुरचुंडी बांधून आपल्या ऑफिसच्या किंवा जिथे आपण काम करतो त्या जागी दरवाजावरती टांगून ठेवायचे आहे. यामुळे आपल्या धंद्यामध्ये आर्थिक प्रगती होते तसेच इतरत्र असणाऱ्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात व सकारात्मक लहरी आपल्या अवतीभवती येऊ लागतात.

एखाद्या व्यक्तीला रात्री भयानक स्वप्न पडत असतील किंवा भीतीदायक स्वप्न पडून अचानक रात्री जाग येत असेल, झोप मोडत असेल तर अशा व्यक्तीने रात्री झोपण्याच्या अगोदर पाण्यामध्ये एक चिमूटभर मीठ टाकून त्या पाण्याने हात पाय धुवून मगच झोपले पाहिजे. त्यामुळे आपल्याला नकारात्मक शक्तींचा त्रास होत नाही. तसेच वाईट स्वप्न देखील पडत नाहीत.

हे वाचा:   अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त एवढे एक काम करा, पितृदोष मधून कायमचे मुक्त व्हाल, घरामध्ये सुरू असलेले भां'डण कि'रकिर होईल लगेच बंद...!

घराचे बांधकाम करताना रॉक सॉल्टचा वापर केल्यास घरामध्ये कायम सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो व घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा येत नाही.

प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना आठवड्यातून एक वेळेस चिमुकलं मीठ पाण्यात टाकुन त्या पाण्याने अंघोळ घातली पाहिजे. यामुळे मुलांना दृष्ट लागत नाही, तसेच जर काही वाईट शक्तींची नजर लागली असेल तर ती देखील निघून जाते. तर हे होते मीठाचे चमत्कारिक उपाय! आपणही हे उपाय करून बघा व याचा लाभ घ्या!

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *