अनेक लोकांना केस पांढरे होण्याची समस्या खूप सतावत असते. केस पांढरे झाल्यानंतर काय करायला हवे हे त्यांना समजत नाही. कधी तरुण मुलांना देखील ही समस्या निर्माण झालेली दिसत आहे. अनेक लोक केसांना डाय करत असतात. म्हणजेच केसांना काळया रंगाचा कलर दिला जातो. यामुळे फायदा कमी पण नुकसानच जास्त होत असते.
कारण यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल युक्त पदार्थ टाकलेले असतात. यामुळे केस काळे बनत असतात परंतु काही काळापुरतेच. थोड्या दिवसातच पुन्हा आहे तसे केस बनले जातात. त्यामुळे अशा केमिकल युक्त पदार्थांचा केसांसाठी वापर करू नये. या पदार्थांपासून केसांना नेहमी दूरच ठेवावे. मग अशा वेळी नेमके काय करायला हवे?
चिंता करण्याची काही गरज नाही आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय सोपा व कमी खर्चात करता येईल असा उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला खूप जास्त पदार्थांची आवश्यकता भासणार नाही घरामध्ये असलेले काही पदार्थ या उपायासाठी पुरेसे आहेत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहे जे आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध असतील. यासाठी लागणारा पहिला पदार्थ आहे दही. दही हे केसांसाठी किती फायदेशीर मानले जाते. हे सांगण्याची काही गरज नाही दह्या मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जे केसांना आरोग्यदायी हेल्दी बनवण्यासाठी फायदेशीर ठरले जाते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला आणखी एक पदार्थ लागेल या पदार्थाचे नाव आहे त्रिफळाचूर्ण. अनेक आजारांवर तसेच इतर कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी त्रिफळा चूर्ण चा उपयोग केला जातो. अनेकांच्या घरांमध्ये चूर्ण उपलब्ध असते. त्यांच्याकडे हे चूर्ण नसेल तर हे कुठल्याही आयुर्वेदिक दुकानातून किंवा किराणा मालाच्या दुकानातून आणू शकता.
एका लोखंडी भांड्यामध्ये तुम्ही दोन चमचे त्रिफळा चूर्ण घ्यावे. त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकावे. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून ठेवावे. काही वेळानंतर हे पूर्णपणे काळे झालेले दिसेल. त्यानंतर हे मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे. आपल्या केसांना हे मिश्रण लावायचे आहे. परंतु लावण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागेल.
आपले केस हे पूर्णपणे सुकलेले असायला हवेत. केसांना मेहंदी ज्याप्रमाणे लावत असतो त्याप्रमाणे हे मिश्रण लावून ठेवावे. ज्या ठिकाणी पांढरे झालेले केस आहे फक्त त्याच ठिकाणी हे मिश्रण तुम्ही लावू शकता. हे मिश्रण लावल्यानंतर अर्ध्या ते एका तासानंतर थंड किंवा कोमट पाण्याच्या साह्याने केस धुऊन काढायचे आहेत. त्यानंतर थोडेसे तेल केसांना लावावे.
अशाप्रकारे अगदी कमी खर्चात सहजरित्या केस काळे केले जाऊ शकतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.