डोळ्यांचा कोरडेपणा कुठल्याही व्यक्ति मधे उदभवू शकतो, तरीही ही स्थिती आपल्याला वयस्कर वयात अधिक सामान्य पणे आढळून येते. कोरड्या डोळ्यामुळे ५० वर्षांवरील लोकांवर परिणाम होऊ शकतो कारण वयाबरोबर अश्रूंचे उत्पादन कमी होते.
आपले वय जसजसे वाढत जाते तसे आपले डोळे कमजोर होऊ लागतात. हे पापण्यांना आलेल्या सुरकुत्या, डोळयातील पडदयाचे संकोचन आणि डोळ्यांचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे होते. तशी, ही सर्व नैसर्गिक कारणे आहेत, पण तंत्रज्ञानाच्या युगात जगण्याच्या नावाखाली आपणच आपल्या डोळ्यांचे शत्रू बनत चालोय.
बर्याच काळासाठी पापण्यांची उघडझाप न करता आपण मोबाइल स्क्रीन पहातो. अशा परिस्थितीत, डोळ्यांचे आरोग्य वाढत्या वयानुसार वेगाने कमी होत आहे. म्हणूनच वाढत्या वयासोबत डोळ्यांशी संबंधित आजारांबद्दल आणि त्यांच्या उपचारांबद्दल जाणून घेऊया…
मोबाइल, लॅपटॉप, संगणक आणि टीव्ही खूप वेळापासून सतत पाहिल्यामुळे आपण आपल्या पापण्या खूपच कमी वेळ उघडझाप करत असतो. यामुळे आपल्या डोळ्यातील ग्रंथी कोरड्या पडतात आणि डोळ्याच्या पापण्यांना सूज दिसू लागते, तसच काहीतरी टोचतय अस वाटत राहत. खरतर डोळ्यात अस काही गेलेलंच नसत.
डोळ्यातील कोर्डेपना तात्पुरता किंवा तीव्र असू शकतो. जेव्हा आपल्या डोळ्यातील ग्रंथींमध्ये अश्रू निर्माण होत नाहीत किंवा आपल्या अश्रूचं बाष्पीभवन जलद गतीने होतो, तेव्हा डोळ्यातील कोर्डेपना उदभवतो. अश्रू ग्रंथी कोरड्या झाल्यानंतर खालील काही समस्या उद्भवतात डोळ्यांची जळजळ होणे अस्पष्ट व धुरकट दिसणे दृष्टी कमी झाल्यामुळे डोकेदुखी वाढणे डोळे लाल होणे तेजस्वी प्रकाशात डोळे उघडता न येण्यासारख्या समस्या उद्दभवणे.
या समस्यांपासून वाचण्यासाठी या समस्या टाळण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे आपली स्क्रीन पाहण्याची वेळ कमी करणे. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवर काम करत असताना, पापण्यांची उघडझाप करण्याची खात्री करा, ही गॅझेट डोळ्यापासून काही अंतरावर ठेवून त्यांचा वापर करावा. दिवसातून दोन वेळा स्वच्छ आणि थंड पाण्याने डोळे धुवायला हवेत, डोळ्यावर २ ते ३ मिनिटे थंड पाणी शिंपडावे.
आंघोळ करताना तोंडात पाणी भरून घ्या व तांब्यात पाणी घेऊन त्यात काही काळ डोळे भिजवा. या दरम्यान, सतत पापण्यांची उघडझाप करत रहा. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होईल व दृष्टी सुधारेल. जर आपण बरेच तास संगणकावर किंवा मोबाईल वर काम करत असाल तर या वेळी पुरेश्या प्रकाशाची योग्य व्यवस्था ठेवा जेणेकरून डोळ्यांवर काही परिणाम होणार नाही.
कोरड्या डोळ्यापासून मुक्त होण्याच्या पहिल्या चरणांपैकी एक म्हणजे आपली लक्षणे कशामुळे उद्भवतात हे समजणे. औषधी डोळ्याच्या थेंबामुळे आणि काही सोप्या जीवनशैली समायोजित करून आपण आपल्या डोळ्यांणा वंगण घालू शकता. यामुळे डोळे कोरडे होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.