वजन कमी करणे पडू शकते महागात.! वजन कमी करण्याची अशी पध्दत कधीही करू नका.! वाढलेल्या वजनाला कमी करणारे नक्की वाचा.!

आरोग्य

by hook or by crook आपली उंची, वय आणि शरीराचा बांधा (bone structure) लक्षात घेऊन वजन आटोक्यात असणे हे योग्यच आहे किंबहुना ते असायलाच पाहिजे. पण हे करण्यासाठी अनेकांची वाट्टेल ते करण्याची तयारी असते. मग त्याचा long term आपल्या शरीरावर मनावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्याची आवश्यकताही वाटू नये ? बाह्यरूप, दिसणं इतकं महत्वाचं आहे का?

कि आतून शरीर पोखरलं जातंय हे ही लक्षात येऊ नये? ‘व्यायाम नको’, ‘संतुलित आहार नको’ फक्त पावडरी किंवा शेक घ्या आणि अकाळी म्हातारे व्हा. सध्या अशा प्रकारच्या प्रॉडक्ट्सचं भरपूर मार्केट आहे. त्यात profit percentage पण भरपूर त्यामुळे त्याचा business करणारे पण भरपूर. करायला सोप्प. जेवणाला replacement. त्यामुळे स्वयंपाकाचे कष्ट नको.

अशा प्रकारच्या पद्धतीत आपली नैसर्गिक digestive system आहे त्याला आपण कलाटणी देतो. दीर्घ काळानंतर आपली पचनसंथा collapse / कमकुवत होते. शरीराला आवश्यक असणारे micro nutrients आणि vitamins न मिळाल्याने अकाळी वृद्धत्व येते. अनेक व्याधी ज्या साधारणपणे वयाच्या साठीनंतर दिसतात त्याची लक्षणे आधीच दिसू लागतात.

हे वाचा:   लाखो रुपयांचे औषधे घेण्यापेक्षा एकदा ही वनस्पती घ्या, फायदे पाहून डॉक्टर देखील हैराण आहेत.!

अती तेथे माती : व्यायाम केल्यामुळे calories जाळल्या जातात. त्यामुळे जेवढा जास्त व्यायाम तेवढ्या जास्त calories जळतात. बरं व्यायाम, संतुलित आहार या बरोबर शरीराला विश्रांतीची तितकीच गरज असते. ती नाही मिळाली तर negative results दिसू लागतात. त्याचप्रमाणे जर आपली शारीरिक क्षमता लक्षात न घेता अघोरी केला तर त्यामुळे अनेकांना गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे त्रास इ.

अनेक गोष्टींचा त्रास सुरु होतो आणि सुसाट सुटलेली गाडी मोडून बंद पडते. क्रॅश डाएट किंवा फॅड डाएट: अनेक डाएट प्लॅन्स आजकाल चर्चेत असतात. जसं G.M Diet, Zero Carb Diet, Keto Diet, Vegan Diet इ. हे प्लॅन्स कोणी, का आणि किती काळासाठी करायचे हे जाणून न घेताच जर आपण महिनों महिने तेच करत बसलो तर शरीराला त्याची किंमत मोजावी लागणार. आहारतज्ञांच्या सल्ल्याशिवाय अशा पद्धतीचे डाएट प्लॅन्स करू नयेत.

कमी खा, जास्त व्यायाम करा – शरीराची झीज पक्की जेव्हा लोकांना सुचवलं जात की डीएटीशीअन ला भेटून diet consultation घ्या. तर काही लोक सांगतात की माझं खाणं कमीच आहे. मी फक्त अर्धी पोळी खाते. अहो पण कमी खाणे किंवा अर्धी पोळी खाणे ह्याला आपण डाएट म्हणू शकतो का?
कमी खाणे म्हणजे diet नव्हे.

हे वाचा:   फक्त पाच पाने, दोन दिवसात मुतखडा ल'घवी वाटे बाहेर पडेल.!

diet म्हणजेच आहार म्हणजेच आपल्या शरीराला आवश्यक असणारा, शरीराला आवश्यक मूलद्रव्य पुरवणारा, शरीराची झीज भरून काढणारा, आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी, ऊर्जा पुरविण्यासाठी आवश्यक असणारा संतुलित आहार म्हणजेच डाएट.

ह्या व्यतिरिक्त अनेक surgical पद्धती वजन कमी करण्यासाठी वापरतात. परंतु ते तितकेसे सेफ नाही. तेव्हा स्वस्थ खा मस्त रहा व्यायाम करा…! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *