धर्मिक शास्त्रानुसार तुळशीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंदु धर्माच्या प्रत्येक घरासमोर तुळशीचे एक छोटेसे रोपटे लावलेले दिसतच असते. ज्या घरासमोर तुळशीचे रोपटे नाही असे घर खूपच सुनेसुने वाटत असते. धार्मिक ग्रंथांमध्ये याबद्दल भरपूर असे माहात्म्य सांगितले गेले आहे. प्रत्येक घरासमोर एखादे तुळशी चे रोप असायला हवे.
घरासमोर केवळ तुळशीचे रोप असून चालणार नाही तर तुळशीचे रोपाची मनोभावे पूजा करणे देखील तितकेच गरजेचे आहे. तुळशी संबंधीच्या अशा अनेक काही संकल्पना आहेत ज्या अनेकांना माहिती नसतात. धार्मिक दृष्ट्या तुळशीची अशा काही प्रकारे पूजा केल्यास याचे फळ खूपच चांगले प्राप्त होत असते. दररोज नियमित स्वरुपात जो व्यक्ती तुळशीला जल अर्पण करतो. तसेच नित्यनियमाने पूजा करतो अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कसल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.
तुळशीमध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक मानले जातात. तुळशीच्या पानांमध्ये अॅडाप्टोजेन आढळत असते जे दैनंदिन जीवनासाठी अत्यंत आवश्यक असते. यामुळे आपला ताण तणाव हलका होत असतो. अनेकदा दिवसभराच्या कामामुळे आपल्याला खूपच थकवा आल्यासारखे वाटत असते. अशावेळी तुळशीच्या चार पाच पानांचा काढा करून पिला तर थकवा कायमचा जात असतो.
जर तुम्ही तुळशीच्या पानांचे नियमित सेवन करत असाल तर अनेक समस्या यामुळे नाहीशा होत असतात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक आरोग्याच्या अशा समस्या उद्भवत असतात ज्या नियमित देखील असतात. या समस्या म्हणजे कफ होणे, छातीत जळजळ होणे, ऍसिडिटी, अपचन, गॅस अशा काही समस्या आपल्याला कधीही निर्माण होत असतात.
आपण जर नियमित दोन तुळशीच्या पानांचे सेवन करत असू तर आपल्याला यापैकी कुठलीही समस्या कधीही उद्भवणार नाही. जर आपण नियमित प्रमाणात थोडासा व्यायाम व काही खाण्यापिण्याच्या गोष्टींचे पथ्य पाळले तसेच नियमित स्वरूपात तुळशीचे पानांचे सेवन केले तर आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची गरज देखील भासणार नाही. आपले आरोग्य इतके मजबूत होईल की सर्व आजार देखील आपल्या समोर हात टेकवतील.
तुम्ही अनेकदा ऐकले असेल की घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्याला नेहमी हे सांगत असतात की तुळशीचे पाने खाण्यापूर्वी त्यांना चाऊन खाऊ नका. अनेकांच्या डोक्यामध्ये आता हा विचार आला असेल की तुळशीच्या पानांना दातांने चावून खाल्ले तर नेमके काय होते व मग मग तुळशीचे पाने खायची तरी कशी? तर तुळशीचे पाने आपण दाताने चावून खाल्ली नाही पाहिजे याचे एकमेव कारण म्हणजे, तुळशीच्या वनस्पतीमध्ये पारा आढळतो जो आपल्या दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक असतो.
यामुळे दात कमकुवत बनत असतात. भविष्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी आपण तुळशीच्या पानांचे सेवन हे काढा द्वारे करावे किंवा त्याचा रस करून करावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.