सध्याच्या काळामध्ये सर्दी होणे खोकला होणे ही साधारण समस्या बनून गेली आहे. अनेकांना काही ना काही कोणती ना कोणती आरोग्याची समस्या उद्भवत असते. अशा वेळी आपण नेमके काय करायला हवे हे देखील आपल्याला सुचत नाही. जर हे दुखणे आले तर या सोबत थोडीशी मध्यम स्वरूपाची ताप देखिली येत असते.
सर्दी किंवा खोकला असल्यानंतर गळ्यामध्ये इन्फेक्शन होऊ लागते. ताप आणखी वाढली जात असल्याने अन्नपाण्याची देखील चव लागत नसते. काहीही खाऊ वाटत नसते. परंतु अशावेळी चिंता करण्याची काहीही गरज नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एका तुरटी विषयीचा झोपायचा उपाय सांगणार आहोत. अत्यंत सोपा उपाय असून अतिशय प्रभावकारी उपाय आहे.
आपल्याला या उपायासाठी जवळपास अर्धा खडा तुरटी लागणार आहे. आपल्याला तुरटी सहजपणे कोठेही कोणत्याही बाजारात उपलब्ध होत असते तसेच किराणामालाच्या दुकानात देखील मिळत असते. तर ही तुरटी सर्वप्रथम खलबत्त्यामध्ये टाकून याला चांगल्याप्रकारे बारीक करून घ्या. या तूरटी ची पावडर होईल अशाप्रकारे याला बारीक करून घ्यावे.
ज्यावेळी तुम्ही खलबत्त्यामध्ये तुरटी बारीक करत असाल तेव्हा त्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकायची आहे व याला देखील बारीक करून घ्यायचे आहे. हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून वाटीमध्ये ठेवून द्यावे. रात्रीच्या वेळी थोडेसे दूध गरम करून घ्यावे. या दुधाला थोडेसे कोमट होऊ द्यावे. बनवलेले हे मिश्रण एक चमचा या दुधामध्ये टाकायचा आहे.
रात्रीच्यावेळी झोपण्यापूर्वी हे दूध प्यायचे आहे. यामुळे असलेली ताप सर्दी खोकला कमी झालेला दिसेल. ऍलर्जीमुळे जर सर्दी आलेली असेल किंवा मध्यम स्वरूपाची ताप असेल तर यामुळे तीदेखील नाहीशी होत असते. कोरडा किंवा कफ असलेला खोकला असेल तर हा खोकला देखील यामुळे बरा होत असतो. हा उपाय करण्यासाठी अत्यंत सोपा असून तुम्ही घरच्या घरी करू शकता.
अतिशय कमी साहित्यामध्ये खूपच उपयुक्त असा हा उपाय केला जाऊ शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.