काकडी खिरे खाताना ही चूक आजिबात करू नका.! नाहीतर कोणताच इलाज काम करणार नाही.! एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकजण काकडी खातात. काकडी हे फळ सर्वांना माहित असेलच. सगळे भाजीवाल्यांच्या दुकानात काकडी ही सहज मिळून जाते. काकडे ही वर्षाचे बारा महिने बाजारात उपलब्ध असते. काकडी आपल्या शरीराला खूप चांगली असते आणि काकडी चा फायदा देखील आपल्या शरीराला खूप होतो. काकडी आपल्या शरीराला शीतलता आणि ताजेपणा प्रदान करते.

काकडीला तुम्ही अनेक वेगवेगळा प्रकारे खाऊ शकता. जेसे सलाड, सँडवीच, किंवा तिखट मिठ लावुन खाऊ शकता.काकडीमध्ये 95 टक्के पाणी असते. यामुळे हे शरीरातील विषारी आणि अनुपयोगी पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करते. रोज काकडी खाल्याने रुक्ष त्वचेत ओलावा पुन्हा येतो. यामुळे काकडी सेवन हे नॅचरल मॉश्चरायजरचे काम करते. हे त्वचेतील तेल काढण्याची प्रक्रिया कमी करुन पिंपल्स येणे कमी करते.

काकडीमध्ये खूप कमी कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरी असतात, तसेच आपल्या शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. सालीसकट जर काकडीचे सेवन केले तर ते आपल्या शरीराला खूप फायदेमंद असते कारण काकडीचे सालीमध्ये फायबर, व्हिटॅमिन, मिनरल्सचे प्रमाण अधिक असते. काकडीमध्ये सगळ्यात कमी कॅलरीज असतात.

हे वाचा:   कितीही जुनाट मूळव्याध, अल्सर, पित्ताचा त्रास असु द्या.! दोन केळी पुरेशा आहेत.! चिमुटभर हा पदार्थ टाका आणि बघा जादू.!

त्यामूळे आपले वजन कमी करण्यासाठी देखील काकडीचा खूप फायदा होतो. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सिलीकॉन असते जे त्वचेला चमक मिळण्यासाठी खूप फायदेशीर असते.काकडीच्या चकत्या करून डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्याखाली असलेले काळे डाग हे कमी होतात. काकडी खाल्ल्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी करायला आणि डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स कमी करायला मदत होते.

काकडीच्या रसामध्ये अशी तत्वे असतात जे पॅनक्रियाजला सक्रिय करतात.काकडीचे जेवढे फायदे आहेत तेवढे नुकसान देखील आहेत. आपण काकडी चे रोज सेवन केलेच पाहिजे परंतु त्या खाण्याचे देखील प्रमाण ठेवणे गरजेचे आहे. काकडी जोड्या आपल्या शरीराला चांगले आहे तेवढी वाईट देखील आहे. जसे की रात्री काकडी खाल्ल्याने पोटात जडपणा येऊ शकतो. काकडी रात्री पचायला जड जाते.

काकडी पचायला वेळ लागते, त्यामुळे तुम्हाला जडपणा जाणवू शकतं. काही लोकांना काकडीची ऍलर्जी असते, ज्यामुळे सूज आणि खाज सुटू शकते. काकडीत क्यूकर्बिटासीन आणि टेट्रासायक्लिक ट्रायटरपेनोइड्स नावाची विषारी संयुगे देखील असतात. यामुळे कधीकधी काकड्यांना कडू चव येते. जर हे विषारी संयुग शरीरात जास्त प्रमाणात गेले तर गंभीर नुकसान होऊ शकते. काकडीत पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने पोटदुखी आणि किडनीचा त्रास होऊ शकतो.

हे वाचा:   पोटात जुळे बाळ कसे जन्माला येते माहिती आहे का.? कधीच कुठेच वाचले नसेल याबाबत.! आज जाणून घ्या.!

काकडी ही थंडगार आहे आणि त्यामुळे सायनस,सायटिकाने त्रस्त लोकांची अस्वस्थता वाढू शकते. हा लेख वाचून तुम्हाला काकडी चे फायदे आणि नुकसान समजले असतीलच त्यामुळे काकडीचे सेवन हे केले पाहिजे परंतु काकडी खाण्याचे देखील प्रमाण ठेवले पाहिजे कारण काकडी खाल्ल्याने जेवढे फायदे होतात तेवढे नुकसान देखील होतात.

लेख आवडल्यास इतरांना हा लेख नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *