टाच दुखी कायमची होईल बंद, गुडघे दुखी, कंबर दुखी, सांधेदुखी, सर्वांवर हा एकच स्वस्त उपाय.!

आरोग्य

मित्रांनो, उतारवयात गुडघे, कंबर, पाठ, टाचा, हाडं दुखणं काही नवीन नाही. पण आता तुम्हाला हे सहन करायची गरज नाही. आम्ही तुम्हाला आज खास नुस्खा सांगणार आहोत तेही पैसे खर्च न करता. ज्यामुळे तुम्ही पूर्ववत होऊन दुखण्याला कराल गुड बाय..! या साठी आपल्याला लागणार आहे रुई ची पाने. ज्याला हिंदीत मदार तर इंग्रजीत Calotropis gigantea असेही म्हणतात.

रस्त्याच्या कडेला हे झाड अगदी सहज उपलब्ध होते. आपल्या शरीरावर कुठेही दुखत असेल त्यावर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. या झाडाची पाने तोडली असता सफेद दुधाप्रमाणे चीक येतो. जो विषारी असतो. तेंव्हा काळजीपूर्वक याचा वापर आपल्याला करायचा आहे.चेहरा डोळे यासारख्या नाजूक भागापासून जपावे. लहान मुलाना दूर ठेवावे. याचे मुखसेवन करू नये.

डोळ्यात हा चीक गेला असता आंधळेपणाची शक्यता असते.म्हणून सावधगिरी बाळगावी. रुईच्या पानात असे काही घटक असतात ज्याने सूज झपाट्याने उतरते. ७-८ रुईची पानं घ्या. ही पानं एका दगडाने कुटून थोडी जाडसर पेस्ट बनवून घ्या. आणि तुम्हाला शरीराच्या ज्या भागात दुखणं आहे किंवा सूज आहे त्यावर लावावे. अगदी मान दुखी वर सुद्धा हा उपाय करता येईल. हा लेप लावून सुमारे २-३ तास तसाच ठेवायचा आहे.

हे वाचा:   चिमूटभर हळद करेल जादू, एवढे सगळे आजार मुळापासून नष्ट करते हळद, फक्त अशाप्रकारे दररोज करा सेवन.!

प्राचीन काळापासून याचा उपयोग केला जात आहे. रुई चे पान,फुलं अगदी त्या चीकचा सुद्धा उपयोग होतो. गंभीर गुडघेदुखी तर पळून च जाईल. तुम्ही अगदी ठणठणीत व्हाल. अगदी एकाच प्रयोगात फरक दिसू लागेल. परंतु खूप जुनी दुखणी असतील तर याचा ८ ते १०वेळा उपयोग केल्याने तुम्हाला १००% खात्रीशीर फरक पडेल. जुना लोखंडी तवा घ्या. ४-५ रुईच्या पानांवर तीळ /मोहरी तेल लावावे. अगदी एरंडेल तेल लावले तर उत्तमच.

हे तिन्ही तेल सांधेदुखी पासून आराम देतात. हा तवा गॅस वर गरम करायला ठेवा. त्यावर तेल लावलेली रुईची पाने त्यावर गरम करावी. थोडयावेळाने पानाचा रंग बदलताना दिसेल. आपण आधी बनवलेली पेस्ट जिथे दुखत असेल तिथे लावून त्यावर तव्यावर गरम केलेले ती पाने एका सुती मऊ कपड्याने बांधावीत. दोन तीन तास तसेच ठेवावे. तुम्हाला आराम मिळेल.

हे वाचा:   अनेक शुगर असलेल्या लोकांना या काड्यांनी मोकळे केले आहे.! डायरेक्ट शुगरच्या गोळ्याच बंद करून टाकल्या.! झीरो शुगर होऊन जाईल.!

Ac मध्ये जाण टाळा.फ्रिज चे पाणी पिणे बंद करा. चिंच दही यासारख्या आंबट पदार्थाचे सेवन कटाक्षाने टाळा. डोसा इडली इत्यादी फरमेंट केलेले कमी खा. चांगल्या परिणामासाठी कोवळ्या सूर्यप्रकाशात बसावे. ज्यामुळे ड जीवनसत्व अपल्याला मिळून सांधे दुखीचा त्रास होत नाही. तुम्ही हा उपाय नक्की करून पहा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *