मेहंदी म्हटले की सर्व महिला मुलींना खूपच आवडीचा विषय असतो. कुठलाही सणवार असला की मेहंदी लावली जाते. लग्नामध्ये देखील मेहंदीला वेगळाच मानपान दिला जातो. अनेक ठिकाणी लग्नामध्ये मेहंदी काढण्याच्या विविध रूढी परंपरा आहेत. बाजारामध्ये आता विविध प्रकारचे मेहंदी कोण मिळत असतात.
सुरुवातीच्या काळामध्ये मेहंदी मेहंदीच्या पानांच्या साह्याने घरगुती पद्धतीने बनवली जात असे. मेहंदीचे एक विशेष झाड असते त्याच्या पानांद्वारे मेहंदी बनवली जाते. परंतु आजकाल सर्व मेहंदी ही केमिकल युक्त पदार्थांचा द्वारे बनवलेली असते. त्यामध्ये विविध प्रकारचे रंग मिश्रित केलेले असतात.
मेहंदी च्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन बनवल्या जातात. मेहंदी च्या वेगवेगळ्या डिझाईन असतात परंतु या डिझाईन खूपच अवघड असतात प्रत्येकाला या अशा प्रकारच्या डिजाइन काढणे शक्य नसते. लग्नाच्या अगोदर नवरीचा किंवा नवरदेवाच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी देखील लोक सर्विस देत असतात. यातून चांगल्या प्रमाणात कमाई देखील केली जाते.
मेहंदी काढणे हा एक प्रकारचा लहानसा व्यवसायात आहे. अनेक लोक मेहंदी कशाप्रकारे काढावी? मेहंदीच्या वेगवेगळ्या डिझाईन कशाप्रकारे काढाव्यात? याचे क्लास देखील देत असतात म्हणजेच या मध्ये मेहंदी काढणे शिकवले जाते. अनेक लोकांना घरच्या घरी सोप्या पद्धतीने मेहंदी डिजाइन शिकायची असते.
आज आम्ही तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मेहंदी कशा प्रकारे काढावी हे सांगणार आहोत. मेहंदी काढण्यासाठी तुम्हाला जास्त डिझाईन येण्याची काही गरज नाही. तसेच यासाठी तुम्हाला फक्त एक कंगवा लागणार आहे. कंगव्याच्या साहाय्याने कशाप्रकारे मेहंदी काढावी हे आपण शिकणार आहोत.
सर्वप्रथम मेहंदी संपूर्ण हातावर चोळून घ्यावी. त्यानंतर कंगवा त्यावर दाबून अतिशय हलक्या हाताने फिरवावा. जेणेकरून हातावर एक नक्षीदार आकार तयार होईल. अशा पद्धतीने बोटांवर देखील असा नक्षीदार आकार बनवायचा आहे. अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय सुंदर अशी मेहंदी दिसू लागेल. याचा व्हिडिओ देखील तुम्ही खाली पाहू शकता.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.