अनेक लोकांना त्वचा संबंधीच्या अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असतो. ह्या समस्या इतक्या हैराण करणाऱ्या असतात की यामुळे लोक खूपच त्रस्त झाले आहेत. या त्वचा संबंधीच्या समस्या बऱ्याच काळापर्यंत आपल्या मागे लागलेल्या असतात. ज्यामध्ये प्रामुख्याने निर्माण होणाऱ्या समस्या म्हणजे गजकर्ण, खरूज, नायटा इत्यादी होय. यापासून सुटका मिळविण्यासाठी आपण वाटेल ते करण्यास तयार असतो.
काही गोष्टींची काळजी घेतली तर आपण या पासून कायमची सुटका मिळवू शकतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक असा सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत जो उपाय केल्याने खाज, खरूज, नायटा इत्यादी पासून तुम्हाला कायमची सुटका मिळणार आहे. हा उपाय नैसर्गिक असून अत्यंत सोप्या पद्धतीने घरीच केला जाऊ शकतो. चला तर मग बघुया कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय.
आपल्याला हा उपाय करण्यासाठी मोहरी चे तेल लागणार आहे. या उपायासाठी आपण एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे मोहरीचे तेल काढून घ्यावे. त्यानंतर या तेलामध्ये एक चमचा कडुलिंबाचे तेल टाकावे. आपल्याला यामध्ये आणखी एक पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे कापूर. कापूर च्या उपयोगाने कुठल्याही प्रकारचा त्वचा रोग पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो.
आपण या तेलामध्ये कापूर ची पावडर बनवून टाकावी व याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. या सर्व वस्तू सहजपणे कोणत्याही जवळच्या किराणामालाच्या दुकानात उपलब्ध होतील. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अत्यंत सोपा आहे. यासाठी खूप जास्त साधन सामग्री लागत नाही.
तर मित्रांनो हे या उपायाचा वापर कशाप्रकारे करायचा आहे. तर कापसाच्या साहाय्याने हे तेल ज्या ठिकाणी त्वचा विकार झालेला आहे त्या ठिकाणी लावावे. काही दिवसातच तुम्हाला भरपूर आराम मिळेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.