आज कालच्या धावत्या जीवनात माणूस आपल्या कामात खूप व्यस्त झाला आहे. स्वतःच्या शरीराकडे लक्ष्य देण्यासाठी त्याच्या जवळ अजिबात वेळ नाही आहे. तथापि याच्या फल स्वरूप आज काल अनेक लोक आपला जेवण आहार कमी व गोळ्या-औषधे जास्त खावू लागली आहेत. आपल्या परिसरात, आपल्या घरी तसेच आपल्या शेजारी पाजारी कोणा ना कोणाला मधुमेह, प्रेशर, हृदयाचे विकार अथवा पित्त-अपचन असे त्रास असणे आता एक सामान्य समस्या बनली आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे आता लोकांना त्यांच्या या आजाराची सवय झाली आहे. रोजच बाजारतील कृत्रिम औषधे खात असाल तर तुमच्या शरीरावर या गोळ्या व औषधांचा वाईट परिणाम दिसू लागतो. होय हात-पाय सूजणे तसेच किडनीचे विकार होणे व मोठ्या प्रमाणात केस गळती या सर्व समस्येंसाठी या रोज आपण ग्रहण करण्यार्या गोळ्या व औषधे कारणीभूत आहेत.
आज आम्ही तुम्हाला या लेखात फिट राहण्यासाठी एक उत्तम व साधा सोपा उपाय सांगणार आहोत हा तुमच्या विकारांना मोठ्या मात्रेत कमी करण्यास नक्कीच मदत करेल चला तर वेळ न दवडता पाहूया हा उपाय. एकही रुपाया खर्च न करता होणारा व्यायाम प्रकार म्हणजे मॉर्निंग वॉक अथवा चालणे. हा उपाय सर्वाना करण्यासाठी सहज, सोपा आहे.हा असा व्यायाम प्रकार आहे जो कोणत्याही प्रकारच्या साहित्या शिवाय करता येतो.
आपले शरीर तंदुरुस्त, निरोगी तसेच मजबूत ठेवण्यासाठीचा हा एक उत्तम उपाय आहे. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हात असते ते आपल्या शरीराला रोज मुबलक प्रमाणात मिळू लागते. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक असे दोन्ही व्याया एकत्र होतात.
सतत काम करून आपल्या शरीराला आलेला थकवा हा चालण्यामुळे दूर होवू लागतो. चालण्यामुळे डोक्यातला तणाव आणि चिडचिडेपणा दूर करण्यास मोठी मदत होते. चालण्यामुळे आपल्याला झोपही चांगली लागते. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठी देखील चालणे फायदेशीर मानले गेले आहे. नियमित चालल्याने आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते.
चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जळतात व वजन संतुलत राहते. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे. चालण्यामुळे आपली पचन क्रिया देखील सुधारते. म’लबद्धतेसारखे पचनाचे मोठे विकार कमी होतात. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो.नियमित चालण्याची सवय असणा-यांमध्ये हृदयविकाराने मृ’त्यू येण्याचे प्रमाण कमी होवू लागते.
नियमित चालणा-यांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. त्याच बरोबर नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च र’क्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्रवी ग्रंथीचे कार्य सुधारते चालण्याच्या या कसरतीमुळे सुधारते. हाडांची मजबूतीही चालण्यामुळे वाधू लागते. नियमित चालण्यामुळे कंबर, गुढगे व पायाचे स्नायू बळकट होतात.
डोळ्यांसाथी देखील चालणे हा चांगला व्यायाम आहे याने डोळ्यात मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी होते. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरपासून शरीराचा बचाव होतो. नियमित चालण्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढू लागते. मिनिटे नियमित चालण्यामुळे तुमचे सरासरी आयुष्य तीन वर्षानी वाढते. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. चालण्याचा व्यायाम करताना वयाचा अडथळा कधीही येत नाही.
वय जरी नव्व्द असले तरीही ती व्यक्ती चालू शकते. फक्त त्यांना झेपेल एवढेच चालणे गरजेचे आहे. म्हणून तुम्ही देखील निरोगी शरीरासाठी चालण्याचा हा व्यायाम नक्की आचरणात आणा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.