भारताचा सर्वात मोठा रियालिटी शो असलेला बिग बॉस सीझन 14 काही दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. या सीझनमध्ये रोज नवनवे हंगामी करताना आपल्याला राखी सावंत दिसत आहेत. ड्रामा क्वीन असलेल्या राखी सावंत रोज नवनवे पराक्रम करताना पाहायला मिळत आहे!
आपल्या वागण्या-बोलण्याने, भां-ड-ण्याने, गप्पा मारण्याने राखीने बिग बॉस सीजन 14 दणाणुन सोडला आहे! बिग बॉस शो च्या सेंटर ऑफ अट्रॅक्शनला राखी सावंतचा आहे असे म्हणायला हरकत नाही. राखी आपल्या कारणांम्यांमुळे कायमच चर्चेत राहते व बिग बॉसची नजर केवळ राखी सावंतवरच आहे की काय असे वाटायला लागते!
मध्यंतरी बिग बॉस ने बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या सर्व कंटेस्टंट लोकांसाठी एक नॉमिनेशन टास्क दिला होता. या टास्कमध्ये बिग बॉसने अशी अट घातली होती की, घरातल्या ज्या व्यक्तीला नॉमिनेट केले जाईल, त्या व्यक्तिसोबतच बिग बॉसच्या घरातील एक हिस्सा मिनिमाइज होईल व बिग बॉस तो हिस्सा जप्त करून घेतील. टास्क नुसार जप्त केलेल्या बिग बॉसच्या घरांमधील भागांमध्ये बाथरूम बेडरूम आणि स्पा यांचा समावेश करण्यात आला आहे.
या अतरंगी टास्कमुळे बिग बॉसच्या घरामध्ये राहणारे जे स्पर्धक आहेत त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कारण की घरातील सर्वच बाथरूम आता बिग बॉस ने बंद करून टाकले आहेत. फक्त गार्डन एरिया मध्ये असलेला बाथरूम आता अवेलेबल करण्यात आला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये असणार्या स्पर्धकांना एकच बाथरूम शेअर करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत.
या कारणांमुळे राखी सावंत हिने स्विमिंग पूल जवळ असलेल्या जागेवर बसून उघड्यावर आंघोळ करण्याचा निर्णय घेतला. राखी सावंत जेव्हा स्विमिंग पूल जवळ आंघोळ करण्यासाठी बसली तेव्हा अली आणि राहुल वैद्य तिथे येऊन तिच्या केसांना शाम्पू आणि कंडिशनर लावताना दिसले. शो संबंधी असलेला हा प्रोमो व्हिडिओ कलर्स चॅनेल ने सोशल मीडियावर रिलीज केला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असताना कलर्स चॅनलने खाली कॅप्शन टाकले आहे, “घर के बाथरूम जप्त होने के कारण राखी सावंत को राहुल वैद्य और अली गोनो ने दिया शाम्पू बाथ!” या व्हिडिओमध्ये राहुल वैद्य ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए हे गाणे गाताना दिसत आहेत, तर राखी बोलत आहे की मी माझ्या आयुष्यात कधीही अशा प्रकारे उघड्यावर आंघोळ केली नाही! यावर राहुल वैद्य असा बोलतो की, आज आमचे भाग्य उजळले!
बिग बॉस 14 हा सीझन सुरू झाल्यापासून राखी सावंत या शोमध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय बनत आहेत व सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनल्यामुळे प्रत्येक बातमीमध्ये राखी सावंत असते म्हणजे असतेच! ड्रामा क्वीन असलेल्या राखी सावंतचा उघड्यावर आंघोळ करण्याचा हा व्हिडिओ बिग बॉसने सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे, अनेक लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे व वेगवेगळ्या प्रतिक्रिया पण देण्यात येत आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.