आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक प्रकारच्या चुका करत असतो. ज्याचा सर्व प्रभाव आपल्या जीवनावर सहजरीत्या पडत असतो. आपण चुकून अशा प्रकारच्या वस्तू लोकांकडून घेत असतो ज्या अतिशय अशुभ मानल्या जातात. यामुळे जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबाबत माहिती सांगणार आहोत.
आम्ही तुम्हाला अशा प्रकारच्या काही वस्तू सांगणार आहोत ज्या आपण कधीही कुणाकडून बिना पैशाच्या घेतल्या नाही पाहिजे. अशा प्रकारे घेतलेल्या या वस्तू म्हणजेच पैसे न देता घेतलेल्या या वस्तू अतिशय अशुभ मानल्या जातात. यामुळे घरामध्ये दारिद्रता निर्माण होण्याची शक्यता असते यामुळे घरात पैशासंबंधी च्या अडचणी येऊ शकतात. आपण त्यामुळे या वस्तू कधीही चुकूनही घेऊ नये. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या वस्तू.
जेवणामध्ये किती प्रकारचे सुगंधित मसाले जरी असले तरी जेवणाला चव येते ती मिठा द्वारेच. मिठाशिवाय कोणतेही अन्न बेचव आळणी असते. मिठा संबंधी ची ही चूक आपण घरी कधीही केली नाही पाहिजे. लक्षात ठेवा कधीही कुणाकडूनही मिठ बिना पैशाचे म्हणजेच विकत घेतल्याशिवाय आणू नये. मीठ आणणार असाल तर त्या व्यक्तिला पैसे नक्की द्या. कारण याचा संबंध शनिदेवाशी जोडला गेला आहे. यामुळे घरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
पैसे न देता तीळ विकत घेणे देखील अपशकुन मानले जाते. असे सांगितले जाते की तिळाचा संबंध हा शनिदेवा सोबतच राहू-केतू बरोबर देखील आहे. त्यामुळे चुकूनही तीळ पैसे न देता घेऊ नये. यामुळे घरात राहू केतूचा दोष निर्माण होण्याची शक्यता असते. घरामध्ये अचानकपणे वेगवेगळे संकटे निर्माण होण्याची देखील शक्यता सांगितली जाते. त्यामुळे अशी ही चूक कधीही करू नये.
कपडे शिवण्यासाठी तसेच इतर कामासाठी वापरली जाणारी सुई देखील कुणाकडून पैसे न देता घेऊ नये. ज्या व्यक्तीकडून तुम्ही सुया आणणार असाल त्या व्यक्तीला पैसे न चुकता द्यावेत. असे जर केले नाही तर यामुळे घरात असलेले प्रेम संबंध सर्व नष्ट होत असतात घरात भां’डणे, कि’रकिर होऊ लागतात. त्यामुळे ही देखील एक चूक आपण घरात कधीही केली नाही पाहिजे.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.