उन्हाळ्यामध्ये दुधाचे सेवन करायचे असेल तर दिवसाची सुरुवात ही थंड दुधापासून करायला हवी. या ऋतूमध्ये सकाळच्यावेळी दूध पिल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी सकाळच्या वेळी जर दूध प्यायचे असेल तर थंड दूध प्यावे. गरम दूध कधीही पिऊ नये. असे करणे शरीरासाठी घातक ठरू शकते.
रिकाम्या पोटी कधीही दुधाचे सेवन करू नये. डॉक्टरांद्वारे असे सांगितले जाते की रिकामे पोट असेल तर त्यावर दुधाचे सेवन करणे साफ चुकीचे आहे. यामुळे पोटामध्ये ॲसिडिटीची समस्या निर्माण होत असते जर तुम्हाला सकाळच्या वेळी रिकाम्यापोटी दूध घ्यायचे असेल तर यामध्ये काही नट्स जरूर एकत्र करावे. रिकाम्या पोटी दूध पीत असाल तर यामुळे तुमचे मसल कमजोर होऊ शकतात.
अनेक जण सकाळच्या वेळी व्यायाम करत असतात. व व्यायाम झाल्यानंतर किंवा व्यायाम करण्या अगोदर दूधाचे सेवन करत असतात परंतु व्यायाम केल्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर दूधाचे सेवन करायला हवे. असे केले तरच दुधातून मिळणारे पोषकतत्वे आपल्या शरीराला मिळत असतात. तसेच आपण व्यायामा दरम्यान गमावलेली सर्व ऊर्जा पुन्हा येत असते.
अनेक लोक दूध पीत असतात परंतु दूध पिताना ते एक महत्त्वाची चूक करतात ती म्हणजे दिवसभरातून कधी ही दूध पीत असतात. परंतु दूध पिण्यासाठी कधीही सकाळची वेळ तसेच रात्रीची वेळ योग्य असते. कारण दुधामध्ये लॅक्टोज तत्व असते त्यामुळे याला पचण्यासाठी भरपूर वेळ लागत असतो. कधीही दुधाचे सेवन दुपारच्यावेळी करू नये.
अनेक लोक रात्री झोपायच्या अगोदर दुधाचे सेवन करत असतात. असे करणे आरोग्यासाठी खूपच चांगले सांगितले जाते. यामुळे शरीरासाठी अनेक प्रकारचे लाभ होत असतो. कधीही झोपण्याच्या अगोदर एक ग्लासभर कोमट दूध प्यायला हवे. उन्हाळ्यामध्ये देखील हे तुम्ही करू शकता. दूध पिताना त्यामध्ये थोडासा बदाम देखील टाकून पिऊ शकता. यामुळे स्मरणशक्ती आणखी चांगली बनत असते.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.