जेवणानंतर ताटात हात धुणारे एकदा नक्की पहा; बघा आपल्यासोबत काय घडू शकते.!

अध्यात्म

आपल्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींना महत्त्व देण्यात आलेले आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये अन्न हे पूर्णब्रह्म मानले गेलेले आहे. ज्या ठिकाणी अन्नाचा आदर केला जातो त्या ठिकाणी नेहमी सदैव सकारात्मक गोष्टी घडत असतात तसेच अनेक धर्म-कर्म आपला धर्म कशा पद्धतीने वाढवावा व या संदर्भातील काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. या नियमाच्या आधारे आपण आपले दैनंदिन जीवन पद्धती व्यवस्थित जगत असतो पण जेवण करण्यास संदर्भातील काही महत्त्वाचे नियम व शास्त्र जाणून घेणार आहोत.

या शास्त्राच्या आधारे जेवणानंतर व जेवण आधी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणे अनिवार्य आहे याबद्दल सांगण्यात आलेले आहे. वेगवेगळे धर्म शास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये जेवण करण्याबद्दल वेगवेगळ्या नियमावली सांगण्यात आलेल्या आहे.आपण जेवण करतांना आपले वर्तन कसे असायला हवे? जेवण करत असताना तोंड कोणत्या दिशेला पाहिजे? जेवण करत असताना आपल्याला कोणकोणत्या विधी कार्य करायला पाहिजे याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत.

जर आपण जेवण करताना काही चुकीच्या गोष्टी केल्या तर ते जेवन आपल्या अंगी लागत नाही किंवा ते जेवण मानवी जीवनाला उपयुक्त सुद्धा मानले जात नाही. जर आपण जेवताना काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्या अन्नाचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो आणि या सकारात्मक परिणाम मुळे आपल्या जीवनामध्ये अनेक शुभ कार्य देखील घडत असतात.

जर आपण योग्य दिशेला तोंड करून जेवण ग्रहण केले तर आपल्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदू लागते.जीवनातील सर्व कटकटी दूर होऊन जातात व माता महालक्ष्मी कृपा अन्नपूर्णा यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये नेहमी चांगले दिवस येतात. चला तर मग आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया अशा काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल ज्या जेवणाच्या वेळी आपल्याला कटाक्षाने पाळायला हव्यात.

हे वाचा:   सावधान...! याकाळात चुकूनही पाणी पिऊ नका अन्यथा होतील भयंकर आजार.!

जेव्हा आपण जेवण करायला बसलो असतो तेव्हा आपल्या वाटेला दिले गेले आहे तितकेच आपल्याला खायला पाहिजे इतरांच्या वाट्याला आलेले अन्न चुकून सुद्धा खाऊ नका.जर आपण इतरांचे अन्न खाल्ले तर भविष्यात आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता असते. वास्तुशास्त्रामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की, जी व्यक्ती तुटलेल्या ,फुटलेल्या काचेच्या भांड्यामध्ये जेवण करत असते अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये भविष्यात अनेक वाईट घटना व प्रसंग घडण्याची शक्यता असते.

काचेचे फुटलेले नशीब त्या व्यक्तीला प्राप्त होते आणि जर व्यक्तीचे नशीब चांगले असेल तर त्याच्या नशिबाला तडा जाऊन वाईट दिवसाला लवकरच सुरुवात होतात. आपण ज्या ताटामध्ये जेवणार आहोत ते ताट नेहमी स्वच्छ असायला हवे तm त्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण व कचरा असू नये अन्यथा तुम्हाला त्या अन्नाचे पुण्य लाभणार नाही तसेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की, एकादशीच्या दिवशी चुकूनही तामसी पदार्थ म्हणजे मांसाहार, मद्यपान धूम्रपान अजिबात करू नये.असे केल्याने आपल्याला भविष्यात खूप सार्‍या यातना सहन कराव्या लागतात.

आपल्यापैकी अनेकांना एक घाणेरडी सवय असते, ती म्हणजे आपल्या ताटामध्ये उष्ट सोडणे ही अत्यंत वाईट सवय आहे म्हणूनच आपल्याला जितके अन्न हवे असेल तितकेच अन्न ताटामध्ये वाढायला हवे.अन्न हे पूर्णब्रह्म असते आणि अशा वेळी जेव्हा आपण अन्न उष्ट सोडतो तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वरच अपमान असतो असे मानले जाते. जेव्हा आपण एकत्र रित्या पंगतीला बसलेला असतो तेव्हा आपले जेवण झाल्यावर इतरांचे जेवण होइपर्यंत उठायला नाही पाहिजे अन्यथा आपल्यावर पितृदोष होऊ शकतो. आपले पितर आपल्यावर नाराज होऊ शकतात त्याचबरोबर एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे कधीही ताटामध्ये हात धुऊ नये.

हे वाचा:   घरात इथे ठेवा हे मोरपंख.. पैसा नेहमी चालत येईल तुमच्याकडे; मोरपीस ठेवण्याचे चमत्कारिक फायदे नक्की जाणून घ्या.!

जेव्हा आपण जेवण करायला बसलो तेव्हा सुरवातीला ताटाला नमस्कार करूनच अन्न ग्रहण करायला पाहिजे किंवा एखादा मंत्र जप करून आपल्याला जेवण करायचं आहे,असे केल्याने आपल्याला शुभ परिणाम प्राप्त होतात त्याच बरोबर जेवण करत असताना सर्वांशी चांगले बोलायला पाहिजे. एकमेकांची उणीदुणी किंवा कोणाबद्दल वाईट बोलायला नाही पाहिजे अन्यथा आपल्याला त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर पाहायला मिळतो.

जेव्हा कधीही आपण जेवायला बसू तेव्हा अशावेळी परमेश्वराच्या नावाने एक नैवेद्य बाजूला काढायला हवे असे केल्याने आपले जीवन सात्त्विक बनते व नंतर आपण स्वतः सेवन करायला हवा. यामुळे सुद्धा परमेश्वराची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निवास करते आणि आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडू लागतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.