बेलपत्र अशी एक वनस्पती आहे ज्याची पाने देव शंकराची पूजा करताना वाहली जातात. ही पाने शंकराला फार प्रिय आहेत. केवळ महादेवाला संतुष्ट करण्यासाठीच वापरले जात नाही, तर आरोग्याच्या बाबतीतही त्याचे बरेच फायदे आहेत. खरं तर, बेलाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. ही पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, या पानांचा वापर केल्याने अनेक आजार दूर जातात. चला जाणून घेऊया त्याचे फायदे..
मसालेदार खाण्यामुळे शरीरात उष्णतेमुळे फोड येतात. अशा वेळी ही पाने, हिरवी कोथिंबीर आणि बडीशेप बारीक करून त्याचे मिश्रण बनवा व त्याचे सेवन केल्यास तुमच्या तोंडाचे फोड बरे होतील. खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी, बेलाच्या पानांच्या रसामध्ये मध घालून त्याचे सेवन केल्यास सर्दीपासून आराम मिळतो.
उन्हाळ्याच्या काळात डोळ्यांमधे बरीच प्रमाणात घाण येते आणि ते सुजतात, डोळ्यांमध्ये खाज सुटते. या पानांचा रस डोळ्यात घातल्याने आराम मिळतो. तसेच, डोळ्यांमध्ये लालसरपणा, अॅलर्जी, वेदना असल्यास बेलाच्या पानांवर तूप लावा आणि डोळ्यांना शेक द्या. त्यानंतर डोळ्यांवर पट्टी बांधा. यामुळे डोळ्यांच्या समस्यांतून खूप आराम मिळेल.
बेलाच्या फळामध्ये असलेल्या टॅनिनचा उपयोग अतिसार आणि कॉलरासारख्या आजारांच्या उपचारात केला जातो. ताप आल्यानंतर बेलाची पाने एका ग्लास पाण्यात उकळा. पाणी अर्धे शिल्लक असताना, ते गाळून घ्या आणि चहाप्रमाणे प्या. याने तुम्हाला आराम वाटेल. या कच्च्या फळांचा लगदा पांढरा डागाच्या रोगाचा प्रभावीपणे उपचार करू शकतो. तसेच अशक्तपणा, डोळा आणि कान यांचे आजार बरे होतात.
जर हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या वाढत असेल, तर बेलाची पाने गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी बांधा. बेलाच्या पानांचे सेवन केल्यास कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. पूर्वी कच्चा लगदा हळद आणि तूप मिसळून तुटलेल्या हाडांना लावला जात असे. त्यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडेंट्समुळे पोटाच्या अल्सरमध्ये आराम मिळतो. अँटी-व्हायरस आणि बुरशीजन्य गुणधर्मांमुळे ते शरीराचे बरेच संक्रमण काढून टाकू शकते.
व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत असल्यामुळे त्याचा वापर सेर्वी नावाच्या रक्तवाहिन्यांच्या आजारामध्ये आराम मिळतो. रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास बेलाच्या पानांचे सार फायदेशीर ठरते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेलाचे फळ खूप फायदेशीर आहे. बेलाच्या पानाचे चूर्ण करून त्या चूर्णाचे दिवसातून दोन वेळेस सेवन केल्यास मधुमेहाचा रोग कमी होण्यास मदत होते.
झाडापासून मिळविलेले तेल दमा आणि सर्दी सारख्या श्वसन रोगांशी लढायला मदत करते. योग्य फळाचा मिश्रित रस पिल्याने हृदयरोगापासून बचाव होतो. मधमाशी आणि अन्य काही कीटक चावल्यास बेलपत्राचा रस जखमेवर लावल्यास आराम पडतो. बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमरतेची लक्षणे दिसून येतात. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक औषध आहे. त्याच्या लगद्यामध्ये मीठ आणि मिरपूड मिसळून ते खाल्ल्यास आतड्यांमधून विषारी पदार्थ बाहेर येतात.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.