बऱ्याचदा चुकीच्या खाण्याच्या सवयी, चहा कॉफी यांचे अतिसेवन यामुळे दात खराब होतात. अति थंड तसेच अतिक्रम खाऊनही दातांच्या समस्या उद्भवतात. पान गुटखा सिगारेट इत्यादी सवयींमुळे ही दातांवर पिवळे पणाचा रंग चढतो. जे दिसायला अति विद्रुप दिसते आपल्याला मनमोकळे पणाने हसताना अवघडल्या सारखे होते. आपलं व्यक्तिमत्व खराब दिसू शकते. हे ठीक करण्यासाठी पुढील उपाय नक्की करा.
हा घरगुती उपाय असल्याने याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. करण्यास अतिशय सोपा. आणि वेळ लागणार फक्त दोन मिनिट. पिवळे दात एकदम दुधासारखे शुभ्र चमकू लागतील. आपण वापरणार आहोत टोमॅटो. टोमॅटो हे ब्लिच चे काम करते. कित्येकदा हिरड्याना सूज येते, पू येतो तोंडाचा दुर्घन्द येतो जे आपल्याला सहन होत नाही. आणि डेंटिस्ट कडे जाऊन महागडे उपचार घ्यावे लागतात. हे टाळण्यासाठी स्वस्त आणि सोपा उपाय बघूया. तर बहुगुणी
टोमॅटो हा या सगळ्या समस्यावर काम करतो. दातांसाठी टोमॅटो रस अमृतच आहे..! ते कसे पाहूया. एक चमचा टोमॅटोचा रस घ्यावा.(गर घेऊ नये ) दुसरी वस्तू आहे,’ क’ जीवनसत्वाने भरपूर असलेले लींबू. ज्यामुळे दातांचं दुखणं थांबत. दातांना जर्म इन्फेकशन झाले असेल तर या उपायाने फायदा होईल. अर्ध्या लिंबाचा रस घ्यावा. एक चिमूटभर मीठ घ्या.
मीठ हा या उपायतील अत्यन्त प्रभावी घटक आहे. ज्यामुळे कमकुवत हिरडयांना बळकटी येते. मीठ हे कीटकनाशक आहे हे आपण जाणता.
त्यामुळे दातात होणारे किटाणू यांवर मीठ हे फायदेशीर ठरते. एक चमचा टोमॅटो रस,अर्धा लिंबू रस आणि चिमूटभर मीठ हे सर्व एकत्र करून घ्या. त्यात रोज दात घासताना जी पेस्ट तुम्ही वापरता ती पेस्ट घ्या. हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. आणि या मिश्राणाने रोजच्या प्रमाणे ब्रश करून स्वच्छ चुळा भराव्यात. हा उपाय आठवड्यातून सलग तीन दिवस तरी करावा. फरक लगेच जाणवयला सुरुवात होईल.
दात फक्त पांढरे च नाही तर हिरड्या होतील मजबूत. दात सडणार नाहीत. दुर्गंधी दूर पळून जाईल. तुमचा चारचौघात आत्मविश्वास वाढेल. टोमॅटो लिंबू असल्याने कोणताही साईड इफेक्ट नाही. दात घासण्यासाठी ब्रश काळजीपूर्वक निवडा. सोपा आणि सहज उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि दाताच्या तक्रारीना दूर ठेवा. उपाय आवडल्यास स्वतः नक्की करून बघा आणि फायदा झाल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेयर करा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.