या वनस्पतीचा धूर अनेक आजारांवर आहे गुणकारी.! अनेक लोक यामुळे अनेक आजारातून वाचले आहेत.! सर्दी ताप खोकला त्वरित होईल बरा.!

आरोग्य

आयुर्वेदाच्या मदतीने मोठ मोठाले आजार देखील बरे केले जावू शकतात.आपल्या परिसरात अनेक छोट्या मोठ्या वनस्पती आढळतात. आपल्याला या औषधी वनस्पतींचे चमत्कारिक गुणधर्म माहित नसतात व आपण यांना दुर्लक्षित करुन फेकून देतो. यातीलच एक म्हणजे गुळवेल. या वेलीचे खोड लांब धाग्यांसारखे आणि बोटांएवढे जाड असून त्यावरील सालंही पातळ आणि त्वचेप्रमाणे असतात. काही कालावधीनंतर त्याची साले निघतात.

या वेलीच्या खोडातील आतला भाग चक्राकार दिसून येतो. वेलीची हिरवीगार मुळे फुटून खाली लोंबताना आढळतात. पानांचा आकार हा हृदयाकृती आणि रंग हिरवागार असतो. वेलीची पानं हाताला गुळगुळीत लागतात आणि देठ लांबच लांब असतात, याला येणारी फुले ही पिवळसर-हिरवी असून नियमित येतात. यामध्ये वनस्पती मध्ये अनेक आजार बरे करण्याची क्षमता असते. त्यामुळे गुळवेलला या धरती वरच्या अमृतासमान मानले जाते.

सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे गुळवेल हे झाडाला अगदी मिठी मारून वाढते. त्यामुळे त्या झाडाचे औषधीय गुणही गुळवेलामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे जर कडुलिंबाच्या झाडावर गुळवेल वाढवली तर ती अत्यंत लाभदायी मानली जाते. आपल्या आस पास ही वनस्पती अगदी सहज उपलब्ध होते. प्रतिकारशक्ती कमी होणे हेच मुळात आजारी पडण्याचे मुख्य कारण आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो.

हे वाचा:   उपाशीपोटी मनुके पाणी सेवन केल्याने काय झाले.? त्यानंतर जे घडेल ते पाहून थक्क व्हाल.! शरीरात बनले...

कोणताही आजार हा आपल्याला प्रतिकारशक्ती कमी झाल्यावरच होतो. त्यानुसार तुम्ही गुळवेलचे सेवन करू शकता. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गुळवेल अत्यंत लाभदायी आहे असं आयुर्वेदातही सांगण्यात आले आहे. यामध्ये इम्यूनोमॉड्युलेटरी नावाचा घटक अधिक आढळतो. जो प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो. आपल्या पैकी अनेकांना वारंवार सर्दी व खोकल्याचा त्रास होत असतो याचे मूळ कारण म्हणजे आस पासच्या परिसरात वाढत असलेले प्रदूषण आणि अनियमित बाहेरचे अरबट सरबट खाद्य पदार्थ.

या समस्येवर सारखे डॉक्टरकडे धाव घेणे देखील योग्य नाही. या साठी आपण गुळवेलीच्या खोडापासून एक अत्यंत रामबाण उपाय तयार करु शकतो. तुम्हाला होणारी वारंवार सर्दी याच्या एका वापराने गायब होईल. हा नैसर्गिक उपाय असल्याने याचा काही वाईट परिणाम देखील दिसून येत नाही. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम गुळवेलीचे एक ताजे खोड घ्या. या खोडाला तुम्ही उन्हात सात ते आठ दिवस चांगले सुकवून घ्या.

या गुळवेलीच्या ओल्या खोडाला पाण्यात टाकून प्यायल्यास शरीरातील आम्ल पित्त गायब होईल. या सोबतच पोटाच्या देखील ज्या काही बाधा असतील तर त्या ही अगदी क्षणात गायब होतील. बरीचशी आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी या गुळवेलीच्या रसाचा वापर केला जातो. आज आपण याच गुळवेलाच्या खोडा पासून हा उपाय तयार करायचा आहे. आता हे सुकलेले खोड बारीक कापून घ्या. पुढे हे एका तांब्याच्या भांड्यात घ्या व याच्या तुकड्यांना पेटवा.

हे वाचा:   जे लोक रात्री खूप जागत असतात अशा लोकांना होत असतात असे भयंकर आजार.!

आता डोक्यापर्यंत चादर घ्या व या भांड्याच्या द्वारे येणारा धुर नाकाने ग्रहण करा. हा धुर आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतो. यात असणार्या गुणधर्मांमूळे तुम्हाला असणारी कोणत्या ही प्रकारची सर्दी समूळ नष्ट होईल. आपल्या पैकी अनेकांना डोकेदुखीचा त्रास असतो तर काहींना अर्ध शीश म्हणजे अर्धवट डोकेदुखीचा त्रास असतो. मात्र हा धुर तुम्ही आठवड्यातून चार वेळा घेतलात तर तुम्हाला असणार्या या समस्या नैसर्गिक पद्धतीने नष्ट होवून जातील.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.