फक्त दूधच पिऊ नका त्यात या गोष्टींचा समावेश करून प्या; आजार कायमचे निघून जातील.!

आरोग्य

आजारांचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्तीची गरज असते, त्यालाच आपण रोग प्रतिकारक शक्ती असे म्हणतो. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, याविषयी सगळेच संभ्रमात असतात. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आपण आपल्या कुटुंबाचे रक्षण करू इच्छित असाल तर तुमची प्रतिकारशक्ती मजबूत असायला हवी. डॉक्टरांनी कितीही औषधं दिली तरी पेशंटमधील उपजत रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच बैठ काम, पिझ्झा, बर्गर यासारखे खाद्यपदार्थ खाण्याची आवड. अशात विविध जंतू, विषाणूंचा संसर्ग होऊन आजारी पडण्याचं प्रमाण वाढत आहे. वेगवेगळ्या संक्रमित आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दूध हा संपूर्ण आहार मानला जातो. आपणास माहीतच आहे की ते हळदीसह अधिक फायदेशीर ठरते. कोमट दुधात थोडी हळद टाकून ते नेहमी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परंतु हळद व्यतिरिक्त इतर गोष्टींचे मिश्रण करुन ते पिऊ शकता. खजूरसह दूध प्या. खजुरांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-व्हायरल आणि जीवनसत्त्वे, लोह असते. खजूर दुधात उकळवून प्यावे.

हे वाचा:   आता केस डाय करणे विसरावे लागेल, चुटकी भर कॉफी करून दाखवेल कमाल, केसांच्या सर्व समस्या होतील गायब.!

भोपळा, सूर्यफूल यांच्या बिया दूधा सोबत प्या. हे व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण करते. विशेषतः सर्दी, खोकला आणि हंगामी आजारांपासून संरक्षण करते. दुधासह कोरडे फळे खा. किंवा एकत्र प्या. यामुळे त्यांचे पौष्टिक मूल्य वाढते. हंगामी रोगांशिवाय मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणाखाली राहतो. हळदयुक्त दूध प्या. हळदीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल, एंटी-इंफ्लेमेटरी, कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म शरीराचे रक्षण करतात.

नियमित दह्याचं सेवन केल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. सोबतच याने पचनक्रियाची सुरळीत राहण्यात मदत होते. आले मिसळा आणि दूध प्या. आल्यामध्ये व्हिटॅमिन, लोह, कॅल्शियम,अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल गुणधर्म असतात.व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं असतं. याने वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. सोबतच हाडेही मजबूत होतात आणि हृदयासंबंधी आजारही दूर राहतात.

संक्रमित रोगांपासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सी चं सेवन करणं फार फायदेशीर ठरतं. लिंबू, आवळा, संत्री यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतात. त्यामुळे नियमित व्हिटॅमिन सी असलेली फळं खावीत.

हे वाचा:   जेवल्यानंतर शतपावली आहे गरजेची, जेवल्यावर लगेच झोपणाऱ्या लोकांनी एकदा नक्कीच वाचावे.!

रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी काळी मिरीदेखील फायदेशीर आहे. काळी मिरी एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते.

कच्चा लसूण खाल्ल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करण्यास मोठी मदत होते. कारण त्यात भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए व ई आढळतात. तसेच, धू’म्रपान करू नये. जर अ’ल्कोहोल घेत असाल तर ते कमी प्रमाणात घ्यावं. त्यातही रेड वाईन उपयोगी. रोज नियमितपणे व्यायाम करावा, किमान चाळीस मिनिटे रोज चालावं. रोज सात ते आठ तास झोप घ्यावी.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *