या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत असाल तर समजुन जा की भविष्यात तुम्ही काहीतरी मोठे बनणार आहात, IAS इंटरव्यू मध्ये विचारलेले प्रश्न…!
भारतातील सर्वात मोठी सरकारी सेवा म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस किंवा भारतीय प्रशासन सेवा होय. दरवर्षी लाखो मुले व मुली या परीक्षांसाठी आवेदन अर्ज भरत असतात व यूपीएससी आयोगामार्फत या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षानंतर सिलेक्शन प्रोसिजर चा भाग म्हणून इंटरव्यू कण्डक्ट केले जातात. या इंटरव्यूमध्ये कँडिडेट चे व्यक्तिमत्व तसेच त्याच्या ज्ञानाचा व त्याच्या सेन्स अॉफ ह्युमरची व तार्किक बुद्धीमत्तेची परीक्षा घेतली जाते.
अनेकदा आय.ए. एस इंटरव्यूमध्ये असे काही प्रश्न विचारले जातात की ज्यांची उत्तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला बुचकळ्यात पाडू शकतात. हे प्रश्न सोडवणे इतके सहज नसते. असे प्रश्न इंटरव्यूमध्ये विचारले जाण्याचे कारण म्हणजे ज्या उमेदवारांना आयएएसच्या परीक्षेमध्ये निवडण्यात येत असते अशा उमेदवारांची परीक्षा घेतली जाते व अशा प्रश्नांवर असे उमेदवार काय रिॲक्शन देतात याकडे इंटरव्यू घेणाऱ्यांचे लक्ष असते. चला तर जाणून घेऊया असे काही प्रश्न जे आय ए एस इंटरव्यू मध्ये विचारले गेले आहेत.
प्रश्न.1. केवळ 2 चा वापर करून 23 कसे लिहाल?उत्तर -22 +2/2
प्रश्न. 2.अशी कोणती वस्तू आहे जी गरम केल्यानंतर
कडक होते?
उत्तर -अंडी
प्रश्न.3. सोन्याची अशी वस्तू सांगा जी सोन्याची सोनाराच्या दुकानात मिळत नाही?
उत्तर- बेड. हिंदीत सोना म्हणजे झोप. झोपण्याकरता वापरल्या जाणार्या या वस्तू सोनाराच्या दुकानात मिळत नाहीत.
प्रश्न .4.असा कोणता शब्द आहे जो आपण पाहू शकतो मात्र वाचू शकत नाही?
उत्तर – नाही
प्रश्न.5. एका आरोपीला मृत्युदंड सुनावण्यात आला, त्यावेळी त्याला तीन खोल्या सांगण्यात आल्या, त्या खोल्यांमध्ये पहिल्या खोलीमध्ये आग होती, दुसऱ्या खोल्यांमध्ये हत्यारे होते, तर तिसऱ्या खोल्यांमध्ये 3 वर्षांपासून उपाशी असलेले वाघ होते.तर तो कोणती खोली निवडेल?
उत्तर- वाघ असलेली खोली. कारण तीन वर्षे उपाशी असल्यास वाघ जिवंत नसतील.
प्रश्न.6. एका माणसाने विमानांमधून बिना पॅरॅशूटची उडी मारली तरीही तो जिवंत आहे? कसा?
उत्तर -विमान रनवे वर जमिनीवर असेल.
प्रश्न.7. जीवनामध्ये दोन वेळा मोफत मिळणारी गोष्ट कोणती आहे जी तिसर्यांदा फुकट मिळत नाही?
उत्तर – दात! दात दोन वेळेस फुकट येतात मात्र तिसऱ्यांदा घ्यायला गेल्या डॉक्टरला पैसे मोजावे लागतात.
प्रश्न .8.जर 2कंपनी आहे आणि 3 गर्दी आहे तर 4 आणि 5 काय आहे?
उत्तर- चार आणि पाच बरोबर 9 होतात.
प्रश्न.9. जर आपण निळ्या समुद्रामध्ये लाल रंगाचा दगड टाकला तर काय होईल ?
उत्तर- दगड ओला होईल आणि खाली बुडून जाईल.
प्रश्न.10. भगवान श्री रामाने पहिली दिवाळी कोठे साजरी केली?
उत्तर- दिवाळी हा उत्सव श्रीरामानंतर साजरा केला जातो. त्यामुळे श्रीरामांनी दिवाळी कधीही साजरी नाही केली.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.