लग्न झाल्यानंतर प्रत्येक महिला ही अनेक प्रकारचे नियम स्वीकारत असते. हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे चालीरीती रूढी परंपरा आहेत ज्या आजही तितक्याच प्रमाणात व तितक्याच मनोभावाने केल्या जातात. जसे की लग्न झाल्यानंतर प्रत्येक महिला हे गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असते तसेच अनेक प्रकारचे दागिने घालत असते. प्रत्येक दागिन्याचे हे वेगळे महत्व सांगितले गेले आहे. लग्न झाल्यानंतर असे अनेक प्रकारचे नियम आहे जे प्रत्येक महिलेला पालन करावेच लागत असते.
परंतु असे देखील काही सांगितले जाते की लग्न झालेल्या महिलेने कधीही काही दागिने घातले नाही पाहिजे. यामुळे नकारात्मक प्रभाव पडत असतो. सध्याच्या काळामध्ये कुठल्याही गोष्टीची फॅशन बनत चालली आहे. या फॅशनमुळे अनेक महिला नको नको तसे कपडे घालत असतात. तसेच नको नको तशी फॅशन करत असतात. परंतु आपल्या संस्कृती मध्ये अशा प्रकारचे काही दागिने आहेत तसेच काही क्रिया आहेत ज्यांना करणे खूपच वाईट मानले जाते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
लग्न झालेल्या महिलांनी कधीही पांढऱ्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान केले नाही पाहिजे. असे करणे अशुभ मानले जाते. शास्त्रामध्ये देखील या बद्दलचा उल्लेख केला गेला आहे. असे केल्यामुळे पतीचा मानसन्मान कमी होत असतो. तसेच पती जो काही व्यवसाय करत असेल तो व्यवसाय किंवा जे कार्यक्षेत्र असेल त्यामध्ये हवे तसे यश मिळत नाही. सफेद रंग न घालण्याचे कारण म्हणजे सफेद रंगाचे वस्त्र हे विधवा महिला घालत असतात. त्यामुळे अशा महिलांनी एकदम सफेद वस्र कधीही धारण करू नये.
परंतु अनेकांना असे वाटत असते की आपण काही सफेद रंगाचे वस्त्र धारण करावे. कारण आजकालच्या या जमान्यामध्ये कोणत्याही गोष्टीची फॅशन बनत चालली आहे. तुम्ही सफेद रंगाचे वस्त्र धारण करू शकतात परंतु तुम्हाला त्या सफेद रंगाच्या वस्त्र मध्ये काहीतरी दुसरे रंग असणे आवश्यक आहे. संपूर्ण सफेद रंगाचे वस्त्र कधीही धारण करू नये. असे करणे खूपच अशुभ मानले जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.