घरी बनवून ठेवा हे तेल याने अनेक समस्या कायमच्या दूर होऊन जातील.! अनेक आजारावर एकच रामबाण उपाय.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय उपयोगी अशी कृती रेसिपी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे कडुनिंबाच्या पानांचे तेल. जे बाजारात सहजरीत्या उपलब्ध आहेच परंतु घरगुती शास्त्रोक्त शुद्ध पद्धतीने बनवलेले तेल अतिशय फायदेशीर ठरते त्यामध्ये कुठलीही भेसळ नसते. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांमध्ये केवळ हे एक तेलच पुरेसे आहे.

चला तर मग जाणून घेऊयात पूर्ण पद्धत आणि फायदे सविस्तर पणे. आपल्याकडे हिंदू मराठी नववर्षामध्ये गुढी उभारताना एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे कडुनिंबाचा पाला. आयुर्वेदामध्ये कडू निंबाच्या झाडाला पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. याला आपण एक औषधी वनस्पती म्हणून देखील ओळखतो. अगदी फार वर्षापासून अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये आपण याच्या पानांचा तेलाचा वापर करत असतो.

केसांच्या तक्रारींमध्ये आणि चेहऱ्याच्या त्वचेच्या विकारांमध्ये तर कडुनिंबाचे तेल म्हणजे संजीवनी पेक्षा काही कमी नाही. कडुनिंबाच्या तेलामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. आपल्या त्वचेमधील कोलेजन वाढून चेहरा नितळ आणि सुंदर दिसतो. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. या तेलामध्ये विटामिन ए सीड अमिनो ऍसिड यांचा सामावेश असतो, ज्यामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळून ती तरुण दिसते.

हे वाचा:   या दोन फळांपुढे कुठलाही मूळव्याध टिकला नाही.! कितीही जूना मूळव्याध असू द्या याने बरा केलाच म्हणून समजा.!

या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश केल्यास केस गळती कोंडा होणे अकाली केस पिकणे केस रुक्ष होणे यांसारख्या समस्येपासून सुटका होते. आज काल आपण बघितले तर अनेक सौंदर्यप्रसाधनं साबण फेस वॉश यांच्यामध्ये देखील निंबाचा पाला वापरतात. नैसर्गिक असल्यामुळे तुमच्या त्वचेला याचे कोणतेही हानी नाही. मुरूम पुटकुळ्या तर होतात गायब. त्वचेचा रंग देखील सुधारतो.

त्वचेवर कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्यास जसे खरूज नायटा गजकर्ण यामध्ये या तेलाने मालिश केल्यास खूप आराम मिळतो. बऱ्याच जणांच्या घरांमध्ये अगदी डास पळवून लावण्यासाठी देखील निंबाच्या पानांचा वापर केला जातो. यामुळे आपल्या घरातील वातावरण देखील प्रसन्न होते. तळपायाला असे तेल लावून झोपल्याने झोप शांत लागते.

असे बाजारात मिळणारे तेल भेसळयुक्त आणि महागडे असण्याची शक्यता असते. तेव्हा आपण पाहूयात घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे तेल कसे बनवायचे..! हे तेल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत ताजे, शुद्ध, स्वच्छ असे निंबाचे धुतलेली २५० ग्रॅम पाने. ही पान कोरडे करुन एका भांड्यामध्ये काढून घ्या. तेल बनवण्यासाठी आपण मोहरीचे किंवा खोबऱ्याचे तेल वापरू शकता.

हे वाचा:   नाश्त्याला हे पदार्थ खाणे म्हणजे स्वतः आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.! जे लोक नाश्त्याला हे खातात ते शरीरात दररोज विष सोडत असतात.!

यामध्ये तुम्ही दोन कप मोहरीचे किंवा खोबऱ्याचे तेल घाला. हे तुम्ही जास्त बनवून ठेवू शकता हे खराब होत नाही, दोन वर्षांपर्यंत टिकते. आता हे भांडे गॅसवर मंद आचेवर ठेवा. चमच्याने अधून-मधून हे तेल आणि पानं ढवळत रहा. तुम्ही डायरेक्ट पानं न वापरता मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट देखील वापरू शकता. तेल व्यवस्थित शिजल्यानंतर पानांचा रंग बदलेल तुम्हाला दिसेल.

गॅस बंद करा तेल व्यवस्थित गार होऊ द्या. कोणत्याही काचेच्या बाटलीमध्ये हे तेल गाळून भरून ठेवा..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *