पिंपळाच्या झाडामध्ये शनिदेवाचा वास मानला जातो! असे म्हटले जाते की, जी व्यक्ती पिंपळाच्या झाडाला कायम स्पर्श करते त्या व्यक्तीला शनि देव कधीही कष्ट होऊ देत नाही. शनिवार हा दिवस नवग्रहांमधील सर्वांत न्यायप्रिय असलेल्या देवता म्हणजेच शनीदेवांच्या करता समर्पित केलेला वार आहे. पिंपळाच्या वृक्षांमध्ये शनी देवाचा वास असतो असे मानले जाते. त्याचा संदर्भ ब्रह्मपुराणातदेखील सांगितलेला आहे.
ब्रह्म पुराणांमध्ये शनीदेवाने म्हटले आहे की, जी व्यक्ती नियमितपणे शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करते त्या व्यक्तीचे सर्व कार्य सिद्ध होतात व शनिदेव त्याला कोणतीही पीडा किंवा कष्ट होऊ देत नाहीत.
आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे शनिवारी पिंपळाच्या झाडासोबत करावयाचे उपायांबद्दल माहिती देणार आहोत! ज्यामुळे आपल्या सर्व समस्या व दुःख दूर होऊन माता महालक्ष्मी आपल्यावर धनाची बरसात करेल व शनिदेवाचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल.
१. ओम नमः शिवायचा जप – शनिवारी पिंपळाच्या झाडाला दोन्ही हाताने स्पर्श करत भगवान शिवाचा ओम नमः शिवाय हा एक माळेचा जप करावा, त्यामुळे आपल्या जीवनातील दुःख कष्ट आणि सर्व समस्या समाप्त होतील.
तसेच आपल्या कुंडलीतीलग्रहदोषाची समस्या देखील समाप्त होईल. पिंपळाची पूजा केल्यामुळे भगवान शिव देखील प्रसन्न होतात. भगवान शनिदेव भगवान शिव यांना आपला गुरु मानतात. भगवान शिवांना प्रसन्न केल्यामुळे शनिदेव देखील आपल्याला कष्ट पोहोचू देत नाही.
२. पिंपळाच्या मुळीचा उपाय – प्रत्येक शनिवारी संध्याकाळी स्वच्छ कपडे धारण करून अंधार होण्याच्या वेळेस पिंपळाच्या मुळाजवळ जल अर्पण करावे तसेच तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. हा उपाय केल्याने शनीच्या दशेचा प्रभाव कमी होतो. तसेच अनेक कष्टांचे निवारण होते. पिंपळाची पूजा करण्यासोबतच हनुमान चालीसा पठण करावे व पिंपळाला पाच प्रदक्षिणा घालाव्यात.
३. व्यवसायात प्रगती आणि आर्थिक समृद्धी करता उपाय – शनिवारी पिंपळाच्या मुळाशी दूध मिश्रित जल अर्पण करावे आणि भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करावी की, हे प्रभू! आपण भगवद्गीतेमध्ये म्हटले होते, की मी वृक्षांमध्ये पिंपळ आहे! हे भगवान! माझ्या जीवनामध्ये ही समस्या आहे आपण कृपा करून माझी ही समस्या (मनात जी पण समस्या असेल ती बोलून दाखवावी) दूर करण्यासाठी कृपा करा. पिंपळाला स्पर्श करा व पिंपळाला चारही बाजूने प्रदक्षिणा पूर्ण करा. सूर्यास्तानंतर हा उपाय करावा.
४. सूर्यास्तानंतर करा हे उपाय – शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर जुन्या पिंपळाच्या झाडापाशी जावे. आपल्या सोबत लाल शाई किंवा लाल रंगाचा पेन, थोडा लाल कपडा, कलावा हे सोबत घेऊन जावे. याशिवाय गायीच्या तुप घालुन गव्हाच्या पिठाचा दिवा पेटवावा व सर्वात आधी पिंपळाच्याखाली हा दिवा ठेवावा. पिंपळाच्या झाडासमोर उभे राहून हात जोडून हनुमान चालीसाचे पठण करावे.
आता त्या पिंपळाच्या झाडाचे एक पान घेऊन त्यावर लाल शाईने आपल्या मनातील इच्छा किंवा मनोकामना लिहावी. त्या फांदीवर सात वेळा कलावा बांधावा. आता तो कलावा आपल्या हातामध्ये सात वेळा गुंडाळावा. आता त्या पिंपळाच्या मुळापाशी असलेली माती आपण सोबत नेलेल्या लाल कपड्यांमध्ये बांधून आणावी व आपल्या घरात जिथे आपण पैसे ठेवतो त्या तिजोरीच्या जागेवर ठेवावी. यामुळे आपल्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.