मित्रांनो आज वर आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनीच कधी ना कधी सर्दी खोकला घसा खवखवणे अचानक ताप येणे यांसारख्या समस्यांना तोंड दिलेच आहे. आपल्यापैकी काही लोक हे अंगावर काढतात तर काही लोक त्वरित डॉक्टर कडे जाऊन गोळ्या औषध खातात. परंतु तुम्हाला माहित आहे का अशा वारंवार गोळ्या औषध खाण आपल्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने बरं नव्हे. असे रोग तर अंगावर मुळीच काढू नयेत.
एकतर हे रोग होऊच नये याची विशेष काळजी घ्यावी झाल्यास त्वरित संबंधित आयुर्वेदिक व घरगुती उपाय करून अशा प्रकारचे त्रास कमी करण्याचा प्रयत्न करा. भयंकर सर्दी नाक गळतीमुळे खोकला येतो खोकला मुळे घसा दुखतो यामुळे डोकं दुखते आणि हे सर्व आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम करतात. अशी ही समस्येची साखळी असते. त्याकरता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास उपाय आणि टिप्स.
अशाप्रकारे घ्या तुमच्या आरोग्याची काळजी. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे काळीमिरी. काळी मिरी चा सेवनाने गॅससेची समस्या दूर होते तसेच सतत खोकल्याचा त्रास होत असेल तर काळी मिरी चे सेवन लाभदायक ठरते. फुफ्फुसात तसेच श्वसन नलीकांमध्ये संसर्ग झाल्यास काळी मिरी लाभदायक ठरते. घसा बसला असेल तरीदेखील काळी मिरी चा फायदा होतो.
अतिप्रमाणात सर्दी-खोकला यानी त्रस्त असलेल्या लोकांनी मधासोबत काळीमिरी च्या पावडरी चे सेवन करावे. यामुळे खोकला लवकर बरा होऊन सर्दी देखील कमी होते. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या काड्या मध्ये देखील काळी मिरी चा वापर केला जातो. प्रकृतीने उष्ण असल्यामुळे याचे प्रमाण काय असावे याबद्दल आम्ही तुम्हाला विस्तृत माहिती सांगणार आहोत.
या उपाया मध्ये दुसरा घटक आहे तो म्हणजे आलं. ऋतुमानातील बदलांमुळे पटकन सर्दी होण्याची समस्या अनेक लोकांना असते. भाजी किंवा चहा मध्ये आपण रोज आलं वापरतच असतो. यामुळे शरीराला खूप फायदा होतो. तिसरा घटक आहे तुळस. तुळस सर्दी-खोकला कफ सर्व प्रकारच्या इ’न्फे’क्श’न मध्ये अत्यंत गुणकारी वनस्पती आहे असे आयुर्वेद सांगते. ज्यांना छातीमध्ये खूप प्रमाणात कफ झाला आहे त्यांनी या उपायांमध्ये तमालपत्र चा देखील वापर करावा.
एका चहाच्या भांड्यामध्ये एक ग्लास म्हणजेच 200ml पाणी घालून मंद आचेवर गॅसवर गरम करायला ठेवा. त्यामध्ये चार ते पाच तुळशीचे पान पाण्याने स्वच्छ धुऊन यामध्ये घाला. यानंतर यामध्ये सुमारे एक इंच आलं बारीक वाटून अथवा किसून घाला. दोन ते तीन छोटे तुकडे दालचिनीचे घालावे. लक्षात ठेवा प्रमाण सांगितल्याप्रमाणेच घ्यावे अन्यथा पोटात उष्णता भडकण्याची शक्यता आहे.
त्यानंतर यामध्ये एक इलायची, एक लवंग आणि एक काळी मिरी घालावी. एक छोटं तमालपत्र धुवून घाला. यानंतर यामध्ये एक छोटा तुकडा गुळाचा घालावा. मधुमेह असलेल्यानी गुळाचा वापर करू नये. हे पाणी सुमारे अर्धा ग्लास राहील इतके उकळावे. यानंतर गाळणी च्या मदतीने हे पेय गाळून घ्यावे. हे पेय हलके सर कोमट झाल्यावर यामध्ये एक चमचा मध घाला. मध एच्छीक आहे.
हे पेय तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे. कितीही भयंकर सर्दी असेल तरीदेखील होईल ठीक. गळणारे नाक, बंद झालेले नाक होईल ठीक… आपल्या आरोग्याची काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.