दुकानातले शाम्पू लावून केस कमी करून घेऊ नका.! त्यापेक्षा घरगुती शाम्पू बनवून केसांना लावा.! एकही केस गळणार नाही.! महिन्याभरातच फरक दिसून येईल.!

आरोग्य

केस हा प्रत्येक स्त्रीचा खूप महत्त्वाचा असा अलंकार असतो. त्यामुळेच तिची सुंदरता ही दिसून येत असते.
परंतु आज कालच्या या केमिकल युक्त शाम्पू मुळे केस गळती खूपच जास्त प्रमाणात दिसून येत आहे. आजकालच्या धूळ प्रदूषणामुळे आपले केस खूप कमकुवत दिसतात. या धुळीने आणि घामाने केस चिकट होतात आणि गळू लागतात. केसांना रोज शँपू लावणं अतिशय चुकीचं आहे.

त्यामुळे सुद्धा तुमचे केस कोरडे होतात. रोज शँपू लावल्यास, तुमचे केस गळू लागतात. तसेच कामाचा अधिक ताण असल्याने केसांच्या समस्या उद्धभवतात. काही व्यक्तींना इतर आजारांवर औषधे सुरु असल्यास त्या औषधांमुळे सुद्धा केस गळू लागतात. अशावेळी आपण पार्लरपासून ते अगदी डॉक्टरपर्यंत सगळे उपचार करून पाहतो. या उपचारांनी केस तर चमकदार होत असतात.

पण आपला खिसा मात्र रिकामा होतो हेदेखील तितकंच खरं आहे. खरं तर तुम्ही पार्लर किंंवा डॉक्टरांकडे सतत जाण्यापेक्षा घरच्याघरी थोडी मेहनत केलीत तर या कोरड्या केसांसाठी चांगले हेअर मास्क बनवून आणि केसांना योग्य तो मसाज करून तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. आज आपण बघूया घरच्याघरी केसांची काळजी घेणारा एक सोपा उपाय.

हे वाचा:   आरोग्याचा खेळ करणाऱ्या दहा अशा चुका.! आज नाही थांबवल्या तर दवखाण्यात लाखो रुपये वाया जातील.! आजच थांबवा जीवन वाचवा.!

आपल्याला यासाठी लागणार आहे कोणत्याही प्रकारचा तांदूळ. आपण घरात डोसे, इडली करताना तांदूळ भिजत घालतो. आणि त्याचे पाणी फेकून देतो. यामध्ये खनिज, व्हिटॅमिन, अमिनो अ‍ॅसिड आणि अँटी ऑक्सिडेंट्सचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. हे सर्व घटक त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहेत. यातील अमिनो एसिड नव्या केसांच्या वाढीला चालना देतं.

तांदूळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवून, सकाळी ते गाळून घ्या. आता हे तांदळावरचे पाणी एका भांड्यात घेऊन त्यात अर्धा लिंबू पिळा. लिंबामुळे आपल्या केसातील कोंडा दूर होण्यास मदत होते. आणि यात तुम्ही जो शॅम्पू वापरता तो टाका. तुम्हाला जेवढा शॅम्पू गरजेचा आहे तेवढ्याच घ्या. आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.

आता हे मिश्रण तुम्हाला केस धुताना वापरायचे आहेत. फक्त शॅम्पू लावून तुम्ही जसे केस धुता त्याच पद्धतीने तुम्हाला केस धुवायचे आहेत. असे केल्याने तुमचे केस मुलायम होतील. तसेच केसांना कोणतीही हानी होणार नाही. तांदळामध्ये इनोसिटोल नावाचे बी जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. जे केसांच्या वाढीसाठी मदत करते.

हे वाचा:   सकाळी गरम पाणी पीत असाल तर नक्की वाचा.! त्याऐवजी या याचे सेवन केले तर काय होईल.! आरोग्य बाबतची खूप महत्वाची माहिती.!

तांदूळाचे पाणी हे एक उत्तम कंडीशनर देखील आहे. शॅम्पूनंतर केसांवर ते कंडिशनर म्हणून वापरा. यामुळे केसांची लवचिकता आणि केसांची गुणवत्ता सुधारते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.