जर तुम्हाला खूप दिवसापासून खाज, खरूज, नायटा यासारखे त्वचाविकार झाले असतील आणि या त्वचाविकारांवर उपचार पद्धती करून तुम्ही जर थकलेले असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत. हा घरगुती उपाय केल्याने काही दिवसांमध्ये तुमच्या शरीरावर असलेल्या कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार पूर्णपणे नष्ट होणार आहे. तुमची त्वचा पहिल्या पेक्षाही सुंदर बनणार आहे.
आज आपण जो उपाय करणार आहोत त्यासाठी नैसर्गिक पद्धतीचे काही उपाय करणार आहोत व जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थांचा वापर करून देखील आपल्याला शंभर टक्के नैसर्गिक रित्या फरक देखील पडणार आहे. हा उपाय केल्याने आपल्याला शंभर टक्के फरक पडणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय केल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. हा उपाय अतिशय साधा सोपा व तितकाच प्रभावी आहे.
अंगावर आपल्या खाज, खरूज,नायटा यासारख्या समस्या उद्भवल्या वर आपण औषधे उपचार करतो परंतु अनेकदा औषध सेवन केल्यावर आपल्या तात्पुरता फरक जाणवतो परंतु नंतर पुन्हा आपल्या अंगावर लाल चट्टे व फोड्या येऊ लागतात आणि प्रभावी जागेवर खाज देखील भरपूर प्रमाणात येते. असे तुमच्या बाबतीत सुद्धा घडत असेल तर आज आम्ही तुम्हाला जे उपाय सांगणारा आहोत ते तुम्ही काही दिवस केले तर तुम्हाला लवकरच फरक जाणून येईल.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरावर घाम जास्त प्रमाणात येतो. घाम आल्यावर आपण अनेकदा या घामाकडे दुर्लक्ष करतो.घाम सुकल्यावर त्यावर धूळ बसते आणि अनेकदा त्या प्रभावित जागेवर आपल्याला खाज येते. जर या खाज कडे दुर्लक्ष केले तर आपल्याला खाज जाणवत नाही परंतु खाजे कडे लक्ष दिल्यानंतर आपण प्रभावित जागेवर खाजवल्यावर किती वेळा वारंवार खाजवायला हवे असे आपल्याला वाटू लागते.
आपण पुन्हा त्या जागेवर खाजवतो परिणामी आपल्या नखांच्या इन्फेक्शनमुळे ती जागा लाल होऊन जाते आणि त्या जागेवर जास्त खाज येते आणि म्हणूनच या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला घामाची विशिष्ट काळजी देखील घ्यायची आहे. जर तुम्हाला वारंवार घाम येत असेल तर तो कपड्याने पूसायचा आहे अन्यथा घामामुळे देखील खाज येऊ शकते.
आता आपल्याला एक काचेची वाटीत घ्यायची आहे आणि त्या काचेच्या वाटेमध्ये आपल्याला कडुलिंबाचे तेल टाकायचे आहे. कडुलिंबाचे तेल बाजारांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होते त्याच बरोबर तुम्ही घरच्या घरीदेखील कडुनिंबाचे तेल बनवू शकता. आपल्या आजूबाजूला कडूलिंबाचे झाड अनेकदा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर कडुलिंबाच्या झाडाचे अनेक औषधी गुणधर्म मानवी शरीरासाठी लाभदायक ठरले आहे.
कडूलिंबा मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात त्याचबरोबर अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात त्यानंतर आता आपल्याला डेटॉल घ्यायचे आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. याचा उपयोग अनेकदा अँटी सेप्टिक म्हणून केला जातो व त्याच बरोबर आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे सूक्ष्मजीव,विषाणू, किटाणू असतील तर ते नष्ट करण्यासाठी अनेकदा डेटॉल चा वापर केला जातो.
डेटॉल लावल्याने आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल तर ती जास्त पसरत नाही आणि म्हणूनच आपल्याला एक चमचा डेटॉल वापरायचा आहे आणि दोन ते तीन चमचे कडुलिंबाचे तेल घ्यायचे आहे. आता आपल्याला हे दोन्ही पदार्थ एकत्र करायचे आहे आणि त्यानंतर तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे डाबर हरा पुदिना. हा पुदिना आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये गोळ्यांच्या स्वरूपामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतो.
या पुदिना च्या गोळ्या नैसर्गिक रित्या प्रवृत्तीच्या असतात आणि म्हणूनच जर आपल्या कोणत्याही प्रकारची जखम झालेली आहे आणि त्यामुळे जळजळ होत असेल तर या सगळ्या समस्या पुदिना मुळे देखील यामुळे दूर होतात. आता आपल्याला पुदिना च्या गोळ्या बारीक फोडून त्या रसामध्ये मिक्स करायचे आहे. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे.सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्याला पूर्ण शरीर स्वच्छ पुसून कोरडे करायचे आहे.
त्यानंतर ज्या ठिकाणी खाज खरूज नायटा व प्रभावी जागा निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी आपल्याला हे मिश्रण लावायचे आहे परंतु हे मिश्रण लावताना आपल्याला हाताचा उपयोग करायचा नाहीये त्यासाठी आपल्याला कापूस घ्यायचा आहे.कापूस सुरुवातीला या मिश्रणामध्ये एक मिनिटं भिजवून ठेवायचा आहे आणि त्यानंतर कापसाच्या मदतीने आपल्याला हे मिश्रण प्रभावी जागेवर लावायचा आहे.
असे आपण एक दिवसाआड केल्याने तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झालेला आहे तो पूर्णपणे बरा होऊन जाणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.