दररोज फक्त तीन चार पाने खा, तुमच्या चेहऱ्यावर येईल खूपच छान चमक, केसांसाठी आहे खूप उपयुक्त.!

आरोग्य

कढीपत्ता हा आरोग्यवर्धक आणि औषधी गुणांनी युक्त असतो. कढीपत्तामध्ये असे कोणते चमत्कारिक गुण असतात ज्यामुळे कढीपत्त्याचे एवढे फायदे होतात? छोट्याशा दिसणार्‍या कढीपत्त्याच्या पानांमध्ये विटामीन ए, विटामीन बी, विटामिन सी, विटामिन ई,  कॉपर, मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस, फायबर, कार्बोहाइड्रेट, एनर्जी मॅग्नेशियम, आयर्न आणि अमिनो ऍसिड असते.

कढीपत्त्याचा चहा, ज्युस, सूप बनवून देखील प्यायले जाते. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे कढीपत्त्याच्या आरोग्यासाठी औषधी उपायांबद्दल माहिती सांगणार आहोत.

आपल्या शरीरामध्ये जमा होणारी चरबी कमी करण्यासाठी कढीपत्ता एका असरदार उपाय आहे! शरीरातील चरबी काढून विषारी पदार्थ बाहेर फेकण्याचे काम व पचनक्रिया सुरळीत करण्याचे काम कढीपत्त्याच्या सेवनाने होत असते. याकरता रोज सकाळी उपाशी पोटी कढीपत्त्याचे चार पाच पाने चावून खावी व त्यानंतर गरम पाणी प्यावे. पंधरा ते वीस दिवसात आपल्याला फरक जाणवेल.

जर आपल्या चेहऱ्यावर अतिशय पिंपल्स व मुरूम येत असतील तर कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट करून त्यामध्ये थोडी हळद टाकून त्यावर ज्या ठिकाणी पुळ्या व मुरम आहेt त्या ठिकाणी ही पेस्ट लावावी व वाळल्यानंतर चेहरा धुवून टाकावा. काही दिवसातच आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स व त्याचे डाग देखील निघून जातील.

हे वाचा:   उन्हाळ्यामध्ये दररोज माठातले पाणी पिणाऱ्यांनो एकदा ही माहिती वाचा.! तुम्ही पण दररोज माठातले पाणी पीत असाल तर नक्की वाचा.!

 

हेल्दी स्किन साठी कढीपत्त्याची पाने, मुलतानी माती आणि गुलाब जल यांना एकत्र करून पेस्ट बनवा व चेहऱ्यावर फेस मास्कसारखी लावा. सुकल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुऊन टाका.

कढीपत्ता आपल्या केसांसाठी देखील अतिशय उपयुक्त असतो. आपण अति प्रमाणात केस गळतीने त्रस्त असाल तर हा उपाय करून पहा. कढीपत्त्याची पाने घेऊन त्याची चांगली बारीक पेस्ट करा व त्यामध्ये आंबट दही मिक्स करा, आता हा पॅक एकत्र करून केसांमध्ये लावा अर्ध्या तासानंतर केस धुवून टाका. हप्त्यातून तीन वेळेस असे केल्यास आपली केस गळती पूर्णपणे थांबून जाईल.

जर आपण डायबेटीस पेशंट असाल तर कढीपत्ता आपल्या नियमित आहारामध्ये ठेवावा, यामुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते. जर आपल्याला पचन संस्थेशी संबंधित त्रास होत असेल तर आपण नियमितपणे कढीपत्त्याचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे.

जर आपल्या त्वचेवर रॅशेस झाले असतील किंवा अंगावर सुज आली असेल, तर कढीपत्त्याची पेस्ट त्या जागी लावल्यामुळे सूज निघून जाते. कढीपत्ता आपल्या लिव्हरला डॅमेज होण्यापासून वाचवतो.

हे वाचा:   हळू हळू शुगर कमी करते हे एक फळ, बाजारात भेटले तर लगेच घेऊन या.!

जे लोक जास्त प्रमाणामध्ये लॅपटॉप वर कॉम्प्युटरवर काम करतात किंवा जास्त मोबाईलमध्ये काम करत असतात अशा लोकांनी कढीपत्ता आपल्या आहारात समाविष्ट केला पाहिजे. कढीपत्ता खाल्ल्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. कढीपत्त्यामध्ये कॅन्सरसोबत लढण्याचे देखील गुण आहेत.

कढीपत्त्यामध्ये एंटीऑक्सीडेंट प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आपले मेंदू शांत होतो आणि बॉडीमध्ये देखील हलकेपणा राहतो. कढीपत्ता अँटीडिप्रेशनचे काम देखील करतो, स्ट्रेस असल्यावर तीन ते चार कढीपत्त्याची पाने खाल्ली तर आपल्या स्ट्रेस कमी होतो.

सर्दीमध्ये एक चमचा कढीपत्त्याची पेस्ट आणि एक चमचा मध एकत्र करून खाल्ल्यावर सर्दी व खोकल्यामध्ये लगेच आराम पडतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *