क’रो’ना नंतर अनेकजणांनी घरात केक बनवायला शिकले आहे. ते हा प्रत्येकाच्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे बाजारामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे केक हमखास मिळत असतात. बर्थडे पार्टी, एखादे सेलिब्रेशन, प्रमोशन या सर्वांच्या वेळी आपल्याला केक आवर्जून लागतो. बेकरी मध्ये असलेला केक आपण अनेकदा खात असतो.
पण गॅस शिवाय केक कसा बनवायचा हे अनेक जणांना माहित असेल तर आज आपण शिकणार आहोत घरगुती केक पन तो देखील गॅस शिवाय कसा बनवायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया हा केक बनविण्यासाठी आपल्याला घरातील कोण कोणती सामग्री लागणार आहे. आणि हा केक बनविण्यासाठी ची प्रक्रिया काय असेल.
सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला हा केक बनविण्यासाठी गॅसची गरज अजिबात भासणार नाही. त्याचबरोबर हा केक फक्त दहा मिनिटांमध्ये देखील बनवला जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड, डेरी मिल्क, आणि ओरिओचे बिस्किट घ्यायचे आहे. या केवळ तीन गोष्टींमध्ये आपला केक दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम ब्रेडच्या कडा कापून घ्यायच्या आहेत.
हा केक बनविण्यासाठी आपल्याला नऊ ब्रेड लागणार आहेत. ब्रेडच्या कडा कापून झाल्यानंतर आपल्याला तीन-तीन ब्रेड स्लाईसचे तीन भाग करायचे आहेत. त्यामधील एका भागाला तसेच राहू द्यायचे आहे तर उरलेल्या दोन भागाला अर्धगोलाकार आकारांमध्ये कापून घ्यायचे आहे. त्यानंतर तीन स्लाइसच्या एका भागाला मध्ये ठेवून त्याच्यावर ते अर्धगोलाकार आकारात कापून घेतलेले भाग त्याच्यावर लावून आपल्याला एक हार्ट शेप तयार करून घ्यायचा आहे.
जेणेकरून आपण जो केक बनवणारा होतो अजून आकर्षक दिसेल. त्यानंतर ओरिओ मधील क्रीम बाजूला काढून होतील बिस्किटे मिक्सरला लावून त्यामध्ये थोडेसे दूध टाकून थोडीशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे सोबतच आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये एक ते दोन चमचे साखर घेऊन ती पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे.
त्यानंतर आपण तीनच्या थरात तयार केलेला ब्रेड च्या शेवटच्या थराला प्रथम साखरेचे पाणी लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तयार करून घेतलेली क्रीम म्हणजेच ओरिओची पेस्ट लावून घ्यायची आहे. असे प्रत्येक घराच्या आधी आपल्याला साखरेचे पाणी लावायचे आहे, जेणेकरून आपला केक मउ राहण्यास मदत होईल. त्यानंतर त्यावर दुसरा थर ठेवून दुसऱ्या थराला देखील ओरिओची क्रीम लावायची आहे आणि शेवटी म्हणजे तिसऱ्या थरावर देखील आपल्याला उरलेली सर्व ओरिओची क्रीम लावायची आहे.
बनवुन घेतलेल्या हार्ट शेपच्या थरांना कडेने देखील ही क्रीम लावायची आहे. त्यानंतर हा केक थोड्यावेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि तोपर्यंत आपण घेतलेली डेरीमिल्क बारीक किसून घ्यायची आहे. जर डेरीमिल्क थोडीशी पातळ झाली असेल तर दोन मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून नंतर ती किसून घ्यायची आहे. आता त्यानंतर केक फ्रीजमध्ये ठेवून तीन ते चार मिनिटे झाल्यावर तो बाहेर काढून त्यावर किसून घेतलेली डेरीमिल्क टाकायची आहे.
अशाप्रकारे सजवायचे आहे की ते अधिक आकर्षक दिसेल. सोबतच आपण ओरिओ मधून काढून घेतलेली क्रीम छोटे छोटे गोळे करून किंवा त्याचा गोलाकार असा शेप देऊन आपण केक वर सजवायचा आहे जेणेकरून आपला केक अजून चांगला दिसेल. केकच्या वर टाकण्यासाठी आपण चेरीचा, जेम्स चा, की व्या छोट्या-छोट्या रंगीबिरंगी स्प्रिंकल्स देखील वापर करू शकतो.
एवढे करुन झाल्यावर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा केक फ्रिजमध्ये देखील ठेवून नंतर खाऊ शकता किंवा असाच देखील खाऊ शकता. हा केक चवीला अत्यंत स्वादिष्ट लागतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.