सुंदर दिसण्यासाठी नको ते प्रयोग येऊ शकतात अंगलट.! रोज रोज मेकअप करणारे एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

मेकअप करणे कुणाला नाही आवडत? प्रत्येक महिला ही आपण इतर महिलांपेक्षा अधिक सुंदर दिसावे म्हणून स्वतः च्या सौंदर्याकडे खूप लक्ष देत असतात. बाजारात अनेक प्रकारचे सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग करून स्वतः ला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत असतात. मेकअप मुळे सुंदरता ही अधिक खुलते हे नक्कीच बरोबर आहे परंतु यामुळे काही शरारिक नुकसान होण्याची शक्यता असते.

काजळ चा उपयोग अनेक महिला डोळ्यात लावण्यास करत असतात. परंतु तुम्हाला काजळ चे शरारिक नुकसान माहिती आहे का? काजळ लावणे हा मेकअपचा महत्त्वाचा भाग मानला जातो. यामुळे डोळे खूप सुंदर आणि मोठे दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का की रोज काजळ लावणे तुमच्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. महिलांच्या डोळ्यांना सौंदर्य देण्यासाठी आजकाल बाजारात काजळचे अनेक प्रकार मिळतात.

हे वाचा:   खरबूजाचा नको असलेला हिस्सा तुमचे आरोग्य सुधारेल.! याचे असे फायदे जे तुम्हाला या रखरखत्या उन्हापासून वाचवेल.!

मात्र त्यामध्ये केमिकलचे प्रमाण जास्त असू शकते, ज्यामुळे डोळ्यांना ऍलर्जी आणि डोळे कोरडे होण्याचा धोका निर्माण होतो. काजळमध्ये पारा, शिसे आणि पॅराबेन्स सारख्या घटकांचा वापर केला जातो, ज्यामुळे डोळ्यांमध्ये नेत्रश्लेष्मलाशोथाचा त्रास होऊ शकतो, त्याला ‘कंजक्टिव्हायटिस’ असेही म्हणतात. रोज काजळ लावल्याने डोळ्यांची ऍलर्जी, कॉर्नियल अल्सर आणि डोळे रंगू शकतात. एवढेच नाही तर डोळ्यांच्या आत सूज येण्याचाही धोका असतो.

अशा वेळी आम्ही तुम्हाला हा सल्ला देणार नाही की तुम्ही काजळ नका लावू आम्ही तुम्हाला आज घरगुती काजळ जे तुम्हाला कमी धोका पोहचवेल असे काजळ घरीच कसे तयार करावे याबाबत माहिती देणार आहोत. असे काजळ जर तुम्ही घरीच बनवले आणि त्याचा उपयोग केला तर तुम्हाला नक्कीच भरपूर असा फायदा होईल. यात काही शंकाच नाही. चला तर मग बघुया कसे बनवले जाते काजळ.

हे वाचा:   या वनस्पतीला चमत्कारच म्हणावे लागेल.! या काटेदार वनस्पतीने अनेक लोकांचे हे प्रॉब्लेम केले आहेत दूर.! हे रोग कायमचे जातील.!

काजळ बनवण्यासाठी सर्वप्रथम दिवा पेटवून ठेवावा, त्यानंतर दोन्ही वाट्या बाजूला ठेवाव्यात आणि नंतर ताटात थोडे तूप लावून त्यावर वाटी ठेवावी. यानंतर, 20 ते 30 मिनिटांसाठी काजळी प्लेटमध्ये बाहेर पडेल. तुम्ही ती बाहेर काढून बॉक्समध्ये ठेवू शकता. त्यात खोबरेल तेलाचा एक थेंब घाला आणि चांगले मिसळा. अशा प्रकारे तुमची घरगुती काजळ तयार होईल. अशा प्रकारे तुम्ही घरगुती काजळ बनवून होणारे नुकसान टाळू शकता.

असे काजळ देखील काही लोकांना नुकसान पोहचवू शकते त्यामुळे आपण त्यामुळे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हा उपाय करावा. Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *