जसे जसे वय वाढत जाते तसे तसे आरोग्याच्या विविध प्रकारच्या समस्या निर्माण होणे सुरुवात होत असते. आरोग्य मध्ये काही बिघाड हा केवळ आपल्या सवयी वरच अवलंबून असतो. जर तुम्ही काही अशा सवयी असे काम करत असाल तर तुम्हाला भविष्यामध्ये हाडे दुखीचा त्रास खूपच जास्त होऊ शकतो. आजच्या या लेखामध्ये आपण याबाबतची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
जर तुम्हालाही हाडांमध्ये वेदना होत असतील, हातापायांना सूज येणे हाडे दुखणे इत्यादी समस्या तुम्हाला देखील होत असेल तर तुम्हाला काही सवयी बदलाव्या लागतील. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की उलट सुलट खाणे आणि तासन्तास खुर्चीवर बसणे तुम्हाला अनेक आजारांचे बळी ठरू शकते. म्हणूनच तुमच्यासाठी निरोगी आहाराबरोबर योग आणि व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.
धावपळीच्या जीवनात लोक आरोग्याकडे कमी लक्ष देतात. योग्य ती काळजी न घेतल्यामुळे, हाडे इतकी कमकुवत होतात की त्यांच्या अनपेक्षित फ्रॅक्चरचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, आपण जीवनशैलीतून काही वाईट सवयी काढून टाकल्या पाहिजेत. जेणेकरून अशा प्रकारच्या समस्या कायमच्या दूर होतील.
आरोग्य तज्ञ म्हणतात की जे लोक दिवसभर बसून व्यायाम करत नाहीत त्यांना हाडांचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. कारण स्नायूंप्रमाणेच हाडे देखील कसरत करून मजबूत होतात. चालणे, धावणे, व्यायाम आपल्या दैनंदिन दिनक्रमात समाविष्ट करा. असे जर तुम्ही आता करत नसाल तर भविष्यात तुम्हाला याचा खूप त्रास सहन करावा लागू शकतो.
तं’बा’खू’चे सेवन करणाऱ्या लोकांच्या हाडांची डेन्सिटी खूप कमी असते, ज्यामुळे अनेक प्रकारचे हाडांचे आजार होण्याची शक्यता वाढते. धू’म्र’पा’न मुळे रॅडिकल्स वाढत असते, ज्यामुळे हाडे बनवणाऱ्या पेशी नष्ट होतात. एवढेच नव्हे तर त्याच्या सेवनामुळे असे हार्मोन्स बाहेर पडतात जे हाडांना कमकुवत करत राहतात.
अनेक लोकांना भाजी मध्ये खूप मीठ खाण्याची सवय असते. जर तुम्ही देखील जास्त मीठ घेत असाल तर असे करणे थांबवा. कारण ते तुमच्या हाडांसाठी धोकादायक ठरू शकते. जेव्हा शरीरात जास्त प्रमाणात सोडियमचे प्रमाण वाढते तेव्हा हाडांच्या डेन्सिटीमध्ये झपाट्याने घट होऊ शकते, जे धोकादायक आहे.
निरोगी हाडांसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी पूरक आहार अत्यंत महत्वाचा आहे. अशा स्थितीत व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम युक्त अन्न खा. यासोबतच जास्तीत जास्त पाणी प्या. जर तुम्ही या सवयी लवकरात लवकर बदलल्या तर तुम्हाला म्हातारपणी याचा जास्त त्रास होणार नाही. यापैकी तुम्हाला कोणत्या सवयी आहेत आणि कोणत्या सवयी बदलणार आहे हे कमेंट मध्ये लिहा.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.