मित्रांनो माणूस म्हटले की छोटे-मोठे आजार हे आलेच. या जगात असा एक ही मानव नाही ज्याला कोणता ही आजार नाही अथवा कसल्याच प्रकारची समस्या नाही. हो तुम्ही तुमच्या शरीराची किती ही काळजी घ्या. चांगला आहार ग्रहण करा तसेच नियमित व्यायाम करा मात्र तुम्हाला या परिसरात वाढत्या प्रदूषणामुळे कोणता ना कोणता हा विकार हमखास होतो.
दूषित अन्न पदार्थांमुळे व पाण्यामुळे आता आपल्या शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती कमजोर होत चालली आहे. सतत सर्दी होणे हे कमी रोग प्रतिकारक शक्ती असण्याचे लक्षण आहे. फक्त थंड वस्तू ग्रहण केली अथवा पावसात भिजलो तर सर्दी आपल्या पैकी अनेकांना असे वाटत असते. परंतू हे विधान संपूर्ण योग्य नाही.
सर्दी होण्याची अनेक कारणे आहेत. अनेक वेळा तुम्हाला उन्हाळ्यात देखील सर्दी होवू शकते. असे होण्याच्या मागचे कारण म्हणजे एलर्जी होय ही सर्दी धुळीच्या अथवा विविध प्रकारच्या एलर्जीमुळे होते. अश्या सर्दीमुळे माणसे हैराण होवून जातात. नाक बंद होते, सतत शिंक सुटतात, डोके दुखते व काही खाण्याचे मन देखील होत नाही. डॉक्टरांकडे गेल्यास गोळ्या -औषधांनी सर्दी बरी होते परंतू सर्दी सुकते व याचे रुपांतर कफात होते.
परंतू आज आम्ही तुमच्यासाठी नैसर्गिक पद्धतीने सर्दी समूळ नष्ट करण्याचा एक उपाय घेवून आलो आहोत. आजच्या या लेखात तुम्हाला सतत त्रास देणारी सर्दी अगदी दोन दिवसात गायब होईल असा एक रामबाण उपाय सांगणार आहोत. या उपाया बद्दल आयुर्वेदात देखील ठळक अक्षरात नमूद केलेले आहे. हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामुळे आपल्या स्वयंपाक घरातील वस्तू वापरुन हा उपाय आपण तयार करु शकतो.
अगदी सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल असा हा नैसर्गिक मात्र फायदेशीर उपाय आहे. ही माहिती तुमच्यासाठी व तुमच्या प्रियजनांसाठी महत्वाची ठरू शकते म्हणून आमचा हा लेख अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा. चला आता विलंब न लावता पाहूया हा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यक घटक आहे तो म्हणजे भोपळ्याच्या बिया.
या बियांमध्ये अनेक खनिजे व जीवनसत्व असतात. लोह व आयरन हे या बियांमध्ये मुबलक प्रमाणात मिळते. भोपळ्याच्या बिया या जवळच्या किराणा मालाच्या दुकानात अगदी हमखास मिळतील. एक वाटीभर म्हणजेच 50 ग्राम भोपळ्याच्या बिया बारीक करुन घ्या. या नंतर 20 ग्राम एवढ्या प्रमाणात खस-खस देखील आपल्याला हा उपाय तयार करताना घ्यायची आहे.
बदामाच वैशिष्ट्य तर सगळ्यांनाच माहित असेल. बदाम एक शक्ती वर्धक सुकामेवा आहे. आपल्या शरीरासाठी बदाम खाणे खूप फायदेशीर मानले जाते. बदाम आपली स्मरणशक्ती तल्लग करण्यासाठी उपयुक्त आहेत. 20 ग्राम या मात्रेत बदाम देखील घ्या. सोबतच या उपायासाठी आपल्याला 10 ग्राम काळीमिरी घ्यायची आहे. काळीमिरी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या नंतरचा घटक म्हणजे सुके खोबरे.
एक वाटी सुके खोबरे सुद्धा या उपायासाठी घ्या. आता अर्धा किलो एवढे गव्हाचे पीठ व 50 ग्राम साजूक तूप घ्या. आता हे सर्व पदार्थ एकत्र करुन या पासून तुम्ही लाडू बनवा. हे लाडू तुम्हाला सकाळी एक व संध्याकाळी एक असे दोन लाडू प्रत्येक दिवशी खायचे आहेत. असे दहा ते पंधरा दिवस नित्यनेमाने केल्यास तुमची रोग प्रतिकारक शक्ती चांगलीच वाढू लागेल. हो तुम्हाला होणारा सर्दीचा त्रास गायबच होवून जाईल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.