नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. तुम्हाला नेहमीच थकल्यासारखे वाटते का? रात्री वेळेत झोप लागत नाही का किंवा लागल्यास अधून-मधून जाग येते का? हाडव सांधेदुखी अशाप्रकारे दुखण्याचा त्रास होत असल्यास आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अत्यंत रामबाण असा उपाय. ज्यामुळे शरीराचा सर्व प्रकारचा थकवा आणि ताण जाऊन दुखणे होईल गायब.
तुमची तब्येत कितीही कमजोर असेल तरीदेखील तुम्ही हा उपाय करून बघाच. या उपायामुळे अगदी कंबर दुखी मान दुखी देखील थांबेल. हा उपाय बनवण्याचा विधी आणि खाण्याची पद्धत आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगू. हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणारा घटक आहे बाभळीचा डिंक. डिंकामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असतात.
आपल्याकडे बा’ळंतिणीला देखील डिंकाचे लाडू देण्याची पद्धत आहे. यामुळे शरीरात शक्ती- ताकत, मजबुती येते. यामुळे पोटातील जंत खोकला घशातील खवखव दूर होतो. डिंक हा प्रकृतीने उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये याचे सेवन फायदेशीर ठरते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी, आरोग्य चांगले राहण्यासाठी डिंकाचे सेवन करणे अत्यंत लाभदायक ठरते.
यामुळे पचनक्रिया देखील सुरळीत होण्यास मदत होते यासोबत पोटाच्या इतर तक्रारी देखील दूर होतात. विटामिन डी ची कमतरता असलेल्या लोकांनी डिंक अवश्य सेवन करावा. शरीराची झीज आणि जखम भरून काढली जाते डिंकाच्या सेवनाने. यामुळे स्नायूंना बळकटी देखील येते. मधुमेह कर्करोग वजन कमी करणे तणाव मू’त्रपिंडांच्या आरोग्य यासारख्या अनेक समस्यांवर आपण मात करू शकतो बाभुळच्या डिंकामुळे.
या उपायासाठी दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे बदाम. बदाम खाण्याचे फायदे नव्याने सांगायला नकोच हे सर्वश्रुत आहेत. विटामिन कॅल्शियम फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात बदामामध्ये. हाडं बळकट होऊन शरीराला योग्य ते पोषण मिळते. आता पाहुयात हा उपाय मुख्यत्वे करायचा कसा ते?
एका कढईमध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप घालून कढई गरम करा. तूप चांगल्याप्रकारे गरम झाल्यावर त्यामध्ये दोन चमचे बाभळीचा डिंक घाला.
डिंक हळूहळू फुलू लागेल तो चमच्याने सतत हलवत रहा. हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्या. बारीक बाभळीचा डिंक घेतल्यावर तो व्यवस्थित भाजता येतो. मोठा डिंक तळायला अवघड जातो. डिंक व्यवस्थेत भाजल्यावर बाजूला काढून घ्या त्यानंतर त्याच साजूक तुपात एक मूठभर बदाम घाला. बदाम देखील व्यवस्थित भाजून घ्या. यानंतर तिसरा घटक म्हणजे यामध्ये दोन चमचे मगज चे बी घाला. यासोबत दोन चमचा खसखस घाला.
हे व्यवस्थित अधून मधून हलवत रहा. त्यानंतर दोन चमचे सफेद तीळ घाला. खसखस मुळे तुम्हाला झोप चांगली लागेल तर त्यामुळे सांधे दुखी हाड दुखी यांची समस्या कमी होईल. हे सर्व भाजून झाल्यावर बाजूला काढा. त्याच कढाई मध्ये नंतर 200 ते 250 ml दूध गरम करायला ठेवा. दुसरीकडे यादी भाजून घेतलेले सारे जिन्नस मिक्सर मध्ये बारिक वाटून घ्या. ही तयार होईल तुमची खास पावडर. यामध्ये गोड काही नसल्यामुळे शुगर डायबिटीस असलेले पेशंट देखील हे खाऊ शकतात.
अधून मधून थकवा आल्यावर ही पावडर तुम्ही वापरू शकता. सात दिवसासाठी मिश्रण तुम्ही बनवू शकता. या पावडर मध्ये तुम्ही अर्धा चमचा सुंठ पावडर घाला. यानंतर पाव चमचा जायफळ पावडर घाला. अधिक स्वादासाठी अर्धा चमचा वेलची पावडर घाला. यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर व अर्धा चमचा दालचिनी पावडर घाला. दुसरीकडे दूध गरम झाले असल्यास त्यामध्ये शुगर नसलेल्यांनी धागा असलेली खडीसाखरेचा वापर करून आवडीप्रमाणे दूध गोड करा.
यानंतर या दुधात सर्व पावडर घालून चमच्याने मिक्स करा. सुमारे दहा मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. एका वेळेस दोन ते तीन चमचे हे मिश्रण तुम्ही सेवन करू शकता. यासोबतच तुम्ही एक ग्लास दूध घ्या. आठवड्याभराताच तुम्हाला खूप उत्साह वाटेल. प्रत्येक प्रकारची कमजोरी थकवा यामुळे होईल दूर…! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.