गुडघ्याने साथ सोडली, सांध्यात येतोय आवाज, ८० वर्षात सुद्धा धावू शकाल एवढा मजबूत उपाय एकदा करायलाच हवा.!

आरोग्य

जसे जसे आपले वय वाढते तस तसे आपल्याला कंबरदुखी, गुडघेदुखी हे त्रास चालू होतात. या समस्या निर्माण होण्याची देखील काही कारणे आहेत. गुडघेदुखी ही जर आपण कधीही कुठेतरी पडलो असो किंवा काही लागले असेल तर त्यामुळे होऊ शकते अथवा शरीरामधील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे देखील हाडांचे दुखणे होऊ शकते. त्यामुळे जसजसे आपले वय वाढत जाते तस तशी आपल्या शरीरामधील कॅल्शियमची पातळी ही कमी होत जाते.

वाढत्या वयाबरोबर आपल्याला हाडांचे दुखणे सुरू व्हायला लागते. या दुखण्यावर आपण अनेक उपचार करतो जसे की, इंजेक्शन गोळ्या व अजून असे प्रयत्न ज्यामुळे आपली गुडघेदुखी, कंबर दुखी बरी होईल पण एवढे प्रयत्न करून देखील आपले हे आजार काही पूर्णपणे बरे होत नाही त्याचे कारण देखील जाणून घेणे गरजेचे आहे म्हणूनच आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्याचा वापर केल्याने आपल्या शरीरामधील कॅल्शियमची पातळी वाढेल.

त्याचबरोबर आपल्या हाडांचे दुखणे म्हणजेच कंबर दुखी,गुडघेदुखी पूर्णपणे बरी होईल. या सगळ्या समस्यांचा त्रास आपल्याला पुढे होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. हा उपाय बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे वापर करायचा आहे तो म्हणजे मखान्यांचा. मखाने आपल्या शरीरासाठी किती औषधी आणि गुणकारी असतात.

हे वाचा:   एक कोंबडी महिन्याभरात किती अंडी देत असते??? अंड्याचे शौकीन असणाऱ्या बऱ्याच जणांना माहित नाही उत्तर.!

हे आपल्या सर्वांनाच माहीत असेल पण हेच मखाने आपल्या हाडांवर व हाडांच्या दुखण्यावर कसे काम करतील हे आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नसेल तेच आज आपण जाणून घेऊया. मखानामध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयासाठी फायदेशीर मानले जातात. हृदया संबंधित आजारांवर देखील मखाने फायदेशीर असतात. यामुळे बीपी ही नियंत्रणात राहतो. सोबतच कॅल्शियमचे प्रमाण वाढवते म्हणून आपल्याला इथे मखान्यांचा वापर करायचा आहे.

एक वाटी मखाने आपल्याला इथे वापरायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे बडीशेप चा वापर करायचा आहे. बडीशेप देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते यामध्ये देखील औषधी गुणधर्मांचा समावेश असतो. बडीशेपमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज, व्हिटॅमिन सोबतच पोषक तत्व असतात. ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. बडीशेप अपचन दूर करते त्यामुळे इथे आपल्याला बडीशेप चा वापर करायचा आहे.

सोबतच या मिश्रणामध्ये आपल्याला एक तुकडा मिश्री देखील म्हणजेच खडी साखर देखील टाकायची आहे त्यामुळे खडीसाखर बडीशेप व मखान्याचे प्रमाण समान असले पाहिजे. या गोष्टींना एकत्रित करून याची बारीक पावडर तयार करून खायची आहे आणि दररोज सकाळी ही पावडर दोन चमचे दुधामध्ये टाकून आपल्याला त्याचे सेवन करायचे आहे. हा उपाय सतत एक आठवडा केल्याने आपल्या शरीरामधील हाडांचे दुखणे भरपूर प्रमाणात कमी होईल त्याशिवाय यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी किंवा त्रास होणार नाही.

हे वाचा:   अशाप्रकारे पाणी पीत असाल तर सावधान; आजच जाणून घ्या नाहीतर स्वतःच्या आरोग्याचे करून घ्याल खूप मोठे नुकसान.!

ज्यांना मधुमेह आहे ते खडीसाखरेचा वापर करू शकत नाही त्यांच्यासाठी एक वेगळा उपाय आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी मखाने घेऊन ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत म्हणजेच एक चमचा तुपामध्ये हलके भाजून घ्यायचे आहे जेव्हा आपण मखाने भाजून घेतो तेव्हा सहजपणे त्याची पूड बनते पण आपल्याला इथे त्याची पूड तयार करायची नाही आहे. फक्त दररोज सकाळी एक ग्लास दुधासोबत आपल्याला दोन ते तीन मखाने चावून खायचे आहेत.

जर लहान मुले असतील तर त्यांना दोन ते तीन मखाने द्या. जर मोठी माणसे असतील तर त्यांनी पाच ते सहा मखानांचे सेवन तुम्ही करू शकता. मखाने आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर असतात त्यामुळे याचे सेवन मधुमेह असलेले लोक देखील करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.