लाखो लोक याला कचरा समजून फेकून देतात .! परंतु निघाली आयुर्वेदातील खूप मोठी वनस्पती याचे फायदे बघून स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा विश्वास राहणार नाही.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपल्या सभोवताली अशा अनेक प्रकारच्या वनस्पती असतात ज्यांचे फायदे आपल्याला सुद्धा अचंबित करून टाकत असतात. आपण अशा काही वनस्पतींना गवत किंवा कचरा समजून फेकून सुद्धा देत असतो. आपल्या सभोवताली अनेकदा या वनस्पती दिसून सुद्धा येत असतात परंतु आपण याकडे दुर्लक्ष करत असतो. परंतु याच वनस्पती आयुर्वेदामध्ये उच्च स्थानावर आहेत.

याचे अनेक हजारो लाखो फायदे आहेत परंतु हे आपल्याला माहिती नाही. मित्रांनो, सध्या वाढते प्रदूषण तसेच आहाराच्या चुकीच्या पद्धती, मसालेदार आहाराचे वाढते प्रमाण या व इतर विविध कारणांमुळे मुळव्याध ही समस्या सर्व लोकांना जाणवताना असताना दिसून येते. या आजारामुळे पचनक्रिया बिघडते व पोटाचे विकार तसेच तर गंभीर आजार देखील जडतात.

मित्रांनो आजकाल दहापैकी एका व्यक्तीला मूळव्याधीचा त्रास होताना दिसून येतो. यामध्ये तरुणांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात दिसते. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे व्यसन व सध्याच्या काळात सर्वाधिक खाण्यात येणारे फास्टफूड हे आहेत. मित्रांनो मूळव्याधीवर उपचार म्हणून ऑपरेशनचा पर्याय बरेच डॉक्टर सुचवतात. मात्र हा पर्याय खूपच खर्चिक व त्रासदायक असतो यामुळे या पर्याया व्यतिरिक्त साधा सरळ सोपा रामबाण उपाय शोधणे गरजेचे आहे.

हाच रामबाण उपाय आम्ही आपणास या लेखामध्ये सांगणार आहोत. आपल्या आजूबाजूला विविध वनस्पती आपल्याला दिसून येतात अशाच काही वनस्पती आहेत ज्या मुळव्याधीवर खूपच रामबाण आहे. सविस्तरपणे माहिती मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या अशा एका वनस्पती बद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   हे पाण्यात उकळून प्या, शंभर वर्षांपर्यंत हाडे दुखणार नाही, सांधेदुखी, कंबर दुखी गायब होऊन जाईल.!

ही वनस्पती अत्यंत फायदेशीर आहे आणि ही वनस्पती आपल्या मूळव्याध आणि त्याचबरोबर पोटांसंबंधी अनेक अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला मदत करते. मित्रांनो आज आपण ज्या वनस्पती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत ही वनस्पती आहे बिलायती. मित्रांनो या वनस्पतीला सत्यनाशी वनस्पती अशी सुद्धा म्हणतात. मित्रांनो आपल्या अंगणामध्ये किंवा शेतामध्ये आपल्यालाही वनस्पती नक्कीच दिसून येते.

मित्रांनो काटेरी स्वरूपात असणाऱ्या या वनस्पतीला पिवळ्या रंगाची फुले असतात. त्याचबरोबर मित्रांनो याची उंची सुद्धा खूप नसते. अगदी अर्धा फुट ते एक फुटांपर्यंत ही वनस्पती असते आणि मित्रांनो या वनस्पतीचा पावडर आणि तेलाच्या स्वरूपामध्ये वापर केला जातो. तर मित्रांनो आता आपण कोणत्या समस्येवर कशा पद्धतीने या वनस्पतीचा वापर करायचा आहे? याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो, तुम्हाला जर पोटात संबंधित समस्या असतील म्हणजेच तुम्हाला जर पोटामध्ये गॅस होणे त्याचबरोबर पोट साफ न होणे यांसारख्या समस्या असतील तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही या बिलायती वनस्पतीचे मूळ आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहे आणि त्यानंतर हे मूळ आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडा ओवा सुद्धा आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला गॅसवर उकळून घ्यायचे आहे.

याचा आपल्याला काढा तयार करून घ्यायचा आहे आणि या काढ्याचे सेवन आपल्याला रोज सकाळ, संध्याकाळ करायचे आहे. यामुळे तुमच्या पोटात संबंधित ज्या काही अडचणी किंवा समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होतील. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असेल आणि यामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल तर मित्रांनो अशा वेळी तुम्हाला या विलायती वनस्पतीचा खूपच फायदा होऊ शकतो.

हे वाचा:   घरच्या घरी बदाम चे झाड उगवू शकते.! त्यासाठी करावे लागेल हे एक काम.! 100% कुंडीत बदाम चे झाड उगेल.!

कारण मित्रांनो या वनस्पतीच्या मुळामध्ये जे औषधी घटक आहे. त्यामुळे तुमचा मूळव्याधचा जो त्रास आहे तो अगदी कमी दिवसांमध्ये दूर होईल. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये असं मानलेलं आहे की, बिलायती ही वनस्पती मुळव्याधीचा काळ आहे, तर मित्रांनो मुळव्याधाची समस्या असेल तर अशावेळी तुम्ही या बिलायती वनस्पतीच्या मुळाचे चूर्ण तुमच्या घरामध्ये अवश्य घेऊन या.

या वनस्पतीच्या मुळाचे चूर्ण एक ग्रॅम आणि सेंधव मीठ एक ग्रॅम अशा पद्धतीने एक पावडर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि दररोज दह्यासोबत याचे सेवन आपल्याला करायचे आहे. मित्रांनो सात ते आठ दिवसांपर्यंत जर तुम्ही अशा पद्धतीने या चूर्णाचे सकाळ, संध्याकाळ सेवन जर केले तर यामुळे तुमच्या कसलेही प्रकारचा मुळव्याध असेल तर तो नक्कीच गळून पडेल आणि तो मुळासकट नष्ट होईल.

त्याचबरोबर मित्रांनो या वनस्पतीच्या मुलांचा ज्याप्रमाणे फायदा आपल्या शरीराला त्याच पद्धतीने या वनस्पतीच्या ज्या बिया असतात त्या आपल्या मानवी शरीराला अत्यंत घातक असतात. जर चुकूनही या बियांचे सेवन जर आपण केले तर यामुळे आपल्याला अनेक मोठमोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि म्हणूनच मित्रांनो या वनस्पतीचा वापर करत असताना अगदी काळजीपूर्वक केला पाहिजे.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.