मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा काही रोपांबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यांना तुम्ही आपल्या दारात आवर्जून लावले पाहिजे. या झाडाझुडपांना लावल्यास आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. सोबतच आपल्या घरात धनधान्याची वृद्धी होते.
पहिले झाड आहे कडीपत्त्याचे झाड. (मीठानीम) हे झाड आपल्या अंगणात असणे शुभदायी मानले जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा जाते. हे झाड बी रोपण करून लावतात. या झाडास जास्त पाणी देऊ नये. मुळे खराब होतात. दहा ते पंधरा दिवसांत खत नक्की घाला.
कढीपत्ता चे झाड लावायला फार मेहनत लागत नाही. प्रखर उन्हात कढीपत्ता लावू नये. एकाच मोठया झाडावर खूप बिया येतात.खाण्यामध्ये, केसांच्या तक्रारीवर, चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी कढीपत्त्याचा उपयोग केला जातो.
दुसरे रोप आहे तुळशीचे रोप. तुळशीचे शास्त्रातील महत्त्व आपण सगळे जाणतोच. तुळशीचे रोप हे आपण बियांपासून किंवा फांदी खुडूनही लावू शकतो. अंगणात तुळस लावणे हे शुभ आहे. दारात तुळस असणाऱ्या घरात साक्षात लक्ष्मीचा वास असतो. त्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.
आयुर्वेदातही तुळशीचे पानं-मंजिरी-खोड याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अत्यंत पवित्र असलेली तुळस आजूबाजूचे वातावरण निरोगी ठेवण्यास मदत करते. वेगवेगळ्या प्रकारच्या काढ्यामध्ये ही तुळशीचा खूप उपयोग होतो.
तिसरी वनस्पती आहे, रुई(आकडा).पांढरी रुई आणि जांभळी रुई अशी दोन प्रकारची रुई असते. जागोजागी आपल्याला रुईची झाडे आढळतील. गणपतीच्या पूजेत रुईचा वापर केला जातो. शनिवारी मारुती-शनी यांनादेखील रुईच्या पानांचा हार वाहिला जातो. सांधेदुखी, गुडघेदुखी यावर रुईची पाने गरम करून लावल्यास प्रभावशाली आहेत.
अत्यंत शुभ असलेली रुई ही तुमच्या अंगणात असलीच पाहिजे. चौथ झाड आहे, आवळा. आवळ्याच्या झाडावर महालक्ष्मीचा वास असतो. गुड नाईट सुद्धा तुम्ही आवळ्याचे झाड लावू शकता. एखादी जागा असल्यास तर आवळ्याचे झाड नक्कीच लावा. विटामिन सी चे भांडार असलेला आवळा आयुर्वेदात खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही दररोज एक आवळा खाल्ला तर तुम्हाला कुठलाही रोग होणार नाही. केस काळे राहतील.
तुम्ही निरोगी राहाल. ज्या अंगणात आवळ्याचे झाड असेल तेथे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहील. पाचव रोपं आहे, पारिजातक. अत्यंत सुंदर दिसणारे सुवासिक असं पारिजातकाचे फुल देवपूजेत ही वाहिले जाते. या झाडाच्या अंगणात असल्याने वातावरण प्रसन्न राहते. घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर राहतो. रोज अंगणात पडलेला पारिजातकाच्या फुलांचा सडा पाहूनही मन प्रसन्न होते.
ही पाच झाडे तुमच्या अंगणी नक्की लावा. टीप : रोपं लावल्यावर त्याला उगीच जास्त पाणी देऊ नये. मुळं खराब होतात. पिवळी झालेली पाने वेळोवेळी खुडावीत. असे केल्याने रोपं बाहरतात. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेलच..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.