बऱ्याच वेळा आपल्या चेहर्यावरती तीन प्रकारचे मुरमं पाहायला मिळतात. सफेद, काळे किंवा जळणारे लाल रंगाचे डागा प्रमाणे दिसणारे पिंपल्स आपल्या चेहऱ्यावर येतात. सुंदर दिसणे प्रत्येकाचा अधिकार आहे. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स कोणालाच आवडत नाही. मित्रांनो आपला तळहात आणि तळपाय सोडुन शरीरावरील पूर्ण त्वचेवर तेल ग्रंथी आढळून येतात.
जे आपल्या रोम छिद्रासोबत डायरेक्ट जोडली गेली असतात. आणि या तेल ग्रंथींचे संतुलन बिघडले असता आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येणे सुरुवात होते. या पिंपल्स चा उपाय तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घरी ही करू शकता. या उपायाचा वापर तुम्ही फक्त तीन वेळेस करायचा आहे. तुमच्या चेहऱ्यावर कसल्याही प्रकारचा कितीही जुना पिंपल्स असू दे दाग धब्बे असू दे किंवा कोणत्याही प्रकारचे निशाण असू दे, ते पूर्णपणे ठीक होईल.
तर मग जाणून घेऊया हा उपाय तुम्ही कसा तयार करायचा आहे? यासाठी पहिला पदार्थ तुम्हास लागणार आहे तो म्हणजे तुळशीची पानं. त्वचेमध्ये तेल ग्रंथींचे संतुलन राखण्यासाठी तुळशीचे पान अत्यंत महत्त्वाची आहेत. सोबतच यामध्ये अंटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूम पुटकुळ्या यांचे निशाण घालवण्यास मदत करते. आणि नवीन फोड येण्यापासून रोखते.
तर अशा या तुळशीचे आठ ते दहा पानं तुम्हाला घ्यायची आहेत. ते स्वच्छ धुवून घ्या. आणि बारीक वाटून घ्या. त्यात एक चमचा तुळशीच्या पानांची पेस्ट असेल तर पाच चमचे पाणी मिसळा. चमच्याने हे मिश्रण निट ढवळून घ्या. हे पाणी वाटून वेगळ्या वाटीत काढा. पुढे कोरफड घ्या. कोरफड आपल्या त्वचेसाठी वरदानच आहे. चेहऱ्यावरील पुटकुळ्या दूर करण्यासोबतच आपल्या त्वचेला अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून वाचवण्याचे काम देखील कोरफड करते.
ताज्या कोरफडीचे पान घेऊन त्याचा गर काढून घ्या. साधारणपणे एक चमचा जेल /गर मिळेल इतकेच घ्या. नंतर त्यात तुम्हाला यात कापूर घालायचा आहे. कापरामध्ये अअँटी बॅक्टरियल गुणधर्म असल्यामुळे पापर देखील त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. ज्या लोकांच्या पिंपल्स मध्ये सूज येते पू येतो, त्यांसाठी कापूर हे वरदानच होय. कापूर पू घालवून फोड बसवतो. दोन कापराच्या वड्या घेऊन त्याची पावडर बनवा.
त्याला कोरफडं मध्ये घालून नीट मिक्स करून घ्या. उपाय करण्या पूर्वी आपला चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. कापसाच्या मदतीने कोरफड गर व कापूर यांचे मिश्रण फोड डाग असलेल्या त्वचेवर अलगद नीट लावा. हे लावल्यानंतर सुमारे 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवावे. हे सुकल्यानंतर पुन्हा एकदा ताज्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा कापसाच्या मदतीने आपण तयार केलेले तुळशीचे पाणी चेहऱ्यावर अलगद लावा.
तुळशीचे पाणी चेहऱ्यावरील बॅक्टेरिया काढून तुमच्या चेहऱ्याची सफाई करेल. त्यामुळे तुमच्या त्वचेचा चेहऱ्यावरील तेल ग्रंथींचे संतुलन सुधारेल. यामुळे पुन्हा पुन्हा फोड येण्याची समस्या तुम्हाला होणार नाही. पाच मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. 70% रिझल्ट तुम्हाला दोन ते तीन वेळेस लावल्याने मिळेल. या उपायाचा सलग वापराने चेहऱ्यावर कोणताही डाग राहणार नाही. कसल्याच प्रकारचे फोड चेहऱ्यावर येणार नाहीत.
दिवसातून एकदा हा प्रयोग तुम्ही करावा. जमल्यास रोजही हा प्रयोग करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.