आपण ओवा चे रोपटं बघितलं असेलच. कोणत्याही नर्सरी मध्ये हे सहज उपलब्ध होत. याचे आज आपण १२ असे औषधी गुण पाहणार आहोत, जे जाणून तुम्ही थक्क व्हाल. ही माहिती वाचून तुम्हीही हे ओव्याच रोपटं तुमच्या घरी नक्की लावाल. इतकं उपयुक्त आहे हे ओव्याचे रोप. ओव्याच्या फायद्या बद्दल आपण जाणतोच.
जसे की ओवा पोट साफ ठेवण्यासाठी, पचनासाठी, वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. परंतु ओव्याचे हे पान याबद्दल फारसे कुणाला माहीत नाही. ही पानं पुरुषांच्या समस्यावर अतिलाभदायक आहे. मेटाबोलिजम वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, शरीरातील हार्मोनल संतुलन राखण्यासाठी, पोटांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या तक्रारींसाठी ओव्याची पानं वरदानच जणु..!
छातीत जळजळ होणे, डायबेटिस, करपट ढेकरा येणे, हृदयासंबंधी च्या कोणत्याही तक्रारी जर तुम्हाला असतील तर यापेक्षा जगात कोणतेही अचूक रामबाण औषध सापडणार नाही. उपयाचा प्रयोग करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असली पाहिजे. त्यासाठी पुढील माहिती नीट वाचा. भयंकर ऍसिडिटी समस्या, सकाळी उठल्यावर ज्यांचे पोट साफ होत नाही. त्यांच्यासाठी हा प्रयोग.
दोन मध्यम आकाराचे ओव्याची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. ती दगडीच्या मदतीने बारीक कुटावीत.ही पेस्ट तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात मिसळावी. सोबत यात एक छोटासा गुळाचा खडा मिक्स करून सकाळी काही न खाता पिता सलग सात दिवस घ्यावे. कितीही जुनी कब्ज ऍसिडिटी समस्या एक आठवड्यात दूर होतील. भूक न लागणे गॅस अपचन होणे यावर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता.
ज्यांना लठ्ठपणाच्या तक्रारी आहेत. वजन घटवण्यासाठी पुढील उपाय. ३-४ ओव्याची पाने कुटून घ्यावीत. अर्धा चमचा लिंबू रस, एक चमचा शुद्ध मध (भेसळयुक्त मध नको त्यात साखर असते ) एकत्र करावे. सकाळी गरम पाण्यासोबत हे मिश्रण प्यावे. तुमचे वजन तेजीने कमी होईल. आठवड्यात ८-१० किलो कमी व्हाल. जर तुमच्या घरात कोणाला मुतखड्याचा त्रास असेल तर पुढील प्रयोग तुमच्यासाठी आहे.
दोन छोटी ओव्याची पानं घ्या. ती बारीक कुटून घ्या. त्यात पानफुटी चे एक पानाचा रस टाका. ते ताकात मिक्स करून घेतल्यास मुतखड्यात आराम मिळतो. कितीही मोठा खडा असू द्या लवकर फुटतो. तुम्हाला किंवा घरातील कोणाला सांधेदुखी किंवा गुडघेदुखी असेल कंबर, पाठ दुखणे यावर ही पान उपयुक्त आहे. या पानांमुळे, शरीरातील वंगन संपते सूज येते या त्रासावर प्रभाविक पणे काम करते.
तीन ओव्याची पान, एक चमचा ताजा कोरपड गर, मेथी दाणे एकत्र करून पेस्ट बनवा. जिथे दुखते त्या भागावर लावून सुती कपड्याने तो भाग झाकावा. यात हळद मिसळून लावल्यास दुखणं एकदम गायब होणार..! पुरुषांना आतून कमजोरी जाणवते, ताकद कमी होते.अशात या ओव्याचे एक पान दररोज सकाळी अश्वगंधा चूर्ण सोबत चावून खावे. हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय आहे.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.