चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा महत्त्वाचा घटक असतो. आपला चेहरा सुंदर चमकदार व अगदी सेलेब्रिटी सारखा दिसवा म्हणून आपण काय काय प्रयोग करत असतो.?
स्त्री असो किंवा पुरुष असो चेहऱ्याचे सौंदर्य जपण्याकरता प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. प्रत्येकालाच वाटते आपला चेहरा कोमल,चमकदार व्हावा व आपण चारचौघात उठून दिसावे, मात्र अनेक कारणांनी आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खराब होत असते.
अनेक वेळा वातावरणातील बदलांमुळे चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या तसेच येत असतात व बरेचसे तरुण मुले-मुली या मुरुम व पुटकुळ्या फोडून त्यातला पस व खिळ बाहेर काढतात. यामुळे त्या मुरुम व पुटकुळ्यांच्या जागी खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य पूर्ण खराब होते व चेहरा विद्रुप दिसु लागतो.
तसेच चेहऱ्यावर मुरुमांचे पुटकुळ्यांचे डाग पडतात. काही लोकांना कापल्यामुळे किंवा चटका बसल्यामुळे, भाजल्यामुळे देखील चेहऱ्यावर खड्डे पडत असतात. तर काही लोकांना कांजिण्या गोवर यांमुळे देखील चेहर्यावर खड्डे पडत असतात. आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला चेहऱ्यावरील खड्डे कायमचे निघून जाण्याकरता काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
बेसनाचा उपाय – चेहऱ्यावरचे खड्डे बुजवूण्याकरता बेसन खूपच लाभदायक आहे. बेसनामध्ये दूध आणि लिंबू मिक्स करून त्याची चांगली पेस्ट बनवा व चेहऱ्यावर ती फेस पॅक प्रमाणे लावा. ही पेस्ट किमान अर्धा तास चेहर्यावर तशीच ठेवा व सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन टाका. या फेसपॅकचा नियमित वापर केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील खड्डे हळूहळू कमी होतात व नष्ट होतात.
दह्याचा उपाय – एका वाटीमध्ये दही घेऊन त्यात थोडा लिंबू टाका. त्याची पेस्ट बनवून चेहर्याला लावा, यामुळे आपल्या चेहऱ्यावरील खड्डे लवकर भरून निघतात.
बेकिंग सोड्याचा उपाय – चेहऱ्याचे खड्डे दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा देखील उपयोग केला जातो. लिंबाच्या रसात किंवा मधामध्ये बेकिंग सोडा मिसळा व त्याची पेस्ट बनवून चेहर्यावर लावा. हा फेसपॅक चांगला सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
मुलतानी मातीचा उपाय – चेहऱ्याचे खड्डे जाण्याकरता मुलतानी माती अतिशय प्रभावीपणे काम करते. खड्डे लवकर जाण्याकरता आपण मुलतानी मातीचा वापर करू शकता. मुलतानी मातीमध्ये गुलाब जल आणि लिंबाचा रस मिसळून एक चांगला फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक नियमित रूपाने चेहर्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरचे खड्डे लवकर निघून जातील.
चंदन आणि गुलाब जलाचा उपाय – चंदन आणि गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करा व तो चेहऱ्याला लावा. या उपायाने देखील चेहऱ्यावरील खड्डे लवकर निघून जातील. चंदन आणि गुलाबाच्या गुणांमुळे चेहऱ्यावरील इतर समस्या देखील दूर होतात. यामुळे चेहऱ्यावर उजळतो व चेहऱ्यावर तेज देखील येते.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.