पौर्णिमेच्या दिवशी एक हळद या ठिकाणी ठेवा; घरातील सर्व चिंता नाहीश्या होतील, लवकरच आनंदाची बातमी मिळेल.!

अध्यात्म

आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा व घरामध्ये धनसंपत्तीची देवी महालक्ष्मी कायम निवास करावी याकरता सर्व लोक प्रयत्न करत असतात. मात्र धनाची देवता महालक्ष्मी एका जागी कधीही स्थिर राहत नाही. ज्या घरामध्ये क्लेश, कलह, भांडणे होतात व नकारात्मकता वाढते त्या घरांमध्ये महालक्ष्मी कधीही थांबत नाही.

महालक्ष्मी माता आपल्या घरामध्ये रहावी म्हणून आपण नियमांचे पालन केले पाहिजे व घरांमध्ये सर्व कार्य महालक्ष्मी मातेच्या मनासारखी केली पाहिजे तरच माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व चिरंतन काळ आपल्या घरावर तिचा अभय व आशीर्वाद राहतो. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे स्वत: देवि  महालक्ष्मीने सांगितलेले हळदीचे महत्व सांगणार आहोत. स्वयंपाक घरांमधील हळद ही नुसती मसाल्याचा पदार्थ नसून आयुर्वेदिक गुणांनीयुक्त ‍औषधी देखील आहे.

हळदीचे अध्यात्मिक महत्त्व आपल्या सर्वांनाच माहीत आहे. देवपुजे दरम्यान हळदी आणि कुंकू हे दोघेही सोबतच लागतात. जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तसेच आपल्या पाकिटामधील पैसे लवकर संपत असतील तर आज आम्ही सांगितलेला उपाय तुम्ही नक्की करून पहा. कोणत्याही शुभमुहुर्ताच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे.

हे वाचा:   घरासमोर असलेले तुळशीचे रोपटे कधी सुकले तर ही चूक कधीही करू नका, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

तांदळाचे अखंड २१ दाणे घ्यावे. लाल रंगाच्या स्वच्छ कपड्यांमध्ये हे २१ दाणे हळद लावून आपल्याल‍ा पुरचुंडी बांधायची आहे. याकरीता एक चमचा हळद घेवून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून त्यामध्ये हे तांदळाचे २१ दाणे टाकावे, तांदूळ हळदीला चांगले चोळुन घ्या. तांदूळ पूर्णतः पिवळे झाले पाहिजे. हे तांदळाचे दाणे लाल रंगाच्या कपड्यावर ठेवावे, यानंतर माता महालक्ष्मीची विधिवत पूजा करावी.महालक्ष्मी मातेला मनोभावे नमस्कार करावा. पुजेनंतर महालक्ष्मी मातेला लाल फुल वहावे व गोडाचा नैवेद्य दाखवावा.

दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादि कर्मे उरकुन पुजेला बसावे. महालक्ष्मी मातेला नमन करुन देवीसमोरील लाल कपडा उचलावा. या हळद लावलेल्या पिवळ्या रंगाच्या २१ तांदळाच्या दाण्यांना त्या लाल रंगाच्या कपड्यांमध्ये गुंड‍ळुन पुरचुंडी बांधून आपल्या पर्समध्ये ठेवा. त्यामुळे घरामध्ये धन स्थिर राहते व माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तसेच  घरातुन होणारा धनाचा अपव्ययसुद्धा होत नाही.

हे वाचा:   या दिशेला बसून जेवण करणे म्हणजे आयुष्य कमी करणे; तुम्ही हि चूक करत असाल तर एकदा नक्की वाचा.!

तसेच जर आपल्या कुटुंबातील कोणाच्या विवाहासाठी काही अडचणी येत असतील तर विवाह योग्य वधू किंवा वराला रोज पुजेनंतर हळदीचा तिलक लावावा. त्यामुळे विवाहेच्छू  तरुण-तरुणींचे लवकर लग्न जमते. जर आपल्याला काही महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर जायचे असेल, तर यशप्राप्ती करता देवपूजा करून हाताच्या मनगटाला हळदीचे बोट लावून घराबाहेर पडावे यामुळे आपल्याला कामांमध्ये सफलता व यशप्राप्ती होते.

आपण हा हळदीचा उपयोग करून या उपायांद्वारे महालक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकता व त्यामुळे आपल्याला आयुष्यभर कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तसेच घरातून धनाचा अपव्यय होण्याचे थांबते. तर हे होते काही धनासंबंधीचे हळदीचा प्रयोग करण्याचे उपाय.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *