जर कोणाला सर्दी खोकला झाला तर प्यायला द्यायचा हा काढा.! डॉक्टर ची पण गरज पडणार नाही लिहून घ्या.!

आरोग्य

आपले सर्वस्व हे आपले आरोग्य असते हे सर्वांना मान्य करावेच लागेल. आरोग्य चांगले असेल तर माणसाच्या शरीर हे सुखी समृद्धी राहत असते. आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणीमुळे सामना करावा लागत नाही. खूप साऱ्या पैशांची बचत देखील होत असते. कारण दवाखान्यामध्ये खूप सारा पैसा जात असतो अशा वेळी खूप चिंता देखील करत असतो.

लहान असो की मोठा सर्वांनाच आरोग्याबद्दल अधिक जागरूक असणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात स्वच्छतेबरोबरच इम्युम सिस्टम वाढवण्यास प्राधान्य असलं पाहिजे. केवळ मजबूत रोगप्रतिकारक शक्तीच आपल्याला या कोविडच्या साथीच्या संसर्गापासून वाचवू शकते, कारण या विषाणूचे बळी असेच लोक आहेत ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे.

आज आम्ही तुम्हाला एक आयुर्वेदिक काढ्याबद्दल सांगत आहोत ज्यामुळे आपल्या घश्याला आराम मिळेल आणि खोकला, सर्दीही दूर होईल. चला तर बघा. खाली दिलेल्या प्रमाणे , हा काढा कसा बनवावा ते बघा.

साहित्य-
२ लवंगा, २ वाटी पाणी, २ टीस्पून आल्याचा रस, १ टिस्पून मिरपूड पावडर, ३-४ तुळशीची पाने, चिमूटभर दालचिनी पावडर.

हा उपयुक्त काढा तयार करण्याची पद्धत –
सर्व प्रथम, उकळण्यासाठी मध्यम आचेवर पॅनमध्ये पाणी ठेवा. पाणी उकळताच आल्याचा रस आणि तुळशीची पाने त्यात उकळा. आले आणि तुळस चांगले उकळू द्यावे. सुमारे ३-४ मिनिटानंतर मिरपूड आणि लवंग घाला. दोन मिनिटे उकळण्यासाठी गॅस कमी करा आणि नंतर गॅस बंद करा. एक गरम काढा तयार आहे. वर चिमूटभर दालचिनी पावडर टाका.

हे वाचा:   हे एकच पान लाखोच्या औषधाच्या बरोबरीत आहे, दिसले की लगेच एक पान तोंडात टाका.!

शक्यतो वर दिल्या प्रमाणेच साहित्य घ्यावे. काहीही कमी जास्त करू नये. काही प्रमाण कमी जास्त झाल्यास या काढयाचा दाह होऊ शकतो. हा काढा घेण्याची योग्य वेळ कोणती? रिकाम्या पोटी काढा पिऊन पुष्कळ लोकांना पोटदुखीचा त्रास सुरू होतो, म्हणूनच सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे खाल्ल्यानंतर काढा पिणे. त्याच वेळी, आपण चहाऐवजी दिवसातून दोनदा हा काढा पिऊ शकता.

आपणास हवे असल्यास आपण त्यात थोडे दूध घालून चहासारखे पिऊ शकता. ज्यांना या काढायची चव आवडत नसेल, त्यांनी या काढ्यात मध किंवा गुळ घालावे. पण हा काढा घ्यावा आणि रोगांना दूर ठेवा.
तुळसीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, लोह, फिरोफिल, झिंक, ओमेगा ३, मॅग्नेशियम, मॅगनीज असते.  लवंगेमध्ये अँटिमायक्रोबायल आणि अँटिऑक्सिडंट असतात. शिवाय ती अॅंटिव्हायरलही आहे त्यामुळे व्हायरल तापापासूनही तुमचे यामुळे संरक्षण होऊ शकते.

हे वाचा:   मेंदूला कंप्युटर पेक्षाही तेज बनवा.! दहा मिनिटाचे कामे दोन मिनिटात होऊ लागतील.! तुम्हाला बघूनच लोक वाहवाह करू लागतील.!

काळी मिरी मध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, विटामिन के आणि विटामिन बी ६ चं भरपूर प्रमाण आहे. दालचिनीमधील अँटीबॅक्टेरीअल गुणधर्म असतात. ते तुम्हाला बॅक्टेरियापासून दूर ठेवतात. सध्या  कोरोनापासून लढण्यासाठी दालचिनीचा वापर चहातूनही करावा असं सांगण्यात येत आहे. या काढ्यांसाठी जे पदार्थ वापरण्यात आलेले आहेत त्या प्रत्येकाचे आरोग्यदायी फायदे आपल्या शरीरावर होतात.

कारण त्यांच्यामध्ये असलेले नैसर्गिक आणि औषधी घटक तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.