आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे म्हणा किंवा आपल्या हलगर्जीपणामुळे म्हणा, त्वचेवर खाज येणे, डाग उठणे तसेच सोबत खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या त्वचे संबंधित रोगांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या वेळेत त्वचेची निगा न राखल्यामुळे स्वच्छता न केल्यामुळे अशा गोष्टी उद्भवतात. आपल्या काही वाईट सवयी आपल्याला नडत असतात. जसे बाहेरून आल्यावर हात पाय तोंड न धुता घरात वावर करणे.
घाणीत राहणे वेळोवेळी कमीतकमी पाण्याने वॉश करून देखील त्वचा न धुणे. प्रायव्हेट पार्ट साफ न करणे. किटानुच्या संपर्कात येऊन तुम्हाला त्वचे संबंधित खरूज नायटा गजकर्ण खाज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. यावर बाजारामध्ये अनेक मलम आणि औषध गोळ्या उपलब्ध आहेत.
परंतु जास्त गोळ्या खाऊन आपल्या शरीराची तब्येत बिघडते याशिवाय अनेक प्रकारच्या बाजारातील मलमांमुळे त्वचा खराब होऊ लागते कारण यामध्ये विभिन्न प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरलेले असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे सर्वच मलम सगळ्यांना सूट होतील असे नाही. रासायनिक पदार्थ नेहमीच शरीराला हानिकारक असतात. अशात तुम्ही घरगुती उपायांचा प्रयोग करावा.
ज्यात अजिबात केमिकल नसतात. हे उपाय स्वस्त असून लागणारी सामग्री देखील सहज उपलब्ध होते शिवाय यांचा कोणताही साईड-इफेक्ट नसतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लागणार आहेत. पहिला घटक हळद होय. हळद प्रत्येक स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होते. हळदीमध्ये अँटीबॅक्टरियल व अँटीफंगल गुणधर्म असतात. हळदी च्या मदतीने कठीणात कठीण डाग देखील दोन दिवसात संपतो.
हळद कॅल्शियम मॅग्नेशियम विटामिन इ विटामिन डी यांसारख्या घटकांनी समृद्ध आहे. ज्याच्या मदतीने कोणत्याही प्रकारची त्वचेची समस्या अगदी सहज दूर करता येते. या उपायासाठी दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे गुलाब पाणी. किती इंफेक्टेड त्वचा आहे यानुसार हळदीचे प्रमाण कमी जास्त करावे. यामध्ये थोडेसे गुलाब पाणी आणि साधे पाणी घालून एक बेस्ट बनेल इतके घट्ट पातळ करावे.
मिश्रण खूप पातळ करू नये अथवा खूप घट्ट असू नये. ही पेस्ट संबंधित त्वचेवर जिथे डाग खाज गजकर्ण नायटा यांसारखे इन्फेक्शन आहे त्या जागेवर बोटाने हलक्या हाताने लावा. पाय करण्यापूर्वी संबंधित त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन कोरडी करायला विसरू नका. केवळ दोन दिवसाच्या प्रयोगाने तुम्हाला खूप फरक पडेल..! तुमच्या त्वचेची काळजी घ्या. स्वस्थ रहा..
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.