घनदाट सावली देणारा व उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड हवेचा व गारव्याचा अनुभव देणारा कडूनिंब हा अतिशय गुणकारी व आयुर्वेदिक महत्त्व असलेला वृक्ष आहे. कडुनिंबाचे झाड भारतभर सगळीकडे आढळते. उन्हाळ्याच्या दिवसात रापत्या उन्हामध्ये थंडावा देण्यासाठी अनेक लोक कडूनिंबाच्या थंड सावलीमध्ये बसतात. त्यामुळे उन्हाचा दाह जाणवत नाही!
कडुनिंबाच्या झाडाचे महत्व-
कडुनिंबाची पाने, निंबोळ्या, साल, मूळ, फुले उपयोगी आहे. जुन्या काळामध्ये कडुनिंबाच्या काडीने दात घासले जायचे. प्राचीन काळापासून कडूनिंबाच्या पानांचा, झाडांचा, मुळांचा, सालींचा, बियांचा आणि फुलांचा उपयोग अनेक आजारांमध्ये केला जातो.
आयुर्वेदिक उपचार पद्धती व आजीच्या बटव्यामध्ये सुजणे, ताप येणे, दात दुखी यासारख्या अनेक आजारांवर कडुनिंबाचा उपयोग केला जातो. आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला कडुनिंबाच्या पानांचे फायदे सांगणार आहोत. कडुनिंबाच्या पानांतील गुण-
जिवाणू रोधक, अँटिकार्सिनोजेनिक, अँटि- इंन्फ्लैमेटरी, अँटिऑक्सिडंट, मायक्रोबियल आणि अँटि-व्हायरल गुणांनी युक्त असतात.
कडूनिंबाच्या पानांचा व्हायरल फ्लू किंवा ताप आलेल्या रुग्णांकरिता अतिशय लाभ होतो. कडुनिंबाच्या पानांमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस मिटवण्याचे गुण असतात. चवीला कडू असलेली कडुनिंबाची पाने ही आयुर्वेदिक गुणांनी युक्त असतात. कडुनिंबाच्या पानांचे नियमित सेवन केल्याने वात विकार किंवा न्यूरो मस्कुलर विकार संतुलित राहतात.
कडूनिंबाच्या पानांनी आपल्या रक्तातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. निरोगी डोळ्यांकरीता कडूनिंब आहे उपयोगी. कडुनिंबाच्या पानांना चावून खाल्ल्याने आपले दृष्टिदोष बरे होतात. तसेच डोळ्याच्या संबंधी सर्व आजार जसे डोळ्यांची जळजळ होणे, थकवा येणे, डोळे लाल होणे या समस्येपासून देखील सुटका होते.
अशा विकारांमध्ये कडुनिंबाची पाने उकळून ते पाणी थंड करून नंतर त्या पाण्याने आपले डोळे धुतल्यास डोळ्या संबंधीच्या समस्या बर्या होतात. रोगप्रतिकारक क्षमता वाढते कडूनिंबाची पाने- कडुनिंबातील अँटीमायक्रोबियल, अँटिव्हायरस आणि एंटीऑक्सीडेंट गुणांमुळे कडुनिंबाची पाने चावल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
अगदी साधारण फ्ल्यूपासून कॅन्सर, हृदयरोग यासारख्या मोठ्या आजारांमध्ये देखील कडूनिंबाच्या पानांनी गुण येतो. कडुनिंबाची पाने बॅक्टेरिया नष्ट करतात, त्यामुळे आपली इम्युनिटी बूस्ट होते. पचन तंत्रात सुधारणा होते – कडूनिंबाची पाने ही लिव्हर करता उपयुक्त मानली जातात. नियमित सेवनामुळे पचनतंत्र सुधारते.
दररोज कडुनिंबाची पाने सेवन केली तर आतड्यांमधील अतिरिक्त बॅक्टेरिया नष्ट होतात व आपले आतडे साफ होते. त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते. कडूनिंबाच्या पानांचा त्वचेकरता उपयोग- कडुनिंबाच्या पानांचे नित्य सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात. कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटिबॅक्टेरीयल गुण असल्यामुळे त्वचेच्या संबंधित सर्व समस्यांवर कडुनिंबाची पाने चमत्कारिक रित्या उपयुक्त ठरतात.
कडूनिंबाच्या पानांचा लेप- कडुनिंबाच्या पानांमध्ये हळद मिक्स करून पेस्ट करुन कीटक दंशावर लावल्यास किंवा खाज, एक्झिमा, रिंग वार्म्स यासारख्या त्वचारोगांवर उपयोग केला जातो. कडुनिंबाची पाने हळदी सोबत मिक्स करून त्याची पेस्ट बनवून लावल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स निघून जातात. केसांचे आरोग्य करता उपयोग- केसांकरता देखील कडुलिंब उपयोगी असते. कडुनिंबाची पाने रोज खाल्ल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.
कडूनिंबाच्या पानामध्ये असलेल्या उच्च स्तरातील अँटीऑक्सीडेंट गुणांमुळे मुक्त कणांपासून होणाऱ्या अक्सिडेशन व तणावापासून केसांखालील त्वचेचे संरक्षण होते. कोंडा व केस गळती च्या समस्यांवर उकळलेल्या कडुनिंबाच्या पानाचे पाणी थंड करून लावल्यास या समस्येत आराम मिळतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.