आपण जी फळे खातो, त्या फळांचे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. मात्र काही फळांच्या साली देखील खुप कामाच्या असतात. आंबट गोड चव असलेल्या संत्रे हे आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते. संत्र्यासोबत संत्र्याची साल देखील अतिशय उपयोगी असते. त्यामुळे कधीही साल कचर्यात फेकू नये. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे संत्र्याच्या सालीचे महत्व सांगणार आहोत व त्याचे उपयोग देखील सांगणार आहोत.
१. वजन कमी करण्यासाठी उपयोग- संत्र्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात कॅलरी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी संत्र्याचा चांगला उपयोग होतो. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे संत्री भुकेवर नियंत्रण ठेवते व विटामिन्स शरीराला पुरवते.
२. हँगओव्हर उतरवण्याकरता – कामाचा तसेच मानसिक तणावाचा खूप फरक आपल्यावर पडत असतो. हा थकवा जाण्याकरता 15 ते 20 मिनिटे संत्र्याची सालं पाण्यामध्ये उकळावी व चहा सारखे प्यावे. तुम्हाला लगेच फ्रेश वाटेल.
३. पचनाकरता उपयोगी- संत्र्याच्या सालीमध्ये anti-inflammatory गुण असतात त्यामुळे डायरिया,हार्ट बर्न यासारख्या समस्यांमध्येदेखील उपाय केला जातो. संत्र्याच्या सालापासून बनविलेला चहा प्यायल्यामुळे आपल्याला अनेक आरोग्य समस्यांमध्ये लाभ मिळतो.
४. त्वचेवर ग्लो येण्याकरता- संत्र्याचा सालीला त्वचेकरता वरदान मानले जाते. कारण की ब्लॅक हेड्स, पिंपल्स, दाग धब्बे यांच्याकरता संत्र्याच्या सालीचा उपयोग करता येतो. संत्र्याच्या सालींची पावडर करून दूध किंवा देहामध्ये मिक्स करुन चेहऱ्याला लावल्यामुळे टॅनिंग निघून जाते.
५. केसांकरता कंडिशनर म्हणून उपयोग- संत्र्यांच्या सालींना मिक्सरमध्ये वाटून होममेड कंडीशनर आपण बनवू शकतात. त्यामुळे केस सिल्की व मुलायम होतात.
६. सिंकचा दुर्गंध दूर करण्यासाठी- सिंकमधून नेहमीच दुर्गंध येत असतो याकरता संत्राच्या सालाची पावडर थोडीशी सिंकमध्ये टाका व थोड्या वेळानंतर सिंक धुऊन टाकावे. सिंकमधील दुर्गंधी देखील दूर होते.
७. स्टेनलेस स्टिलच्या भांड्यांना पॉलिश करण्याकरता- जर आपल्या स्टेनलेस स्टिलच्या भांड्याला तेलाचे डाग धब्बे पडलेले असतील, तर संत्र्याचा सालींनी भांडी घासल्यास अगदी नव्यासारखी चमकताना दिसतील. संत्र्याचे साल हे एक होममेड क्लीनर आहे आणि हे चांगले प्रभावी काम करते. तर हे होते संत्र्याच्या सालीचे काही अनोखे फायदे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.