पाण्यामध्ये एवढी गोष्ट टाकून दररोज प्या; एका आठवड्यात निम्मे वजन कमी होईल, जबरदस्त उपाय.!

आरोग्य

आज काल लोक आपल्या जेवनावर व आहारावर व्यवस्थित लक्ष देत नाहीत. जिभेचे चोचले पुरवण्या करता बाहेरचे चटपटीत पदार्थ कधी आपल्याला आवडायला लागले हे लोकांना ही समजले नाही! बाहेरील जंक फूड, फास्ट फूड, चायनिज, मंच्युरियन खाणे आता लोक पसंत करत आहेत. जास्त प्रमाणामध्ये तळलेले भाजलेले मसालेदार आणि चटपटीत पदार्थ खाण्यामध्ये लोकांना जास्त आनंद मिळत असतो.  हे पदार्थ खाल्ल्यामुळे पोट आणि कंबरेभोवती चरबी वाढू लागते.

चरबी वाढल्यामुळे अर्थातच लठ्ठपणा वाढतो व लठ्ठपणा वाढला की अनेक आजारांना आपण स्वतःहून निमंत्रण देत असतो. स्त्रियांमध्ये लठ्ठपणामुळे हार्मोनल असंतुलन होते. ज्यामुळे अनेक शारीरिक आजारांचा सामना करावा लागतो. सकस व पौष्टिक आहार न घेतल्यामुळे बरेचदा महिलांना पीसीओडी, थायरॉईड यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्याचे गंभीर परिणाम महिलांना भोगावे लागतात.

महिला व पुरुष यांच्या आहारामध्ये असंतुलन असल्यास वंध्यत्वाची समस्या देखील वाढीस लागते. ह्रदयरोग, पचनशक्तीवर कुप्रभाव, डायबिटीस यासारखे आजार होण्याचे प्रमाण लोकांमध्ये वाढत चालले आहे. या आजारांचे मुख्य कारण लठ्ठपणा आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्याकरता महागडी औषधे सेवन केले जातात.

हे वाचा:   कसलीही गाठ असुद्या दहा दिवसात गेली म्हणून समजा, कुठल्याही ऑपरेशनची अजिबात गरज भासणार नाही.!

तसेच डॉक्टरांनी सांगितलेले अनेक प्रकारचे औषध गोळ्या खाव्या लागतात. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे आपल्या कमरेची व पोटाची चरबी पूर्णपणे संपून जाईल.

जेवण केल्यानंतर कमीत कमी 20 मिनिटापर्यंत पाणी पिऊ नये. जेवनानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे चरबी वाढू शकते. त्यामुळे कधीही जेवणानंतर वीस मिनिटांनी पाणी प्यावे. भूक लागल्यावर कधीही पोटभर जेवण करू नये. भुकेपेक्षा दोन घास कमी खावे, कारण पोटभर जेवण केल्यामुळे पचनसंस्थेवर भार येतो व जेवण व्यवस्थित पचत नाही. जेवणासोबत नेहमी गाजर, काकडी, कोबी, बीट यांचे सॅलॅड खाल्ले पाहिजे. ज्यामुळे जेवण पचण्यासाठी मदत होते व पोटही लवकर भरते.

काकडी, गाजर यासारख्या भाज्यांना व फळांना सलाड म्हणतात. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे चरबी वाढत नाही. आपल्याला शक्य असेल तर पोटाच्या शुद्धी करता आठवड्यातून एक दिवस उपवास किंवा लंघन जरूर करावे. त्यामुळे पोटाची चांगल्याप्रकारे सफाई होते व आपला लंघन केलेल्या दिवशी फक्त फलाहार घ्यावा.

हे वाचा:   ईतके सोपे चिकन की २० मिनिटात पुरुष पण बनवू शकतील.! तोंडाला पाणी सुटेल एकदा नक्की वाचा साध्या सोप्या चिकन ची रेसिपी.!

दररोज किमान पंधरा मिनिटे आपण चालले पाहिजे. चालण्याचा व्यायाम  केल्यामुळे आपण फिट राहाल व आपले पोटही बाहेर निघणार नाही. दररोज सकाळी एक ग्लास पाणी कोमट गरम करून त्यामध्ये थोडासा लिंबूरस टाकून हे पाणी रोज सेवन करावे, असे केल्यामुळे आठ दिवसाच्या आत आपली चरबी हळू-हळू वितळू लागते व पोट कमी होऊ लागते. जर आपणही लठ्ठपणा आणि चरबी मुळे परेशान असाल तर आम्ही सांगितलेले हे साधे सोपे उपाय नक्कीच करून पहा व आपल्यालाही यामुळे फायदा मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *