दही खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे; दररोजच्या डोकेदुखीवर आहे दही रामबाण उपाय, हाडे बनतील खूप मजबूत.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो 9xMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पोटाचे आरोग्य चांगले असेल, तर आपण अनेक आजारांपासून वाचू शकतो! कारण ९०% आजार हे पोटापासून सुरू होत असतात. पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास करता दह्या पेक्षा उत्तम काहीच नाही! दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे असतात. यामुळेच की काय त्याला सुपरफास्ट देखील म्हटले जाते! नियमित ताजे दही खाल्ल्यामुळे डायबेटीस, मुळव्याध, बद्धकोष्टता यांसारख्या गंभीर समस्यांमध्ये देखील आपल्याला आराम मिळत असतो.

वेगवेगळ्या पदार्थांसोबत दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. याबद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत!
दही आणि जीरे-  जर आपल्याला जास्त झालेले वजन लवकर कमी करायचे आहे, तर आपण दह्यासोबत जिरा पावडर टाकून खाणे योग्य ठरेल! हे कॅलरी कमी करण्यामध्ये असरदार ठरते.

दही आणि मध- दह्यामध्ये मध मिक्स करून खाल्ल्यास तोंडातील अल्सर देखील बरा होऊ शकतो. दही व मध एकत्र केल्यास बॅक्टेरियल गुण तयार होतात. ज्यामुळे तोंडाच्या संबंधित सर्व प्रकारच्या जखमा किंवा फोड येणे यासारख्या समस्या दूर करण्यात ते प्रभावीपणे काम करते.

दही, सैंधव मीठ आणि साखर – दह्या मध्ये काळे मीठ म्हणजे सैंधव टाकून खाल्ल्यास पोटातील गॅसची समस्या दूर होते. याशिवाय पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आपले हृदयाच्या आजारांपासून रक्षण करते. दह्यामध्ये साखर टाकून खाल्ल्यास रक्ताची कमतरता दूर होते. तसेच युरिन इन्फेक्शन मध्ये देखील याचा लाभ होतो.

हे वाचा:   हे पान मनुष्य जाती साठी वरदान ठरले आहे.! ज्यांनी ज्यांनी याला असे वापरले त्यांचे हे आजार कायमचे निघून गेले आहेत.! नक्की वाचा लाखो रुपये वाचतील.!

दही आणि ओट्स-  हाडांना मजबूत करण्यामध्ये दह्यासोबत ओट्स मिसळून खाल्ले, तर शरीरामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि प्रोटीनची कमतरता पूर्ण होते. तसेच आपले स्नायूदेखील मजबूत होतात.

दही ओवा आणि फळे- दातदुखीमध्ये दह्यामध्ये अोवा मिसळून खाल्ल्यास लगेच फरक पडतो. यामुळे तोंडातील फोडांवर लगेच उपाय केला जातो.  दह्यासोबत फळे खाल्ल्यास भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट मिळतात. ज्यामुळे शरीर तंदुरुस्त होते.

दही, काळेमिरे, हळद आणि आले- जर आपण बद्धकोष्ठतेच्या समस्येने हैराण असाल तर आपण दह्यासोबत काळीमिरी मिक्स करून खाल्ल्याने आपल्याला लाभ मिळू शकतो. लहान मुलांना दह्यामध्ये हळद किंवा आले टाकून खाऊ घातल्यास फॉलिक ऍसिडची कमतरता भरुन निघते.

दही खाण्याचे अन्य लाभ- इम्युन सिस्टिम मजबूत करण्यासाठी-  दुपारचा जेवणामध्ये एक वाटी दही खाल्ल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे शरीराचे साथीच्या रोगांपासून संरक्षण होते.

हाडे मजबुतीसाठी-  एक वाटी दह्यामध्ये विटामिन ए, डी आणि बी १२ चे भरपूर प्रमाण असते. यामध्ये 100 ग्रॅम फॅट आणि 98 ग्रॅम कॅलरी असतात. दह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होतात.

हे वाचा:   आता केसात कोंडा जास्त दिवस ठेवण्याची गरज नाही.! एक शाम्पू पुडी आणि ही एक वस्तू रोज अंघोळी आधी असे लावा.! कोंडा गायब.!

ब्लडप्रेशर कंट्रोल करण्याकरता उपाय-  शरीरातील अतिरिक्त पोटॅशियम बाहेर टाकल्यामुळे रक्तदाब यासारख्या समस्यांमध्ये दही खाण्यामुळे फायदा मिळतो.  दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तसेच दही ह्रदयाच्या आरोग्यासाठी लाभकारी असते.

डोकेदुखी वर उपाय दररोज-  एक वाटी दही खाल्ल्यास आपल्याला डोकेदुखी कधी होणार नाही.
मुळव्याधीवर उपाय- दह्यामध्ये भाजून कुटलेले जिरे, मीठ आणि काळी मिरी टाकून रोज खाल्ल्यामुळे अपचनाची समस्या दूर होते व त्यामुळेच बद्धकोष्ठता व मूळव्याधीची समस्या आपोआप दूर होतात. मुळव्याधीच्या रुग्णांनी दुपारच्या जेवणामध्ये दही किंवा ताकासोबत ओवा टाकून पिल्यास त्याचा लाभ होतो. तसेच रोज एक वाटी दही या रुग्णांनी खाल्लेच पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *